[९६]                                                ।। श्री ।।      ३० सप्टेंबर १७५७.

पे।। छ १५ मोहरम शुक्रवार दोन प्रहर दिवस.

सेवसी विनंति. निजामुद्दौला नवाब सलाबतजंग याचे डेरियांतून उठोन बसालतजंग याचे ढेरियास आले. तेथें घटका बसले. त्यांनीं येक हत्ती व दोन घोडीं नजर केली ते घेऊन आपले डेरियास आले. नवाब सलाबतजंग यांणीं या भेटीस वस्त्रपात्र कांहीं दिल्हें नाहीं. हे विनंति.