[२०९]                                        पे।। छ ८ मोहरम. ।। श्री ।।             २६ जून १७६०.

राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गोसावी यांसि:

पो॥ बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत जाणें. विशेष. तुह्मीं दोन पत्रें पाठविलीं तीं पावलीं. २९०अबदाली, रोहिले यांचा मजकूर विस्तारें लिहिला त्यांत खुलासा कीं पठाण, रोहिले इकडे आले याजमुळें सकुराबादचा अंमल उठला; श्रीमंत राजश्री भाऊसाहेब सिरोंजेअलीकडे आले; पुढें आगरियास आल्यावर आपण त्यांजकडे जाऊन२९१ सविस्तर निवेदन करितों. ह्मणोन कितेक विचारांचा मजकूर लिहिला तो कळला. ऐशास, प्रस्तृत चिरंजीव राजश्री भाऊ कोठपावेतों गेले ? अबदाली कोठें आहे ? नजीबखान व ज्याहानखान पुढें आले होते ते कोठें आहेत? तें विस्तारें तिकडील वर्तमान वरच्यावर लिहीत जाणें. कनोज फफुंदच्या मुकामाचीं पत्रें पावलीं. नजीबखान, ज्याहानखान इटावियाकडे आले त्याचें वर्तमान काय ? आपले ठाणियाचें वर्तमान काय ? तें लिहिणे. जाणिजे. छ १२ जिलकाद. हे विनंति.