[१९३] ।। श्री ।। २९ मे १७६०.
पु॥ राजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गोसावी यांसिः-
विनंति उपरि काशीच्या ब्राह्मणांस वर्षासनाचा ऐवज चार पांच साला पावत नाहीं२७७ ऐसा बोभाट येतो. त्यास, येविशींचें वर्तमान कसें काय तें सविस्तर लेहून पाठवणें. ह्मणोन पेशजी तुह्मांस लिहिलें होतें. त्याचा जाब आला कीं ऐवज पावोन दीक्षितांची कबजें घेतलीं आहेत. ऐशास, याप्रें॥ असोन वारंवार बोभाट येतो हें काय ? याउपरि तुह्मांकडून ब्राह्मणांचा ऐवज कोण्हे सालांत कसा पावला आहे त्याचीं कबजें असतील तीं हुजूर पाठवणें व बाकी राहिली असेल तेहि तपशीलवार लिहिणें. जाणिजे. छ १३ सवाल, सु॥ सितैन मया व अलफ. बहुत काय लिहिणें. हे विनंति.