[२२८]                                      ।। श्री ।।            १५ आगष्ट १७६०.

राजश्रियाविराजितराजमान्यराजराजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गोसावी यासि:

पोष्य सदाशिव चिमणाजी नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहित जाणें. विशेष. तुह्माकडून ऐवज मातबर भरणा सत्वर येऊन पोहोचावा. याविषयी तुह्मांस वारंवार लिहिले असोन अद्यापि ऐवज येत नाहीं, हे गोष्ट उत्तम नसे. येथें खर्चाची निकड फार आहे. तरी ऐवजाची तरतूद सत्वर होऊन श्रावण मासाआंत ऐवज येऊन येथें पावे ते गोष्ट करणें. येविषयी विलंब एकंदर न लावणें. तुह्यांकडील लोक अद्यापि कोणी कोणी आपले बुणगे वस्तुभाव कुल देशास लावून देतात ह्यणून वर्तमान कळले, तरी हें कामाचे नाहीं. येविषयींची चौकशी करून लोकांस ताकीद किरणें. कोणाचे बुणगे वस्तुभाव जाऊं न देणें जाणिजे. छ ३ मोहोरम सु॥ इहिदे सितैन मया व अलफ. बहुत काय लिहिणें. हे विनंति.