श्रीगणेशायनमः । स्वति श्रीनृपविक्रमार्क समयाति संवत १५३५ अंकि पंधरासें पंचतिस ॥ चैत्रमास शुद्ध १ गुरुवार तद्दिनी अहिनळवाडा पाटण तक्त ठाणे-कोंकण माहिम बिंबस्थान विलायत नाईकि या पैकि सरकारभार बाहादुर पुरा ॥ मलिक माहामद फौजदार व ढोकखान पातस्याहि दिवान ।। व सरदेसाई राजश्री आबाजि नायेक व रघुनाथपंत कावळे पैठणकर अमलदार प्रमाणे साशष्टि ।। आणि सोमदेशले व हरदेशले पद्माक्ष गोत्र कुळदेवता जोगेश्वरी उपनावं ठाकुर ।। पुर्ववास पैठण ।। सुखवास वस्ती मालाड ।। याही दिवानि प्रवाणा केला ।। मजकुर यैसाजे ।। राजश्री आबाजी नायक स्यामक्षेत्रकर सांडोरे आणि रघुनाथपंत कावळे पैठणकर आमचे सरदेसाये व कुळगुरु ।। तर तुम्हास ठाउकें की सोमवंशि साशष्ट कुळें नामांकित राजे आणि साशष्ट गोत्राचे व त्याचि देवतें व त्यांचा स्वधर्म तो तुम्हास ठावका ।। यैसें असतां तया वंशिकि जे आहेत ते कोणकोण त्यांस सभेमध्यें मान्य करावें ।। आणि त्याहि कोण्हे मर्यादे मध्यें असावें हें सर्व सविस्तर येथे दिवाना मध्यें सभेस सन्मुख लेहोन महमझर करावा ॥ कां जर तुह्मी त्या सोमवंशियाचे आणि आह्या द्वादश गोत्रांचे हि कुळगुरु आणि चवदा प्रगाण्याचे सरदेसाये ।। पुर्वापार तुह्मासी सर्व ठावकें आहे ॥ आणि या वंशि उत्पति जालि आहे ते हि सर्व तुह्मास दाखल आहे ।। ह्मणोन अर्ज आमचा कीं तुह्मी कृपा करोन हे उत्पतिचा निवाडा सांगावा ।। साकल्य कोण कोणाचा, त्यास मान्य कोणता, हें साकल्य वीदित करावें ।। त्या प्रमाणें चालिलें जाईल ॥ हें आईकोन वेदमूर्ति आबाजि नायक आणि रघुनाथपंत कावळे पैठणकर सरदेसाये मिळोन लेहोन महझर केला ॥ तो यैसा जे ।। सोमवंशि आणि सूर्यवंशि याचे आह्मि कुळगुरु हें सत्य ।। आणि चवदा प्रगाण्याचे सरदेसाये ।। पैठाणा होवोन आल्या उपर सुलतान आलावदिन पातस्या आले ॥ त्यासि आह्मि जावोन भेटलों ॥ मुलुक जमि आदाये कामाविस सर्व सांगितली ॥ आणि देशमुखि खरि केलि ।। ते च किताब लेहोन घेतली ॥ ते आज पावे तंव चालत आलि ।। तर आतां तुह्मी पुसता तें सांगतों ॥ सर्व सावध असा ॥ छ ।।
राजश्री बिंबशा स्वामी या प्रांतास आले संवत ११२५ ॥ बाबरशा पातस्याचे भयें करोन ।। हा देश स्वामी बिंबास प्राप्त जाला ।। स्वदेश सांडोन परदेश काबिज करोन माहिमा राज्याधिकार केला ॥ माहिमा राहिले ।। ते समइं समागमे अष्टप्रधान व बारा उंबराव त्यांचि नावें कोणकोण ॥ मुख्य राजगोत्र भारद्वाज कुळदेवता प्रभावती ॥ पुर्वराज गोरखपुर ।। त्याचे मुख्य प्रधान ।। परशरामराव गोत्र वृद्धविष्णु उपनाम वाणाध्व पूर्वराज्य कडेमाणिकपुर ॥ त्यांचे जामात शंकरराव सूर्यवंशि पूर्वराज मातापुर पाटण ॥ पंडितराव राजपंडित आणि रघुनाथपंत कवळे पैठणकर राजकुळगुरु गोत्र भारद्वाज कुळदेवता येकविरा मातापुर यमाई वाजनीस स्याखा कात्यायनि शुत्र वाचन्हि शाखा माध्यान्दीनभेद ॥ आणि आबाजि नायक मुख्य सेनाधिपत्य यजुर्वेदि माघ्यादीन-भेद वाजस्नि शाखा कात्यायनि शुत्र उपनाम सांडोरे श्यामक्षेत्र पूर्वठिकाण ॥ रघुनाथपंत कावळे समयुक्त कर्मस्थान पैठण, दुर्गाडि वर वाडा, माहाजन वृति गाविची, सोमसूर्यवंशिचे कुळगुरु ।। आणिक बाबरे पातशायाने सरदेशमुखि विलायेत घेवोन दीधलि राजश्रीस सही ।। छ ।। आणिक श्रीपतराव आणि भास्करराव सूर्यवंशि गोत्र मांडव्य राजाज्ञा गोविंदराव तेजप्रभास गोत्र कौंडण्य हे अष्टप्रधान तयांसि मान्य सभेमध्ये सही ।। सन्मुख अनुक्रमे लिहिल्याप्रमाणे ।। आतां सोमवंशि साशष्ट पदकि त्यांचा उद्धार ।। अनुक्रमे करोन बहुमान राजसभे मध्यें विवाहि मोहोत्सविं ।। मुख्य पदें मालाड ।। सोम देशले तपे मरोळ ।। हर देशले पद्माक्ष गोत्र कुळदेवता जोगेश्वरी हे मुख्य मान्ये यांसि ।। या देशायांसि येकयकासिं च्यार च्यार चौघले ।। त्यां मागे तया देशाचे धणि ते कोणकोण ।। पोईसरकर जैतराव वशिष्ट गोत्र कुळदेवता जोगेश्वरी येथिल पद ह्मातरे हे पहिले चौघले ।। दुसरा कृष्णजित येकसारकर गोत्र अत्रि सास्वन गोत्रि कुळदेवता महालक्ष्मी पुर्ववास करविर ।। हे दोघे चउघले नावाणिक ।। मालाड तपयास आणि मरोळ तपयास ।। मरोळ तपयांत साहार ।। मालाड तपयात येकसार ।। हैबतराव आणि हनुमंतराव ।। गोत्र गौतम कुळदेवता येकविरा । चौघले तिसरे ।। आणि पांप राउत वंशनाम राउत गोत्र पद्माक्ष कुळदेवता येकविरा आंकुलवालि कलु पालवण ।। आणि परशराम गोत्र हरित उपनाव चोधरि सुखवास कांढोळ ।। हे चौघले ४ ।। तपे मरोळ गारसाहाणी गोत्र सात्त्विक ।। आणि प्रतापुरकर स्वनल्प गोत्रि केशव ह्मातारे ॥ आणि वांदरे बाण राउत राजण–पाखाडि गोत्र भृसुंडि ।। कडु पालवण मुग ह्मातारे गोत्र शिभ्री कडु पालवण ।। माजगांवकर जोग राउत भार्गव गोत्रि चौघले ४ प्रांति मरोळ सही ॥