तुर्क तरि येवोन बैसला असे ।। तयाचें बळ तरि विशेषे ।। आणि श्रीवशिष्ट वर्जेनियां बहुवसे ।। गेला असे ।। २१ ।। हे तरि दुरात्मे गौघातकी ।। चांडाळ महापातकी ।। ह्मणोनि युद्धी मिळाले तवकी । धैर्य धरोनियां ॥ २२ ॥ जरि वर्जिले श्रीगुरुराये ।। परंत नरा युद्धी सांडिता राज्यसंप्रदाये ॥ तरि क्षेत्रधर्म निरार्थेसि जाये ।। हांसति पूर्वज ।। २३ ॥ ऐसा अवधिवांचा मनोरथ ।। युद्ध करणे यथार्थ ॥ मग रायें पाठविला लीखितार्थ ॥ युध्दासि सीध्द व्हावें ।। तुमचि आर्त पुरवों आजी ॥ २४ ।। राजा युध्दी प्रवतेंल ।। महामारी मिसळतिल ।। जय निर्जय हा द्वैतभाव ।। ।। ह्मणोन सीष्टाचार करावा ॥ २५ ।। ऐसें पत्र सुमध प्रधान ।। जेथे तुर्काचे पडिलें सैन्य ।। नगराचे वामाभिधान ॥ पुरनगर असे ।। २६ ।। तेथे माहामद ब्रह्मअवतार ।। स्थिरावला जैसा डोंगर ।। तेथे प्रधान गेला सत्वर ।। पत्र दीधलें तयासीं ।। २७ ।। देखिलें सुमध प्रधानासीं ।। भाषणार्थ केला तयासीं ।। मानवला महामद मनासी ।। लिखित पाहोनियां ॥ २८ ॥ यैसा लीखितार्थाचा अर्थ ।। बाचितां असे हांसत ।। बहु हास्य करोनियां ह्मणत ।। सुखें असा ॥ २९ ॥ तुह्मी गाडिला रे रणखांबु ।। युध्द करों ह्मणतो तुमचा प्रभु ॥ शरकांडियेन ।। भुमिनभु ।। सन्मुख उभें राहावे ।। ३० ।। रायाचें पाहिजे महिमान ।। सुखें युद्ध करा दारुण ।। उभयतां होतसे भाषण ।। तवं प्रधान ह्मणे ।। ३१ ।। आह्मि आमचें राज्य करित असतां ।। तुह्मी काये ह्मणोन आणिता अहंता ।। नगरासि घेरा देवोनि सभोंवंता ॥ अतिघाता प्रवर्तलेती ॥ ३२ ।। रणभुमि समरंगणि धडमुंडा होइल विखरणी ।। उभयता माजि धणी ॥ होईल भुतांची ।। ३३ ॥ ऐसें ह्मणोन प्रधान निघाला ।। आपुल्या मेळिकारा माजि आला ।। तयासि वृत्तांत सांगितला ।। नेम जाला जी युध्दाचा ।। ३४ ।। युध्दाचा जाला निश्चये ॥ युध्द करणे नीःसंशये ।। तुर्काचा गर्भभाव काये ।। पुढे उसिर कायेसा ।। ३५ ।। मग समस्त जाले संन्निध ।। अश्वारूढ प्रधान सुमध ।। तैसा प्रभुकुळि समंध ।। आपुला ठाइं आरंभिला ॥ ३६ ॥ रायें विचारिलें यकाधें स्थान ।। देवगिरी असे प्रमाण ।। तें स्थळ महानिधान ।। द्वीतिये न्याई ।। ३७ ।। पवित्र देखिला देवगिरी ।। तेथे आले सर्वक्षेत्री ।। जैसे अष्टदिशा दिग्गजगिरी ।। डौरले असती ॥ ३८ ॥ तवं विद्युल्लता कडाडिली ॥ तडकातडकि स्फूरली ।। अशुभ वर्तले ऐसि बोली ।। समस्त दुखवले ।। ३९ ॥ मग करोनियां पूजन ॥ फळि पुष्पी नानाविधान ॥ स्तविली अन्योन्य ।। भावें करोनियां ॥ ४० ॥ तवं कुळदेवता आली ॥ मध्येरात्रिं उभी ठेली ।। ह्मणे वोखटें जालें भली ।। गति नव्हे ॥ ४१ ।। राखणाईत होते चतुर ॥ ते ह्मणति माते कां जालिस निष्ठुर ।। माझें न चले रे तिळभर ।। हरीहरां पुढे ॥ ४२ । युध्द होईल दारुण ।। होईल रणकंदन ॥ भाके गुंतला त्रिनयन ॥ मी येकली ॥ ४३ ।। माझें न चले कांहिं बळ ।। म्लेंछा कडे तो हि गोपाळ ।। होईल हलकल्लोळ ।। अशुध्द वाहेल भडभडां ॥ ४४ ।। ऐसि कुळदेवी वदली ।। हरिहराचि जालि येकजुळी ॥ मी पडिलों निराळी ।। माझें न चले तयां पुढा ।। ४५ ।। आतां युध्द होइल समरंगणी ॥ सूर्यवंशि क्षेत्रि भीडतिल रणी ।। तुर्काचि पुरेल आयणी ॥ भूमंडळाचा ठाई ।। ४६ ।। उठा रणशिंधु माजेल ।। अभिनव कथा वर्तेल ॥ व्यास वक्ता पुंण्यसिळ पुराणवित्पती ॥ ४७ ।। इति श्रीकौस्तुभचिंतामणी ॥ कथिलें असे व्याकरणी ॥ तें बोलतों प्राकृतवाणी ॥ परिसा दत्तचित्ते ॥ ४८ ॥ छ ।।
पुढें रणकथाविस्तार ।। संस्कृतवचनी कथि मुनेश्वर ।। तो वशिष्टवाक्याचा अनुसर ।। आरंभिला म्या ।। १ ॥ तेथे पातले म्लेंछसंभार ।। युद्धी मिसळले रणरंगधिर ।। नामांकित आले थोर थोर ।। युद्धा लागीं ॥ २॥ रणखांब रायें स्थापिला ।। युद्ध करों ऐसें ह्मणो लागला ।। सैन्यासि निरोप केला ।। सीद्ध असा वीर हो ।।५१।। तुर्क निर्माण जाले बहुत ॥ वेष्टित चालिले अगणित ॥ पराक्रम दाविती विख्यात ।। येकमेकां ॥ ५२ ।। ऐसें सैन्य तुर्काचें आलें चहु कडे मीसळलें ।। शब्द टाहो फोडों लागले ।। सांडा रे सांडा राज्ये ॥ ५३॥ तुह्मा राज्याचा काये लोभ ।। निरार्थक उभारिला रणखांब ।। जीवंत धरूं तुमचा प्रभु ।। रामराजा ।। ५४ ।। ऐसे गर्वारूढ बोलती ।। महायुध्दासि प्रवर्तती ।। शस्त्रें हाति शोभति धावंती ।। येकमेका वरी ।। ५५ ।। ऐसि मांडिलि झुंझारी । पाये न ठेविती माघारी ।। रणखांब सांडोनि भीतरी ॥ प्रवेशले म्लेंछ ।। ५६ ।। उभयदळिं मांडला झगडा ।। सैन्याचा होतसे रगडा ।। तुर्क बैसोनियां दगडा ।। आला समुद्रा मधोनी ॥ ५७ ॥ पुढें धावंति पायांचे मोगर ।। दृष्टि पुढें नाणिती महाविर ॥ बळाढ्य प्रतापि महाकृर ।। घाये निष्ठुर हाणती ।। ५८ ॥ असीवार धावंति चहुकडे ।। उल्हाळे घेति फेरोफेरि घोडे ।। तीही पाईं उदाळति लवडसवडे ।। विर गाढे तुर्क हे ॥ ५९ ॥ येक उठावले रथा वरी ।। जे पेटले महामारी ।। हांका मारिती गजरी ॥ युध्दा माजी ।। ६० ।। तरवार वज्र कोठे ल्याले ।। मोहाळि घालोनि मिरवले ।। ते कैसे धाविंन्नल ।। जैसे अग्निचे हुडे ॥ ६१ ।। ऐसा म्लेंछभार दुर्घट ॥ त्या माजि माहामद श्रेष्ट ॥ गर्जी आरोहण करुन धीट ।। मारित सांट चालिला जो ॥ ६२ ।। नाचत येति परसैन्य–घोडे ।। राउत त्या वरि बैसले मेहुडे ।। आरोळि देति उचलोनि खांडे ।। घ्या घ्या ह्मणेानी ।। ६३ ।। माहामद धनुर्वाडा ।। संधान करित चालला गाढा ॥ उचलोनियां हातिं मेढा ।। झडझडा टाकि बाण ॥ ६४ ।।