आतां नाईत्या रायाचि कुळि सांगेन ।। आबु नाखवे कोकणि राज्य केले वरुषें १२ ॥ तयाचा पुत्र पाणि सावंत ।। तेण्हे राज्य केले वरुषें १३ ।। त्याचा पुत्र हंबिरखांन ॥ तेणे राज्य केलें वरुषें २७ ॥ त्याचा पुत्र सुरंगन ।। तेण्हे राज्य केले वरुषें ३२ ।। त्याचा पुत्र नसिलखां ।। त्याणे राज्य केलें वरुषे ३६ ।। त्याचा पुत्र हंबिरखां ।। त्याणे राज्य केलें वरुषें ४० ॥ त्याचा पुत्र डफरखां ॥ त्याणे राज्य केलें वरुषें ३० ॥ त्याणे माहिम पालटिलें ।। तो ठाण्यास राहिला ।। त्या उपर मलिक धुरदार त्याणे माहिमा राज्य केलें वरुषे १०॥ त्याउपर सकसिदसीर आरबा भाद्रपद निरोधे ईजार ३५ ।। तत्समइं माहिमा राज्य सीर गुजराथिचा पातस्या सुलतान आह्मदस्या त्याचा पुत्र डफरखां त्यासि नामजाद केलि ।। माहिमं ठाणे घेतलें ॥ माहिमा ठाण्या कोट बांधिला ।। त्याण्हे राज्य केलें सही ।।छ।।छ।।छ।।
वरुषें २५ ॥ देव चरित्र डफरखान प्रमादला ।। तेधवां मुलना हाफिस काजी लोक माहाजन खलक मिळोन डफरखान कबरेत घातला ।। लोक घरोघर आले ।। राजा बरा जाणोन लोक फार दुःखि जाले ।। जर डफरखान पडला ।। मग माहिम भंगलें ॥ मग राज्य गुजराथिचें सुलतानास जालें ।। त्याचि पेढि सांगतों ।। पहिला सुलतान आलावदिन पातस्या शहर गुजराथ चांपानेर पाटण तखत अमदाबाज ।। त्याची तोगिलखां २ ॥ त्याचा सुलतान पेरोजस्या ३॥ त्याचा सुलतान गिलयादिन ४ ।। त्याचा सुलतान बादुरस्या ५ ।। त्याचा सुलतान आमदस्या ६ ॥ त्याचा सुलतान माहामद बेगिड ७ ॥ त्याचा सुलतान मुदफरस्या ८॥ त्याचे पुत्र ५ वाड सिकादिर १ बाधुरस्या २ माहांमदस्या ३ चांदखां ४ सुलतान आहमदस्या ५॥ हे पातस्या ।। मुदल कबज ।। सुरल मारिवाने सीदर ।। वजीर मारीबाने नहजर।।छ।।छ।।
त्या उपरांत बाहादुरस्या मीराचे विलाथे फकिरा मध्ये होता ॥ तेथें फरमान धाडोन आणिला ॥ मग वजिर रहिमा मिळोन छत्रें धरिलीं ।। बाहादुर आणि सुलतान या दोघांसिं दुवा सर्व माहाजन वैश्य वाणि वजिर प्रधान खलक सर्व मिळोन दुवा बोलिले जे हे पातस्यायें माहामद दोघे बंधु बुध असती ।। सही ।।छ।।
त्या उपर निका मलिक अंबर पातस्याही त्याणे वजिर बाहादुरस्याचा धरिला॥ ती खबर बाहादुरस्याला कळली ।। तेधवां बाहादुरस्यान हेजिब पाठविला ।। जर आमचा वजिर धरला काये म्हणोन ।। तो लवकर पाठवणे ।। नाहितर युद्धास उभें राहाणे ।। हें आयकतां निका मलिकें जाब केला ॥ जर जो वजिर धरला आहे तो देत नाहिं ।। तुह्मी काल येणे असेल तर आज येणे ॥ हा जाब आईकोन सुलतान आणि बाहादुर हकारले ।। वजिर उंबराव लस्कर ४५००० दक्षणे वरि चाल केलि ।। बाहादुर दिवान निघाला ॥ ही खबर निका मलिकासि कळलि ।। तेणे राज्य सोडिलं ।। यावत् दक्षणेचि पातस्याहि काबिज केली ॥ तेधवां निका मलिकाचा पुत्र स्याहुसेन बाहादुरस्यासि भेटला ।। शरण म्हणोन सलाम केली ।। पातस्या बहादुर खुसि जाला ।। त्या शाहुसेनाला नावाजिलें ॥ मेघडंबर सुर्यापान छत्रि दिधली ।। जवळ बोलावोन खेम घेतली ।। पाठ थापटिली ।। आणि नावाजिला ।। मग सिंद गुजराथ अहिनळवाडा पाटण उरफ चांपानेरेत तखत अमदाबाज माहाराज राजाधिराज सुलतान बाहादुरस्या देखिला ॥ अनाइति राया पैकिं लाविला ।। ठाणेकोकण साहाबाज उडंगण माहिम बिंबस्थान यावत् देश काबिज केला ॥ भोंगळ मारिले ।। अमर वसई खालि जाली ॥ अमर हवाले जाली ।। बाहादुरपुरा वसविला ।। खान हांटदळिं दिवान राहिला ॥ ते समईं खानसाहेबे हवालदार व जमीदार देसाये वर्त्तक पाटेल चवघले अधिकारि चवदा माहालाचे खापणि गावोंगाविंचे बोलाविले ।। सर्व रयेत आईकोन खुसि जालि जर पातस्या दिवान आला ।। तेधवां खानबाहादुर बोलता जाला जर विलाथिची जमी आदाये सांगावा ।। तेधवां अधिकारि हर पुरो राणे पैकिं जाब केला ॥ सर्व जमी सांगितली॥ चवदा प्रगाणे माहालें आदाये हिंसाब सर्वाहि दिधला ॥ खाने आईकोन सर्वांसि नावाजिलें ॥ विडे द्यावया आदरिले ।। खाने विडा हातिं घेवोन देवों लागला ।। तेधवां आगासिचे वर्तक उभे राहिले ।। विड्याला हात वोडविला ।। तेधवां माहि मचा राणेपैकिचा हरद पुरो अधिकारि बोलिला ।। जर खानसाहेब जाब जीसका मान उसकु बडे कों बडा ॥ तेधवां खाने हात आटोपिला ॥ पुसता जाला ।। जर प्रथम विडा कोण्हास ।। तें देखोन आगासिचे वर्तक अधिकारि यांसि वेवाद लागला ।। वर्तक म्हणति हम बडे ।।