Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठी धातुकोश
घसवट १ [ घर्षपट्टिका ( ना. )] झिझणें, शिजणें.
-२ [ घृष् १ सङघर्षे + घत् १० विभाजने ] चोळवटणें.
-३ [ घृष् १ सङघर्षे + घृत् १ वर्तने ] सराव होणे.
-४ [ घृष् उजळणें + वृत् १ वर्तने] सभ्यतेनें वागणें, कोणेका विषयांत अभ्यस्त होणें.
घसाड [ घृष् १ सङ्घर्षे ] घांसणें, चोळणें.
घसास [ घंष्, घंस् १ दीप्तौ द्वित्व, घंस् घस् = (घसघशित) घसासणें ] अतिशय दिपविणें.
उ०-येर जें क्रियाजात । तें तिस्त्रेयाचे करवत ॥ ऐसें सबाह्य घसासित । तेयाचें गा ॥ ज्ञा. १६-२४२
घळ १ [ घृ १० प्रस्रवणें ] धुपून जाणें (नदीची माती वगैरे)
-२ [ घरणं ( घृ १० प्रस्रवणें )]
-३ [ ग्लह = गल ( गोट्या खेळण्याची ) ( ना.)] गोट्या खेळखेळून गल जशी मोठी होते तसे नाकाचे भोक नथ काढून घालून मोठें होणें.
घळघळ १ [ गल् १ स्त्रवणे यहलुगन्त ]
-२ [ घृ ३ क्षरणे ] मोकळे होणें, सैल होणें.
-३ [ ग्लह् १० ग्रहणे. द्वित्त ] जोरानें फांसे टाकणें. इतर रूप-घळघळाव
घळघळाव [ ग्लह् १० ग्रहणे, द्वित्त ] जोरानें फांसे टाकणें. ( घळघळ ३ पहा )
घांगर [ गागर्ह् ( गर्ह् ) = गागरणें = घांगरणें ] घोटाळणें. इतर रूप-घांघर
घागाव [ घाघष्यते ( घघ् १ हसने }] घोटाळणें.
घांघर [ गागर्ह् ( गर्ह् )] घोटाळणें. ( घांगर पहा )
घांघवस १ [ गवेष् १० मार्गणे, अभ्यास-गंगवेष् ] शोध करणे. ( घांघोस १ पहा )
-२ [ गम् १ गतौ यङ् लुगन्त गंगम् गंगेस् ] पांघवसणे. ( ज्ञानेश्वर )
-३ [ गेष् १ अन्विच्छायाम् ] शोध करणें. (घांघोस २ पहा)
-४ [ ग्लेष् १ अन्विच्छायाम् ] शोध करणें. (घांघोस ३ पहा)
घांघुस १ [ गवेष् १० मार्गणे ] शोध करणें.(घांघोस २ पहा)
-२ [गेष् १ अन्विच्छायाम् ] शोध करणें. (घांघोस २ पहा)
-३ [ ग्लेषु १ अन्विच्छायाम्] शोध करणें. (घांघोस ३ पहा)
घांघोस १ [ गवेष् १० मार्गणे अभ्यास गंगवेष् ] शोध करणें. इतर रूपें-घांघुस १, घोस ३, घांघवस १
-२ [ गैष् १ ग्लेष् । अन्विच्छायाम् ] शोघ करणें. इतर रूपें-वरील प्रमाणें