गावं चेने ५६ सरकार-भात मुडे ७४४११ राजभाग ६४ धर्म ३ सीळोतर ७ नगद दाम २००३ ।। ५६ ।। गावं संभुज ५७ सरकार-भात मुडे २३६३११ राजभाग २०८१११ धर्म २३ सीळोत्तर ५ नगद दाम १०२५ ॥ ५७ ।। गावं वडवळी ५८ सरकारभात मुडे १४५।२१ राजभाग १३२।९ धर्म ६।१२ सीळोतर ७ नगद दाम १०२५ ॥ ५८ ॥ गावं मोरवसी ५९ सरकार भात मुडे ५७ राजभाग मुडे ५७ ॥ ५९ ॥ यवं संख्या गांवाची ५९ ।। ह्या गावांचे भात संख्या ७०२५४११ राजभाग ५९५६ धर्म ३०७२२ सीळोतरें ७०७५१८ तथा नगद दाम ४०३४८५ ॥ येवं माहाले दोन मरोळ आणि मालाड ।। मिळोन कुल बेरिज भात मुडे ११५८०४१२ तथा राजभाग ९५३४५२४ तथा धर्म ६१११६ तथा सीळोतरें १३४४१८ तथा नगददाम ५०७३८५ ॥ येण्हे प्रकारें मुलुक आवादान करोन राज्याचि बंदिस्त केली ।। यैसेया प्रकारें राज्य करितां वरुषे ९ मा १ दिन ५४ परियेत राज्याचि कमाविस केली ॥ या उपरांत राजा बींब शांत जाला ॥ त्या उपर प्रतापशा हा रायाचा पुत्र जेष्ट राजकारभार करिता जाला ।। शके १२२५ या मध्यें वंश २८ मास ३ राज्य केलें ।। या उपर चंपावतिचा राजा केशवराव राणिचें नावं सुप्रभा प्रधान बुधसेन व राजपुत्र न.गरशा हे सोहिरे ॥ प्रतापशा मेहुणा ॥ जाणोन वर्तत असतां होणार भविस्य ह्या मेहुण्या मध्ये कलह-प्रारंभ उत्पन्न (जाला) ते सांगतों ॥ नागरस्याने पत्र मेहुण्या प्रतापस्यासिं पाठविलें ॥ जर येडख मेढाळगड मला दीधला पाहिजे, आपण वस्ति धरोन ।। तेधवां प्रतापशा नाकबुल गेला जर गड देणे नाहि कोण्हास ॥ सोहिरा पाउलें च्यार दुर आहे तवं सख्यत्व विशेष जाणोन समीप नसावें । तैं वैर परस्परें वाढले ।। परस्परें युद्ध प्रसंग वाढला ।। तेधवां प्रतापश्यान विचार पाहातां नास दिसोन येतो ह्मणोन पत्र देवगिरी रामदेवरायास पाठविलें ।। सवें मनुष्य पाठविता जाला ।। बाळसेन, जयेमेन, नागोजी, तथा ठाणेकर, विकोजी हे पांच जण देवगिरीस गेले ॥ राया रामदेवासी भेटले ॥ सकळ वृतांत येथिचा श्रृत केला ॥ जर नागस्या निरार्थक वैरास प्रवर्तला असे ।। तो सर्व वर्तमान आईकोन राजा रामदेवें आज्ञा जीवननायेक सावखेडकर सेनाधर सेनासह वर्तमानि त्यांसी राज-आज्ञा जाली जर स्वाहार व्हावें ॥ विडा देवोन रवाना केला ॥ तो वर्तमान नागरस्याम श्रृत चंपावति जाला ।। ह्मणोन आपलि सेना सिद्ध केली ॥ तेधवां राया नागस्याचा पुत्र त्रिपुर-कुमर सिद्ध जाला जर पित्रुकार्यि आपण युद्ध करावें ॥ आज्ञा पित्याचि घेवोन चालिला ।। ते वर्तमानि जीवननाईक माहोलिचे मैदानि ।। दोघांसि आदळाआदळ जालि ॥ अकस्मात युद्ध थोरावले ।। माहामारि पेटले।। युद्ध थोर जालें ।। जीवन नाईक आणि हेमपंडित हे हारिस आले ॥ त्रीपुरकुमर विजय जाला ।। रामदेवरायाचा पराजय जाला ।। त्रिपुरकुमर येशेसि चंपावतिस आला ॥ राया नागरस्याने आनंद फार केला ॥ जर आह्मा रायां येश आलें ।। हा वृतांत माहिमा राय। प्रतापश्यासीं श्रृत जालें ।। तेधवां आपुलें निजांग सैन्य सिद्ध सांगो पाठविलें ।। द्वादश प्रभु नावाणिकं पाचा रोन त्यांसि बहुत मान्ये केला ।। त्या नंतर वानठेकरांला बहुत प्रकारें नावाजिलें व ह्मणितलें जर आपले सूर्यवंशि अपकीर्ति होये ऐसा प्रसंग जाणोन लज्जा रक्षणे ॥ तैसें चि सोमवंशियांसि सांगितलें ।। आणि नावाजिलें ॥ तैसें च पत्र येरगळकरांस पाठविलें जर सिंधे शेषवंशि येश आहे तर या प्रसंगि आपुला पुरुषार्थ दाखवावा ।। ह्मणोन विडे दिधले ।। त्या उपर कडु पालवण राउतांसि राज्यमान राया प्रतापस्यान दिधला ।। त्याचि वगत ।। गो-हाईकरांस विराणे वे सभे मध्ये विरगांठा ।। तथा नाउरकरांस मंडपि काहाळा वाजवावि ।। तें आणिकाचे मंडपि न वाजवावी ।। तथा मांदेगांवकरास नगारा दिधला ।। तथा पस्पवळिकरांस व माहुलकरांस आणि कांधवळिकरांस अश्व दिधले ।। आणि तोरडे बांधले ।। तथा साहिकरांस चरणि वृंदे दिधलीं ।। या परि मान्य देवोन सर्व समुदाय नागरस्यान सिद्ध केला ।। ईतक्यांत राया रामदेवान देवगिरि होवोन मनुष्यं अहिनळवाडा पाटणि शिवचापाढोर पाटिणासी पाठविलिं ।। तेथे राजा जयसिंग त्यासिं वृतांत श्रुत केला ।। जर नागोजी तथा विकोजी तथा बाळसेन यांचा शुड घ्यावया पंडितराव पाठविला ।। परंत ते हि पराजयो पावले ॥ त्या उपर नागरस्यान या प्राते चढाव केला ॥ राजा प्रतापस्या हा आपले निज सेने सह–वर्तमान गगन-माहाला प्रत गेला ।। सायेवन माहाल तेथे गगनमाहाल असे ।। गड गगनमाहाल ।। या प्रकारें राजा प्रतापशा हारिस आला ।। तदनंतरे जैतसिंग व रामदेवरायानें प्रताप धरोन राया नागरस्या वरि सैन्य रवाना केलें ।। ते स्वाहार होवोन विसामागड मणोर माहालि पैलदेंचा तांदुलवाडिस आले ।। तेथे प्रतापस्या रायाचें सैन्य तथा जैतसिंगाचे तथा रामदेवरायाचें सकळ सैन्य येकत्र जालें ।। माव करोन कटकबंद केला ।। पुढे श्वाहार होउन नागरस्या वरि चाल केलि ।। ते प्रतापपुरास आले ॥ ते समइं आंधरि मध्ये युद्ध तुंबळ जालें ।। अहिनळवाडा पाटकराचा परिवार पराजयो पावला ॥ प्रतापस्या रायाचा सर्व देश राया नागरसें भेदें घेतला ।।
Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57