Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठी धातुकोश

घरस [ घृष् १ सङ्घर्षे ] घसरणे.

घराव [ गृह्य ( ना. )] माणसाळणें.

घर्घर [घर्घर ( ना.)]

घर्ष [ घृष् १ सङ्घर्षे ] घासणें.

घल १ [ ग्रह = ग्लह् १ ग्रहणे (१ = ल) णिच् ग्लाहय् = घालणे ] इतर रूप-घाल ९.

-२ [ ग्लह् १ ग्रहणे ]

-३ [हन् २ गतिकर्मा ( निरुक्त }] जाणें, निघून जाणें. 
उ०-जैसा घरि आपुलां । वानिवसें वन्हि लागला ॥
तो आणिकां हीं पाजलला । जालौनि घली ॥ ज्ञा. १-२५७

घवघव १ [गह् १० निबिड असणें ( द्वित्व )] भरून जाणें. उ-फांद्या पानांनीं घवघवल्या.

-२ [ गह् ( निबिड असणें ) द्वित्व ] दाट होणें.

घसक [ घृष् १ सघर्षे-घर्षक ( ना. )]जोरानें खेंचून घेणें. (घसकावि पहा )

घसकावि [ घृष्-घर्षक ( ना. )] इतर रूप घसक.

घसघस [ घंस् वाहाणें द्वित्त ] वाहणें. उ०-ओढा घसघसतो आहे.

घसट [ घृष्टिः ( ना. )= घसट ] घासणें.

घसर १ [ ग्रस् १० अदने] शब्द खाणें, अस्पष्ट उच्चार करणें, उ०-म्हणतांना घसरतो.

-२ [ ग्रस् १० अदने ] उ०-तो भातावर घसरला = सः भक्तं परिग्रसितवान् .

-३ [ ग्रसनं ( ग्रस् १० अदने) घरसणें = घसरणें ]

-४ [ घस्र ( ना. ) ( घस् १ अदने ) ] अतिशय खाणें उ०—तो लाडवांवर घसरला.

-५ [ घृष् + सृ ( सर् ) घस्सरणें = घसरणें ] गुळगुळीत पृष्ठभागावरून पाय निसटून पडणें.

-६ [ दृष् = घृष ( ह = घ)] अति हर्ष पावणें.
ह ची घ होऊन घसर हा शब्द बनला आहे. मूळ घृष धातूपासून बनला नाहीं. घसरणें म्हणजे पडणें हा शब्द निराळा,
उ०- द्रव्य पाहून तो किंचित् घसरला.