[ १२८ ] ।। श्री ।। २ एप्रिल १७५९.
तीर्थरूप राजश्री गोविंदपंत दादा वडिलाचे सेवेसी:-
अपत्यें बाबूराव१८० दोनी कर जोडून शिर साष्टांग नमस्कार विनंति ता।। चैत्र शुद्ध ५ पंचमी प॥ सुखें असो. विशेष. वडिलीं गंगाजळाच्या कावडी सुमारे २० वीस पाठविल्या त्या प्र॥ येथें पावल्या. आज्ञेप्रमाणें जेथें द्यावयाची त्याप्रमाणें दिली:-
| ७ | श्रीमंत नाना स्वामींकडे | १ | बावधनी तीर्थरूप मातुश्रीस प॥ |
| २ | श्रीमंत भाऊ स्वामीकडे | ५ | रा महादोबाबा |
| २ | श्रीमंत दादा स्वामींकडे | १ | बाबूराव फडणीस |
| १ | श्रींमत सौ॥ पार्वतीबाईकडे | १ | सखारामपंत बापू |
| १२ | ०८ |
येणेंप्रमाणें१८१ १८१+ वीस कावडी दिली. वडिलांस कळावें बहुत काय लिहिणें. कृपा लोभ असो दीजे. हे विज्ञापना.