[१९७] ।। श्री ।। ४ जून १७६०.
अखंडितलक्ष्मी अलंकृत राजमान्यराजश्री विसाजी गोविंद कमाविसदार प॥ सागर दि॥ राजश्री गोविंद बल्लाळ गोसावी यांसि:-
सेवक सदाशिव चिमणाजी नमस्कार सु॥ ईहिदे सितैन मया व अलफ. सेदवाईचे ठाणें कटारेवाले यांणीं घेतलें आहे तरी तुह्मीं बापूजी नारायण याजला सामील होऊन, ठाणे घेऊन, म॥निलेयाचे स्वाधीन करणें आणि कटारेवाले याचें पारपत्य उत्तम प्रकारें करणें. जाणिजे. छ १९ शौवल. आज्ञाप्रमाण.