[२१०]                                        ।। श्री ।।             २७ जून १७६०.

पु॥ राजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गोसावी यासि:

विनंति उपरि. स्नानाकरितां गंगादक असावें याकरितां गंगोदकाच्या कावडी २ दोन चहूं दिवसाआड वरिचेवरी पाठवीत जाणें. जाणजे. छ १३ जिलकाद. बहुत काय लिहिणे. + सतत चांगले निगेनें कावडी येत असे तरदुदेनें पाठवीत जाणें. पाणी पिणें जालें तरी त्याचा बंदोबस्त नीट करून पाठवीत जाणें. हे विनंति.