[२५७] ।। श्री ।। ११ आक्टोबर १७६०.
रानाश्रियाविराजितराजमान्यराजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गो।। यांसः
पोष्य सदाशिव चिमणानी नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत जाणें. विशेष. तुह्मीं पत्रें पाठविलीं तीं पावलीं. बुंधेल्यांकडे राजश्री गणेश संभाजी याणीं कजिया आरंभिला आहे. त्यास चहूंकडे पेंच नसावे. तजविजीनें बुंधेले हाताखालीं रहावे, याचा विचार म॥ निलेस लिहावा, ह्मणोन लिहिलें तें कळलें. ऐशास हाच म॥ गणेश संभाजी यांस लिहिला आहे. त्याणीं कजिया केला नसेल, व हल्लींहि कजिया न करणें. त्यास समजावून सांगोन फौजसुद्धां हुजूर घेऊन येणें. ह्मणोन लिहून पत्रें रवाना केलीं आहेत. याप्रमाणें करितील. पारच्या जमीदारांना कजिया मानवला आहे. शेंपन्नास ठाणें रोहिल्यांचें घेतलें ह्यणोन लिहिलें तरी उत्तम आहे. या उपरिहि वारंवार पारचें राजकारण ठीक राखून लेहून अतिशय बखेडा करीत ऐसें करणें. तिकडील सूत्र पक्कें चांगले त-हेनें हातीं राखणें. गंगाकिनारा आज्ञेप्रमाणें जातों ह्मणोन लिहिलें, तरी बहुत दिवस तुह्मांस (लिहा) वयाचें समाप्त केलें. सीमा झाली. तुह्मीं थोर माणूस वारंवार काय हाणावें. करून दाखवाल याउपर तें खरें. र॥ छ १ र॥लावल. बहुत काय लिहिणें. हे विनंति.