हृदईं त्रिनयनाचें ध्यान ।। ब्रह्मांडि नेलास पवन ।। साभिमाने रुषि संपुर्ण ॥ आपुला प्राण सांडो पाहे ।। ७१ ।। ऐसें करितां रुषिश्वर ।। तपें आराधिला शंकर ॥ तेथे आला शंकर ।। मवानिसहित ।। ७२ ।। मग ह्मणे माग प्रसंन्न ।। येवढें काये तुझें निर्वाण ।। जें मागसि तें सत्यवचन ।। रुषि पूर्ण संतोषला ।। ७३ ।। वशिष्ट ह्मणे जा शंकरा ।। अंत पावला सूर्यवंशाचिया नृपवरा ॥ सुदिमन्य राजेश्वरा ।। तुझिया नियोगें ।। ७४ ।। तयासि घडला तुझा शाप ।। तो जालासे शक्तिरूप ।। तो बुधा घरि अकंस्मात ।। देखिला म्या ।। ७५ ।। तो पुन-रपि करावा नर ।। तया कळंक अपवित्र ।। येरवि जन निंदि नृपवर ।। त्यजिल प्राणा ।। ७६ ॥ मग हर ह्मणे अवधारी ॥ आयुष्या प्रमाण नरनारी ।। तेणे रचली सकळिकांचे शरिरी ।। शीवशक्ती ।। ७७ ।। शंकर ह्मणे रुषेश्वरा ॥ केवळ नर न करवे त्या नृपवरा ।। विवंचना जालि पूर्वसूत्रा ।। परि स्वप्रमाण पर नारि होईल तो नर ।। ७८ ॥ ऐसें बोलोन गेला हर ॥ तवं सुदिमन्य सोमवंशि प्रशवला तिघे पुत्र ।। ते वेळि राजा जाला तो नर ।। आवधिप्रमाणे ॥७९॥ मग आला आपुलिये नगरा ॥ तवं तिघे पुत्र जाले नृपवरा ।। ऐसि अवस्था संसारा।। जालि तया ।।८०।। ते तिघे सोमवंशि क्षेत्री ।। पुरुरवा रुतुध्वज रधिकु अवधारी ।। तयाचे वंशि गुणराज क्षेत्री ।। जन्मला तो ।। ८१ ।। सुरसेनाचा वसुदेव ।। वसुदेवाचा कृष्णदेवो ।। कृष्णदेवाचां रतिनाहो ॥ प्रद्युम्न तो ॥ ८२ ॥ प्रद्युम्नाचा विजयगढु ।। आणिक सांबु ।। सांबाचा चंद्र ॥ राजेश्वर तो ॥८३।। तो अद्यापि कनकमेरुचा पाठारी ।। राज्य करितसे निर्धारी ।। तयासि ते परी ।। प्राप्त जाली ।। ८४ ।। सोमसूर्यवंशासी।। हें येक मुळ गा दोघांसी ॥ परि घात जाला यादवांसी ।। द्वापारा अंती ।। ८५ ॥ पुर्वा पासोनि महाअंश ।। महाअंशाचा भीष्मजस ।। भीष्मजसाचा पूर्ण–पुरुष ।। शांतन तो ।। ८६ ॥ शांतनाचा चित्रविचित्र ।। चित्रविचित्राचा पांडु विदुर ।। धृतराष्ट्र तयाचे पुत्र ।। कौरव ते ॥ ८७ ।। पंडुचा अर्जुन ।। अर्जुनाचा अभिमन्य ।। अभिमन्याचा परीक्षिति नंदन ॥ परीक्षितिचा पारिक्षिती ।। ८८ ।। पारिक्षिति तो जन्मेजयो ।। जन्मेजयाचा आयास महाबाहो ।। महाबाहोचा वेणुवैश्य पाहो ।। महाराज तो ।। ८९ ॥ ऐसा जाला सोमवंश ।। आइका सोमवंशाचा प्रकाश ।। सांगितला सौरस ।। पृथकाकारें ॥ ९० ॥ सूर्यवंशाचे सुदिमन्याचे नंदन ॥ तेणे पितृलांछने त्यजिले प्राण ॥ अग्नि सुदिमन्य करोन तपसाधन ।। त्यजिले प्राण देखा ॥ ९१ ॥ ऐसे ते तिन्ही नंदन ।। त्याहि त्रिवेणि साधिलें योगसाधन ।। सिरें वाहिलीं जाण ।। सदाशिवासीं ।। ९२ ॥ इति श्रीचिंतामणीकौस्तुभपुराणे इश्वरपार्वतिसंवादे सूर्यसोमवं शोत्पतिकथाकथननामतृतियोध्यायः ।। ३ ।।
श्रीगणेशाय नमः ॥ तेणे मागुता जाला निर्वेश ॥ मग मागुता कोपला दिवस ।। ह्मणे समस्तांचा करिन निर्वेश ।। माझिया वंशा स्तवं ॥ १ ॥ तेथे जाला कल्पांत ।। अंत पाहों पाहे भुत-जात ।। थोर मांडला आवर्त ॥ चरांचराचा ॥ २॥ ऐसा कोपला आदित्य । तेथे जीव आपटे बहुत ॥ जाले हाहाभुत ॥ तिन्ही लोक ॥ ३ ॥ लोक पाहाति जीवन ॥ तंव जीवन जाये शोखोन ॥ ह्मणति प्रळये मांडला निर्वाण ॥ कोपला देव ॥ ४ ॥ तेथे अग्निचिया धारा ॥ गोपुरें नगरें जळति भरभरां ।। ऐसा जाला रगडा ।। चराचरांचा ।। ५ ।। जैसा घन वर्षे जळधारी ॥ तैसा तरणि वरुषे अंगारी ॥ तेथे कैंचि उरी ॥ चराचरासी ॥ ६ ॥ यैसा जाला अंत ।। थोर जाला हा भुत ॥ तवं जाले सावाचेत्त ।। तिन्ही देव ।। ७ ।। मग ब्रह्माहरिहर ।। आणि ते मिळाले सुरवर ।। आले सर्व मिळोन ।। अर्काजवंळी ॥ ९ ॥ मग देवीं समस्तीं ॥ मांडिलि अकांचि स्तुती ॥ जयजया तेजमूर्ती ॥ सूर्यनारायणा ॥ १० ॥ जयजयजी सहश्रमूर्ती ।। अंधकारनाशना गभस्ती ।। तुं कोपलिया त्रिजगती ।। कैंचि उरी ॥ ११ ॥ तुं कोपलिया सहस्त्रकर ॥ कैचें उरेल हें चराचर ॥ आणि तुज विण हा अंधकार ॥ केवि फिटे ॥ १२ ॥ तूं सर्व तेजाचें तेज ॥ उदो अस्त सहज ॥ आणि करिसी काज ।। भक्त-जनाचें ॥ १३ ।। ऐसि नाना परि करितां स्तुती ।। मग बोले गभस्ती ।। माजिया वंशाचि जालिया विण उत्पती ।। न सांडि वैर ॥ १४ ।। मग बोलिले त्रिमूर्ति ।। आही तुझिया वंशि करु उत्पती ॥ ऐसा बुझाविला गभस्ती ।। तिही देवीं ।। १५ ।। अर्कासि ह्मणे ब्रह्माहरीहर ॥ आह्मि तुझिया वंशि करु अवतार ।। मग तिन्ही देविं केला विस्तार ॥ सूर्यवंशी ॥ १६ ॥ अर्काचि जे निजशक्ती ।। त्रिकमळा नावें गुणवती ॥ तवं ते जालि रुतुवंती ॥ कवणेक वेळा ।। १७ ।। तीस रमला आदित्य ॥ तवं ढळलें तें रेत ॥ तेथे जन्मले समर्थ ।। तिन्ही देव ॥ १८ ॥ तेणे संतोषला सविता ।। नयनि देखिलें तिघां सुतां ।। महातेज सविता ।। विस्मयो करी ॥ १९ ॥ मग बोलाविला कश्यप ऋषेश्वर ॥ तेणे अर्का जाणविला विचार ।। तुझे वंशि विस्तार ।। जाला अर्का ।।२०।।