[२०७] ।। श्री ।। २४ जून १७६०.
राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गोसावी यासि:
सेवक सदाशिव चिमणाजी नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय लेखन करणें. विशेष. तुह्मीं पत्रें सप्तमीचीं पाठविलीं. तीं प्रविष्ट जाहालीं त्यांची उत्तरें पुरवणियांत लिहिलीं त्यावरून कळेल. येथें दरमहा पाच२८७ सहा लाख रुपये लागतात. तरी तुह्मांस लिहिल्याप्रें॥ मातबर ऐवज येऊन पोहोचे तें करणें. सुजाअतदौलाचीं पत्रें पाठविली आहेत. हीं दो दिवसांत त्यास पावतें करणें. कड्याकु-याविशीं नजीबखानास दोन अडींच लक्ष रु॥ द्यावे याचे रा॥ गोपाळराव गणेश यांचें पत्र पाठविलें तें पावलें. त्यांस तुह्मीं लिहिलें तें उत्तम. आतां२८८ रु।। त्यांस का द्यावे ? न द्यावेच. जाग्याजुग्यांची बंदोबस्ती उत्तम प्रकारें करून राहावें. र॥ छ १० जिलकाद. बहुत काय लिहिणे. हे विनंति.