तरि आतां हे पुत्र ।। मृत्यलोकि होति नृपवर ॥ ते काश्यपें आणिले सत्वर ।। रुषि-आश्रमी ॥ २१ ।। तेथे मेळविलिया कंन्या ॥ कश्यपे केला ॐ-पुण्या ॥ ते कथा सर्व सांगतां ॥ विस्तार होईल कवि ह्मणे ॥ २२ ॥ सोमवंशि राजपुत्रिया ।। स्वयंवरे केलि काश्यपेंया ।। राज्य दिधलें तयां ।। अर्क-पुत्रांसी ॥ २३ ।। या परि वंशवृद्धी ।। पावला तो दिनमूर्ती ॥ काश्यपें केलि वाढति किर्ती ॥ सूर्यवंशाची ॥ २४ ॥ मग ते तिघे नृपवर ॥ वडिल अजानबाहो धनुर्धर ॥ त्या धाकुटा गंगाधर ।। श्रीधर हे तिघे पैं ॥ २५ ॥ अजानबाहो पासोन वसु ।। तयासि पुत्र जाले साटि सहश्र ।। महावंशप्रकाश ।। थोर सूर्यकृपे ॥ २६ ॥ मग ते बहुत नृपवर ॥ देशोदेशिं राहिले धनुर्धर ।। आपले भुजा बळें राज्यभार ॥ दाविती आजी ॥ २७ ॥ ते महा-क्षेत्रि निपुण ॥ जे धनुर्धर-विद्या-पूर्ण ।। महाप्रभु सगुण ।। सूर्यवंशि ॥ २८ ॥ या प्रकारें विस्तार ।। सूर्यवंशि निर्धार ॥ नइनंदन महापवित्र ॥ राज्य करी ॥ २९ ।। तयाचा पुत्र सुदिमन्य ।। जाणो तेजें दुजा भानु ।। तो महा दारुण ।। तेज-आकृती ॥ ३० ॥ तेणे सुखि केलि वंसुधरी ॥ आणि क्षेत्रियां राजे पृथकाकारी ॥ तो राजा येकछत्री ॥ महाप्रभु तो ॥ ३१ ॥ त्याण्हे राज्य केले च्यारि सहस्त्र दिनरात्र ॥ तो अकस्मात पावला मृत्य ।। तवं वंशि होता सूत ।। सावतासंनु ॥ ३२ ॥ तो क्षेत्रियां माजि पंचानन ॥ हरी-भक्तिसी परिपूर्ण ।। तेणे राज्य केलें गहन ।। तीन संवत्सर ।। ३३ ।। तो राज्य करितां नरेंद्र ॥ तयास जालें दान पुत्र ॥ ते महाक्षेत्रि महाविर ।। सूर्यवंशी ॥ ३४ ।। वडिला नाम भद्रशेन ॥ त्या धाकुटा रघुत्तम ।। त्याहि राज्य केलें परिपूर्ण ।। वसुंधरेचें ॥ ३५ ॥ मग तया वंशवृद्धी ।। पुत्र जाला ज्ञानबुद्धी ।। त्या नावं महाशिद्धी ॥ राजा कृपाळ ॥ ३६ ।। त्याणे राज्य केलें ॥ तीन शहस्त्र दिन बाविस ।। तये राजीं बैसला कृपाळ ।। पुण्य पुत्र ॥ ३७ ॥ तयाचा पुत्र विजयावंश महाप्रभु तो ॥ तेणे सुखि केले जन समस्त ।। राज्य भोगिलें बहुत ॥ येकुणिस संवत्सर पैं ॥ ३८ ॥ मग तयाचा नंदन ॥ सोमप्रभु राजा गहन ।। राज्य करितां त्रिलोचन ॥ संतोषविला तेणे ॥ ३९ ।। तेणे राज्य केलें वीस संवत्सर ।। बारा मास दिन च्यार ।। तयासि जाला पुत्र ॥ कृष्णदेव ।।४०।। तया राज्य करितां नृपवरा ॥ सुखिया केलें परिवारा ॥ तवं तयासि जाला पुत्र ।। रघुपति तो ॥ ४१ ॥ मग तयाचें राज्य सरलें ।। पंधरा शत संवत्सर भरले ।। तें राज्य रघुपति-कुमरें ।। राज्य केलें थोर पैं ॥ ४२ ॥ तवं अंत पावलें द्वापार ॥ ते कथा सविस्तर ॥ कौस्तुभपुराणि साचार ।। सांगितलि असे ॥ ४३ ॥ तवं कळि जाला सचेतन ॥ मग कलयुगि राज्य करितो नृपनंदन । । दश सप्त सा दिन ।। केलें राज्य ।। ४४ ।। तयाचा पुत्र कमळादिन ॥ तो पवित्र राजा गहन ।। तेणे अठरा शत तीन दिन ।। केलें राज्य ॥ ४५ ।। तयाचा अश्विनदेव पुत्र ।। तया सवें आठ लक्ष क्षेत्रि नृपवर ॥ यकांग धनुर्धर ।। महाविर तो ।। ४६ ॥ ते राज्य करितिल पृथकाकारी ।। परि अश्विनदेव राजा येकछत्री ।। तेणे सात शत संवत्सरी ॥ केलें राज्य तपोबळें ॥ ४७ ।। श्रीभानु जाला त्याचा वंशी ।। तो महाक्षेत्रि प्रतापेसी ॥ तेणे सा शत संवत्सरासीं ।। केलें राज्य ॥४८॥ तवं त्यासि जाला पुत्र ।। तेणे राज्य केलें दोन शत संवत्सर ।। तयाचा जयसवन पुत्र ।। सत्य जाण ।। ४९ ॥ तयासि पांच नंदन ॥ तेणे दिड शत वरुषें गहन ।। निजप्रतापें परिपूर्ण ॥ राज्य केलें ॥ ५० ॥ तयाचा पुत्र रामराजा ।। प्रतापें धनुर्धर कलयुगिचा ॥ तवं तुरकाण जालें सहजा ।। होणार गत ।। ५१ ।। तेणे दुखवला त्रिनयन ।। ब्रह्मकर्तृत्व गहन ॥ पुढा जाला पाहिजे येक- वर्ण ।। प्रायश्चित-योगें ।। ५२ ।। ब्रह्महत्यीं गेलि ब्रह्मशक्ती ॥ रुद्रशक्ति हि गेलि सहजस्थिती ॥ म्लेंछ अवतरले क्षिती ॥ महा अधम ।। ५३ ।। तो तवं राज्य करि रामचंद्र ॥ जो क्षेत्रि वंशि दीनकर ॥ तेथे अशुभ पावलें थोर ॥ ब्रह्महत्येचें ॥ ५४ ।। ब्रह्महत्येचें नि दुषणे ॥ शक्तिहिन जालि नृपनंदने ।। + + + + + + + + ।। अशुभ तुरक आहामद ॥ ५५ ॥ तवं वशिष्ट असतां ध्यानी ॥ म्लेंछ देखिले अंत:कर्णी ।। तो उठिला तेथोनी ।। तये वेळीं ।। ५६ ॥ मग बोलावोन समस्त क्षेत्रिजन ।। तयांसि ब्रह्मविद्या केलि बोधन ॥ करी दिधलि लेखणी ।। वशिष्ट-देवें ।। ५७ ।। आणि व्यासमुनिचा वचनी ।। जे महाविद्या देईल मार्तंड येवोनी ।। बारे म्लेंछासि समरंगणी ॥ नाहि जयो ।। ५८ ॥ आणि क्षेत्रियांसि समरंगणी मुक्ती ॥ आणि म्लेंछासि भीड नाहि निती ।। जे अमंगळ याती ॥ पुण्या परते ।। ५९ ।। मग तो राजगुरु ।। आणि क्षेत्रियांसि कथिला आचार ।। यकादशवर्षि दीक्षाश्रूत्र ।। सांगितलें ।। ६० ।। सांगितलिं द्वादश गोत्रें ।। भृगु भारद्वाज वशिष्ट ब्रह्म कश्यप कौंडण्य दालभ्य ॥ गौतम नारायण मांडव्य मार्तंड ।। ही द्वादश गोत्रें ।। ।। छ ।। आणिक उपदेशिताहे कुळगुरु ॥ बारे सांडावा अहंकार ॥ आह्मि क्षेत्री युद्धि बडिवार ।। सांडोनि द्यावा ।। ६१ ।। आणि कळिचा अंती ॥ निद्रे दाटला असे श्रीपती ।। ह्मणोन म्लेछासि न चले बळशक्ती ।। येणे परी ।। ६२ ।। कलयुगि अधर्म आचार ॥ आणि अदृष्य जाला रुद्र ॥ ते महाब्रह्मकपाट । टाळि अज्ञानबुद्धी ।। ६३ ।। कलयुगि हरीहर ॥ दोन्हि गुप्त जाले परमेश्वर ॥ योगनिद्रे सारंगधर ।। बोध्य जाला ॥ ६४ ॥ आणि रुद्रा ब्रह्महत्यचें लांछन ॥ तेणे प्रवर्तलें आन आन ।। लोपलें अवदान ॥ देवाद्विजाचें ॥ ६५ ।।
Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57