[७६] श्रीदत्तात्रय. १८ सप्टेंबर १७५७.
पै॥ छ ३ मोहरम संध्याकाळ
अर्ज विज्ञापना ऐसीजे येथील क्षेम ता।। छ ३ मोहरम रविवार प्रातःकाळ मुकाम शहर सेवकाचें वर्तमान यथास्थित असे. विशेष. प्रार्थना ऐसीजे. दौलताबादेचे मोर्चे कांहीं लोक उठोनि आले. कांहीं लोक पावसाकरितां राहिले आहेत, ते आज दोन प्रहर पावतों येतील. करारमदार जाले ते प्रमाणच आहेत. निजामअल्ली दर कुच येत होते. त्याचा व बसालतजंगाचा पेच मातबर मोठे हिकमतीनें पाहिला. याजहातीं निजामअल्लीस लिहविलें कीं तुह्मी पुढें न येणें. लक्षप्रकारें निजामअल्ली फिरून जाईल, स॥ जे भोसल्याचा निजामअल्लीचा पेच मातबर पाडिला. येथून यास्तव फिरून जातील. कदाचित् रेटून येऊं लागले तरी यास ह्मणजे बसालतजंगास बाहेर काहडितो, लडावीन कदाचित् याचे कुमकेस सरकारची फौज पाहिजेसी जाली तरी विनंति लिहीन. याच कामासाठीं येक अगर दोन दिवस लागतील. तदनंतर हकीमजीस घेऊन हुजूर येतों. माझा गुंता नाहीं. परंतु निजामअल्ली फिरवून वराडांत जाये उपाय आरंभला आहे, तो एका दिवसानीं निदानी दोदिवसांनीं सिद्धीस जाये ऐसें आहे. यास्तव आजचा उद्याचा दिवस राहिलों. रुसखत तरी याजपासून जालोंच आहें. पूर्वी विनंति लिहिलीच आहे. निजामअल्लीच्या लष्करांतून आपाजी धोंडाजी यांस पत्रें आलीं तीं व रघुनाथपंत मुनसी, वकील जानोजी भोसले याचा, यास यशवंतराव कोनेर याचे पत्र आलें तें व रामचंद्र कोनेर ह्मणजे बाबूराव कोनेर याचें पत्र अप्पाजीपंतास आलें तें बजिनस सेवेसी पाठविलीं. वाचून सहित हें विनंतीपत्र हुजूर पुण्यास रवाना करावयाविसी आज्ञा करावी. महाराव जानोजी निंबाळकर याचें पत्र श्रीमंत स्वामीस आहे तेंहि पुण्यास रवाना करावयास आज्ञा. महाराव जानोजी निंबाळकर यांणीं राजश्री रावफडणीस यास पत्र लिहिलें. तेंहि पाठविलें असे. निजामअल्लीकडील जवाब संध्याकाळ पावेतों नवाब साहेबांस येईल. तदनंतर जे तदबीर होईल ते विनंति केली जाईल. सेवेसी श्रुत होय. हे विज्ञापना.
माझे पत्र परभारें हुजूर पुण्यास जात नाहीं यास्तव जें लिहिणें स्वामी ल्याहावयास समर्थ. चित्तास आल्यास माझें विनंति पत्र बजिनस इरसाल करावें. हे विज्ञापना.
मी येथें सुखें बसलों नाहीं. सरकारच्या मातबर कामासाठीं राहिलों. याहि उपरि आज्ञाच अशी असली तरी सोमवारी स्वार होऊन येतों. हकीमजीचे लोक फौज, तईनाती, गारदी, बंदी वगैरे बाहर निघाल्यास येक दिवस लागेल. मोगलाई कारभार! अमासुस्त. डेरा मात्र हकीमम॥अलीखाजीचा शहराबाहेर रंभापुरियाजवळ दिल्हा असे. हे विज्ञापना.
या पत्राब॥ लोकांचीं पत्रे आलीं तीं प॥ असेत.
| १ | अप्पाजी पंतास रामचद्र कोनेर याचें | १ | रघुनाथपंत मुनसी यास येशवंतराव |
| १ | जानोजी निंबाळकर याचें तें. | कोनेर याचें. | |
| सरकारात आलें | १ | बाबूराव फडणीस यांस जानोजी | |
| ३ | कित्ता कागद | निंबाळकर याचें आलें ते | |
| ५ | २ |