[९२] ।। श्री ।। २८ सप्टेंबर १७५७.
पे॥ छ १३ मोहरम बुधवार त्रितीयप्रहरदिवस.
श्रीमंत राजश्री राउसाहेब स्वामीचे सेवेसी:-
आज्ञाधारक गणेशसंभाजी सा॥ नमस्कार विज्ञापना. ता।। छ १२ मोहरम संध्याकाळ ........ घटिका दिवस पावतों सुखरूप असे. विज्ञापना ऐसीजे: निजामअल्लीखान यांणीं अकरा कोसांची मजल करून दाभाडीवर मुकाम केला होता. आज पहाटे प्रहररात्रीं कुच करून आजी अकरा कोस वरूडनजीक शहर तेथून पांच कोश आहे तेथें गेले. उदईक दाखल कदाचित् होतील. तेरावी तेरीख आहे. बहुधा चौदाव्ये तेरखेस पोंहचतील. बहुत काय लिहूं हे विज्ञापना. या प्रातांचें वर्तमान होईल तें वरच्यावर लिहीत जाईन. हे विज्ञापना. स्वामीचें आज्ञापत्र याच घटिकेस पावलें. हे विज्ञापना.