[८५] पे।।छ ११ मोहरम. ।। श्री ।। २६ सप्टेंबर १७५७.
राजश्री बाबूरावजी दाम मोहबतह येत नाद दोस्ता
बादज दुवा आ की जे कांहीं तुह्मी रायजगंनाथ यांसी बोललेत सविस्तर त्याचे लिहिल्यावरून विदित जाहले. त्यासी जो काहीं करार श्रीमंत रावसाहेब करमफर्मा रावपंतप्रधान याचे समक्ष तुमचे विद्यमानें भवानीशंकराहीं केला असेल तो आह्मांस प्रमाण असे व तुह्मास ठाऊक आहे व पंत म॥रेचा जाबसाल तुमचेच विद्यमानें असे. आतां पुन्हा उत्तर प्रतिउत्तर उचित नाहीं. भवानीशंकराहीं लिहिलें होतें कीं रावसाहेब मेहरबान र।। विश्वासराव व तुह्मीं त्या प्रांतीं येतात. आपले मतलब मंजूर करायास राजे जगंनाथास पाठवणें कीं शहर जवळ असे, वकीलास ताकीद करतील. श्रीमंतजीपासून आज्ञा रायमजकुरची पाठवायाची घेतली असे. त्यास तुमचे लिहिल्यावरून त्यास पाठविल असे कीं र॥ विश्वासरावजी सेवेसी व तुह्मापाशीं हजर असेत. आणखी उत्तर प्रतिउत्तर त्याशीं नाहीं. जें कांहीं भवानीशंकराहीं करार केला आहे तो प्रमाण असे. तुह्मी प्रांरभापासून सर्व गोष्टींस जाणत असा. आतां लिहिणें प्रयोजन नाहीं. जें कांहीं सर्व स्नेहाचें असे तें करणें. कामाचे मुख्य तुह्मीच असा. ज्यादा काय लिहिणें हे किताबत.