[२१४] ।। श्री ।। ८ जुलै १७६०.
राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गोसावी यांसिः
पोष्य बाळाजीरावं प्रधान नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहिणे. विशेष. सरकारांत नाटकशाळांचें प्रयोजन आहे. तरी जातीच्या शुद्ध, चांगल्या, जरूर, दोन तीन, तरण्या२९४ मिळवून पाठविणें. फार चांगल्या पाठविणें. छ २४ जिलकाद. हे विनंति.