धौंडि नायक, पौतमक्ष-गोत्री, त्रिप्रवर, यजुश्याकि, देशस्त, शामक्षेत्रकर, कुळस्वामिण यकविरा, सेनादिपति, कुळगुरु शेषवंशाचे, वतनदार पसपवलि, वसइचे स्थळगुरु, सांडोपारवाडि वतन ईनाम बाहदरस्या पादशायाचा, वैद्यराज बादश्यायाचें, रामनायकपासोन ३ तीसरि पेढि ।। व तथा आंबनायक कावळे, यजुशाकि, देशस्त, पैठणकर, गोत्र भारद्वाज, पंचप्रवर, कुळस्वामिण येकविरा, सरदेसाय चवदा प्रगाण्याचे, वतनदार पाहाडग्रामाचे, ईनाम श्रीबिंबाचे, वृतिस्थळ मालाडखापणे, कुळगुरु सोमसूर्यवंशांच, रघुनाथपंतापासोन चवथि पेढि ॥ केशव रामाचार्य देवधर, प्रधान, यजुशाकि, पैठणकर, गौत्र सारंग, पंचप्रवर, कुळस्वामिण येकविरा, राजप्रधान ।। व विठोबा नायक छत्रे, यजुशारवी, देशस्त, सौनक गोत्र, त्रीप्रवर, कुळस्वामिण योगेश्वरी, वृतिवंत मुंबैचे।। वामन पंडित चामरे, भार्ग वगोत्रि, पंचप्रवर, यजुशाकी, देशस्त, पैठणकर, पुरोहित राजवंशिकाचे, वृतिवंत कांबेठाणेचे ।। आणिक वृतिवंत ठाइंठाईचे देशस्त व गोंवर्धन व गांधर्विक ।। ह्या समस्त विप्रांचे संमते हा धर्म सांगितला ।। ते समई नायकोराव मालाडचा देसाय, व जिवाजी देसला मरोळचा, दादसावे आगासिचे, पोस ठाकुर बेलवडिचे, दादचुरि केळवेचे, रतनसावे मुळगांवचे, केशव पाटेल दादरुत, माहिमचे रामपाटेल नाम राउत, देवचोरघे पापडिचे, सोमजी ठाणेकर, विठोजि सुतार वडकर, बाबु राणा, रघु पुरो मुकुंदप्रभुचे, मुख्य नामांकित द्रव्यवंत व समस्त आद्य पेढिजाद यांस सर्वांस धर्म सांगितला ॥ मानला ।। फार संतोषि जाले ।। कुळगुरुस अर्ध्यपाद्यपूजा केली ।। वस्त्रें अळंकार दिधलें ।। सर्व ब्राह्मणास यथापत्र दक्षणा वांटिल्या ॥ क्षेम आलिंगने जालीं ॥ पहिरावण्या येकमेकास संपादिल्या ।। त्या सांकल्य सांगतां लेख फार होईल ।। हें सर्वं केशवाचार्य हस्ताक्षर वंशपध्यति या संमति पूर्ण जाली ।। संवत् पंधरासें पांच व श्रीराजेंद्रचक्रचुडामणि-शाळिवाहन शके एकसहस्त्र व तीन वरुषें सत्तर माहे फाल्गुन वसंतरुतौ हा संप्रदायें माहालजापुरि मिळोन महजर सर्वांसिं दीधले ॥ व हें वंशावळि लीहविली या उपर दुसरा वृतांत जाला असे तो लेख आतां सांगतों या प्रतिवर ते हि प्रत चढेल ते आइकाः ।। छ ।।
त्या उपरांत सोई ठाकुर व शिव ठाकुर हे दोघे देसले जाले ।। तेधवां पोईसरकर पालवण येकसारकर कडुपण न ले च ह्मणोन नातवा भाचियास दीधलें ॥ त्यासि वृत आंकुलवलिची जाली ।। म्हणोन कडुपदअंकुल-वारिस आलें ।। मग नवसारिये दिवान फिरले ॥ तेणें सर्व आपलि सत्ता केली ।। सीव ठाकुर व सोईठाकुर देशले नेले ।। मालाडखापणें मरोळखापणें ईले–पाडलें सत्तावन गांव ५७ त्याचा खंड घेवो आदरिला आधिकारि चौघले नेले ॥ मग सर्व मिळेान नवसारि खालिं विलाथ माहिम यावत् ठाणे-कोकण चवदा माहाले दोन खापणे प्रगणें १४ या विलाथिचा सीध वो भरिला ॥ माहिमचं राज्य लाहुरशासिं जालें ।। तें राज्य लाहुरसें माहिमा केलें वरषें २ ॥ मग देसल्याचि कुळि यका पासोन येक ॥ शीव ठाकुराचा कान्ह ठाकुर ।। त्यासि पुत्र २ ।। वाड पुत्र देव देसला ।। धाकुटा वाल्ह देसला ।। याचि वंशावळि ॥ देव देसल्याचा पुत्र बाण देसला ।। त्याची माता केमाई ॥ तिचा पुत्र नाउरचे ठायाचा आईतोळा ।। त्याचें नावं नाग म्हातरा ।। या ठायां आला ह्मणोन ह्मातारेपण पालटलें ॥ नावं ठाकुर जालें ॥ त्याचा पुत्र परसोजी ।। बाण ठाकुराचा पुत्र शीव ठाकुर ।। तो दिगंबर जोगियाचा प्रसादु ॥ त्याचा पुत्र कान्ह ठाकूर ॥ त्याचा बाळ देसला ॥ त्याचा हरीपाळ देसला ॥ त्याचा कान्ह देसला ।। त्याचा गणपत देसला ।। तो गणपत देसला देसलिक हरठाकुरासि वीकित होता ।। तेधवां पालवणकर पोईसरकर आंकुलवलिचे कडु ।। गोंद राउत आंब राउत ।। येकसारकर देसला पोस म्हातरा ।। कांधवळिचे चोधरि समस्त व ब्राह्मण पोस नाईक व आचार्य यैसे समस्त घेवोन गणपत देसल्याचे घरि येवोन हर देसल्यान बरवा मुहूर्त पाहोन गणपत देसल्याचे घरि गेले ॥ पाहाडकर व पसपवलिकर समस्त मिळोन पाट पासवडिला ॥ गणपत देसला पाटावर बैसविला ॥ समस्तें म्हणितलें जर ही देसलिक तुह्मांसि च उक्त, तुह्मी असतां दुसरा कराल तेघवां आमचे वृंद वेर्थे ।। ह्मणोन अक्षता लाविल्या ।। ब्राह्मणि आशिर्वाद दिधला ।। मग सर्वांहि ह्मणितलें जर कढु पालवणकर देसले रहीत या सर्वांहिं गणपत देसला मानावा ।। याचे शब्दाखेरीज जो होईल तो देसा खेरीज ।। ऐसें बोलोन मुख्य देसायाहि गणपत देसला जोहारिला ॥ मग समस्तांहि जोहारिला ।। हरदेसाय व समस्त देस पालवणकर कडु समस्त मिळोन गणपत देसल्या गंधाक्षता भरिया ।। ब्राह्मणे आशिर्वाद केला ॥ समस्तांहि नमस्कारिला ॥ ऐसा गणपत देसाय देसला जाला ।। समस्तांसि टीळा विडा जाला ।। आज्ञा मागोन देसले घरोघरि गेले ।। या उपर माहुलिचे राणे पैकिल कान्होजी ३०० मनुष्यांसि मरोळास आला ।। पाणि सांवतासि भेटला ।। स्थळ मागता जाला ॥ जर आपण राणे पै कि ।। राज्याचा आधकारी आपण ।। येथें राहोन आपल्यास ठिकाण घर बांधावयास जागा घोडसाळ आणिक साहार पाखाडि ।। आहारवडि आंतिचा पदक त्याची कंन्या तिचे उदरि पुत्र दोन जाले ।। ते परवंशा ब्राह्मणाचे ।। केशवरावाचे प्रधानाचे ।। त्यासि ब्राह्मणें संध्यासूत्र सांगितलें ।। त्या दोघां पासुन वंश चालिला ।। तो सांगितला असे ।। सांप्रत वंश ह्मणोन नामाभिधान परबिज ।। छ ।।