गेले सूर्यलोका ॥८४।। स्तविला सूर्य सर्व देवीं ॥ स्तुती केलि बरवी ।। उदो करि गा भुमंडळी ।। अर्कदेवा ।। ८५ ।। तुजविण राहिला व्यापार ॥ आणि जीवजंतु पीडलं थोर ।। आतां करि परोपकार ।। श्रीसूर्यदेवा ।। ८६ ॥ मार्तड, बोलिला तये वेळा ।। मी उदो न करिं भूमंडळा ।। जें जालें वंशकुळा ॥ तें करणे मज ॥ ८७ ।। मज देखतां बुडाला माझा वंश ।। तरि कवणं परी म्या करावा प्रकाश ।। मग बोलिला रुषिकेश ।। सुर्या प्रती ।। ८७ ।। पुनरपि होईल तुझा वंशविस्तार ।। मज घेणे सातवा अवतार ।। तेणे तुझा वंश पवित्र ।। होइल सहजें ।। ८८ ॥ तैसें चे प्रतिपादिति ब्रह्मा हर ॥ आह्मि करूं तुझिया वंशि अवतार ।। आतां चालवि वेव्हार ।। श्रृष्टिक्रम ॥ ८९ ।। हे ऐकुनि बोलिला सविता ॥ हें मानलें माझिया चित्ता ।। परि द्रुष्टि न देखतां सर्वथा ॥ न करि उदो ॥ ९० मग समस्त बोलिले ते अवसरी ।। तुज पुत्र होईल निर्धारी ।। मग तेथोन आले तिरी ।। चंद्रभागेचे ॥ ९१ ॥ तेथे आरंभिला संजिवनि-मंत्र ।। समस्त देविं शक्ति दीधलि अंशंमात्रु ।। तेथे सचेतन जाला पुत्र ।। मार्तंडयोंसी ॥ ९२ ॥ तेणे संतोषला गभस्ती ॥ सर्वेश्वर नावं जालें तयासी । तेणे उदो जाला महीसि ।। त्रिभुवनासि उदोकार ।। ९३ ।। ऐसा उदो करितां सहश्रमूर्ती ।। तेणे सुखी जाले त्रिजगती ।। संवत्सरा येका गभस्ती ।। देखिला नयनी ॥ ९४ ॥ तेणे आनंद जाला क्षिती ॥ नाना परिचे धर्म करिती ॥ वेदश्रुति पाठ करिती वेदमूर्ती ॥ आनंदले सकळिक ।। ९५ ॥ येक संवत्सर अंधकार ।। ह्मणोन लोपला होता चराचर वेव्हार ।। तो देखिला दीनकर ॥ वरुषा येका ॥ ९६ ॥ वीनविती सुर्या प्रती ॥ जीवने देति पुर्णाहुति ॥ ह्मणति तुं साक्षांत विश्वमूर्ति ।। नारायणा ॥ ९७ ।। तुज वांचुनि चराचर ॥ सांडिति आपुलें शरिर ।। तुं अस्त गेलिया संव्हार ।। होये सहजें ॥ ९८ ।। तुं त्रिकाळ त्रीमूर्ती ॥ सर्व देवांची तेजशक्ती ॥ तुझी यकादश महाभक्ती ।। नारायणा ॥ ९९ ॥ तुं निजतेजें समर्थ ।। तुं त्रिगुणात्मक भरित ।। कवणा कळं तुझा अंत ।। निज-स्वरूपा ॥ १०० ।। शिवशक्ति त्रिकाळमूर्ती ।। विश्वव्यापका तुं गभस्ती ।। नमो जी नमोस्तुती ॥ देवादिदेवा ।। १०१ ।। तुं निजतेज निर्विकार ॥ यावत् प्रळइं तुझा आधार ॥ चराचराचा वेव्हार ।। चालविसी देवा ।। १०२ ।। ऐसें स्तविती सभस्त ।। दाने देति बहुत ॥ धर्म जाला अद्भुत ।। पुढिल वृत्तांत आईका श्रोते ।। १०३ ॥ इति श्रीचिंतामणिकौस्तुभपुराणे ईश्वरपार्वतिसंवादे वंशउत्पतीकथानाम द्वीतियो ध्यायः ॥ २ ॥
श्रीगणेशाय नमः ।। मग ते ब्रह्माहरीहर ।। त्याहि त्या सर्वरुपा दिधला राज्यभार ॥ मग तया पासोन विस्तार ।। सूर्यवंशाचा ।। १०४ ॥ मग तया राज्य करितां भूपती ॥ कथा वर्तलि पुणती ॥ तो सूर्यवंशि राजा प्रतापी ।। महाक्षेत्रि दारुण ।। ५॥ तेणे त्रैलोक्य जिंतिला ।। सूर्यवंशी शक चालता केला ।। तो पुराणि वर्णिला ॥ व्यासदेवें ।। ६ ।। ऐसें राज्य करितां सर्वस्वरुपा ॥ पुत्र नाहि तयाचिया वंशा ।। मग रुषि बोलाविता जाला त्वरिता ।। सर्वस्वरुप तो ।। ७ ।। तेथे मिळाले समग्र ।। महारुषि पवित्र ।। कश्यपादि थोर थोर ।। आले तेथे ॥ ८ ॥ आला मार्तडयो पराशर ।। नारद अंगिरा तुंबर ।। पौलस्ति भृगु ब्रह्मपुत्र ॥ दालभ्यरुषि तो ।। ९ ।। आला मरंचि विश्वामित्र ॥ येकश्रृंगि प्रहृद अत्रि रुषेश्वर ॥ मिळाले अठ्यासि सहस्त्र ।। महाथोर रुषि ते ।। १० ।। देखोनि राजा संतोषला ।। शरणांगत ह्मणोनि नमस्कार केला ।। दंडवति चरणि लागला ॥ पुजिले अर्ध्यपांद्यी ।। ११ ।। बैसकार जाला समस्तां ।। मग राजा होये विचारिता ॥ कृपा करोनियां ताता ।। विनती आईका स्वामी ।। १२ ॥ जणे होईल पुत्रसंतती ॥ तो प्रयोग रचावा समस्ती ।। ऐसि केलि विनती ।। रुषि प्रती ।। १३ ॥ तें आईकोन वचन ।। रुषि स्थापिति यज्ञकर्म ।। जेणे करोन राजा समाधान ॥ पुत्रसंतति पूर्ण प्राप्त होये ॥ १४ ॥ तें मानलें राजयासी ॥ यज्ञ आरंभिला त्वरेसीं ।। सामग्री यज्ञद्रव्याची ।। करिते जाले ॥ १५ ॥ मग तेथे आरंभिला यज्ञ ।। नाना द्रव्यें हामिलिं जाण ।। पुर्णाहुति करोन संपुर्ण ।। आशिर्वाद देती ॥ १६ ॥ तें रुषिचें आशिर्वचन ।। तेणे रायासि जालें संतान ।। तीन पुत्र दारुण ॥ सर्वस्वरु पासिं जाले ॥ १७ ।। पहिला तो मनोत्तम ॥ दुसरा सुदिपन ।। तिसरा चित्रभान ।। राजपुत्र ।। १८ ।। तो महाबलाढ्य धनुर्धर ।। महाक्षेत्रि पवित्र ।। सूर्यवंशिचे नृपवर ।। महादारुण ॥ १९ ॥ ते महाबळिये महाविर ॥ तपें प्रसंन्न केला दिनकर ॥ मग जिंतिला अमरेश्वर ।। महाप्रौढी ।। २० ॥