[६५] ॥ श्री ॥ ३१ मे १७५७.
पु॥ तीर्थस्वरूप रा॥ राजे जीवनराव वडिलांचे से॥: -
विनंति श्रीरंगपट्टणधी खंडणी आली; परंतु वसूल न जाला. ठाणीं घेतलीं ते सरकारांत पैका वसूल होवेंतोंवर राहिलीं तीं राखिलीं पाहिजेत. फौज मातबर पंधरा हजार या प्रांतांत ठेऊन संस्थान मजकूर व चितलदुर्ग वगैरे पाळेगारास दबाव रहावा. सिरये प्रांतीं नवाबाचे तेथें दिलावरखान आहेत. गांव खेडीं वगैरे चहूंकडे पाळेगारांनीं दबाविलीं. दिलावरखा आपले पोटास व शिबंदीसच बेजार झाले. त्यास एखादें ठिकाण रहावयास देऊन सरकारची फौज शि-यांत ठेवावी; मातबर सरदार ठेवावा. सरकारांत पंधरा लाखाची जागीर परशरामपंत जिवंत असतांच समसामजंगांनी करार केला. त्यास बारा लाखाची जागीर गुंजोटी वगैरे व बालाघाट, हरदापुर व व-हाडांत महाल नेमून यादी लिहिली. ते चौकशी व वसूल तुह्मीं लिहून पाठविल्यावर सेरहसल असल्यास घेतली जाईल. बाकींत शिरें घ्यावें. ह्मणोन विस्तारें परशरामपंत१३९ जिवंत असतां हुजूरची आज्ञापत्रें खासदसखत व माझीं पत्रे आज्ञेप्रें।। र।। जालीं. सबब जें लष्कर दूर; शि-याचा जबाब येईल तोंवर येथें राहणें कसें होतें ? बद्दल जातां मार्गे फौजेसहित मातबर सरदार ठेवितील, शिरें घ्यावयास मुरारराव वगैरे टपलेच आहेत; यास्तव ठाणीं राखावयासी, सरदार रहावयास, जागा उपयोगी पडेल; जाग्यांत ऐवजवसूली काहींच नाहीं व ठिकाणहि मातबर नाहीं; परंतु, आब हवा मात्र कांहींसी बरी व या प्रांताच्या ठाण्यास जवळ, यास्तव घेणें जरूर१४० आलें. ह्मणोन लिहिलें#. अशास समसामुद्दौला ह्मणों लागले जे श्रीमंताचा आमचा करार मदार जाला असतां, वर्षास विजापूर सुभ्यांतील ठाणींठुणीं गांव घेतच असतात. यंदा आलमले वगैरे व लीकोट परगण्यांतील मुद्देबिहाळ वगैरे व आणखी कितीक ठाणीं घेतलीं. त्यामध्यें मुलकांत बदनुका दिसोन येते. जे हे ह्मणतात, श्रीमंताचा आमचा स्नेह आणि करारमदार जालेत आणि श्रीमंत वर्षास गांव ठाणीं घेतच असतात आह्मांस तव कोहे१४१ ने श्रीमंताची फौज हमेशा त्या सुभ्यांत फिरती. कोण्ही आमच्या ठाण्याठुण्यास उपद्रव देईल त्यास तंबी करून ठाणीं आमचे तालुकदाराचे स्वाधीन करावी. तें एकीकडेच राहिलें. आपण ठाणीं घालितात.