मग भागडचुरि मारिल्या उपर त्या सीमल ह्यातरेयान त्या तांडलासि घेवोन देसल्या दादरुता जवंळ आले ।। वृतांत ह्मात-यान सांगितला ।। जर हा गोमतांडेल फार उपकारला ॥ यासिं आपण जातिंत घेवों केला ॥ आणि यासिं कन्या कुळिची देवों केली ।। तर तुह्मी देसले ह्मणोन दिधलें वचन पाळावें ॥ जर ज्याणे कांदरडाहि उडि घालोन पालकोईतिसी भागडचुरि आणि त्याचा गुमस्ता हे दोन खुन केलें ।। तें आईकोन देसला खुसि जाला ॥ तांडेल आपले मुखिं वाखाणीला । मग आंब नाईक आणि पोस नाईक बोलावोन आणिले ।। वृतांत सांगितला ॥ त्याही प्रायश्चितें नेमिली ॥ मग ज्ञातिन सरता केला ।। गोत्र दिधलें ।। दरम्याचि कंन्या त्या तांडलास दिधली ।। गंधर्व-विवाह केला ॥ मग त्या तांडलाला नावं गोविंदजी दीधलें ।। गोत्र कश्यप ब्रांह्मणि दिधलें ॥ तेधवां त्या तांडले अर्ज देसल्या प्रत केला ।। जर मला वृत वेगळि देणे ॥ मग देसल्यान वृती बेलवडी १ खारवडी २ केतकवडी ३ ऐशा वृति देवोन तांडेल तेथे स्थापिला ।। आपल्या सरसा केला ।। या उपर पाहाडकरि आंब नाईक व पोस नाईक याहि अर्ज केला जर आह्मि खर्च १६० ळास्या फद्यांचा सोंचि लात ।। तुह्मी देसले असतां ब्राह्मणाचे चंडिस वाळावें ।। तेधवां त्या दादरुतें त्या ब्राह्मणासि सेत नवजाळें उंबरवडि यावत् गळवंड आपखपाणख ये इतकि सेतें दिधली ।। ब्राह्मण सुखिकेले ।। यानंतर पोईसकरांला उचित होणे भाग च्यार ऐसें सर्वांसि सुखि केलें ।। मग पाचंबा देवि होवोन निघाले ।। सर्व समुदाये गाविं आले ॥ तेधवां तुरेल चातुरें वाजवित पुढें आला आणि मालवणिचा माळि फुलें घेवोन पुढें आला ॥ उचित देसल्या साउमा उभा राहिला ॥ त्याचे सवें राम सावात्या माळियाचा सोहिरा तो हि देसायासि भेटला ।। त्या देखोन देसला विचारों लागला जर तूं कोण कोणाचा ।। जाब साव्यान केला शरण रक्षाल तरि सांगेन ।। देशला बोलिला जो कांहि शरण त्यासी निर्भय आहे सांगतां विलंब न करावा ।। तेधवां रामसवा बोलिला जर आह्मि भागडचु-याचे सोहिरे माझि वृत तेथे आहे ह्मणोन येणे जालें ॥ मग त्या देसल्यान त्या माळियासि वृतिचा पैका दिधला ॥ त्यासि आज्ञा केलि जर तुं येथें न राहावें ॥ मग त्या माळियाचि कंन्या देसले सोम ठाकुरासी देवविली ॥ ते चि सोहिरिक जाली ॥ छ ।।
त्या उपरांत सीव ठाकुर व सोई ठाकुर हे दोघे देसले जाले ।। तेधवां पोईसरकरांसि पालवण ॥ येकसारकर कडु ॥ त्यासी कडुपण न चाले ॥ ह्मणोन नातवां भाचयांसि दीधलें ॥ ते वेळि वृत आंकुलवलिची जाली ।। ह्मणोन कडुपण आंकुलवलिसिं आलें ॥ मग नवसारिये दिवान फिरले ॥ तेणे सर्वांचा सिधावो घेतला ॥ खांडियाचें जोर जीकला ।। बळें अधिकार केला ॥ त्याणे सीव ठाकुर व मोई ठाकुर देसले नेले ।। त्या पासोन मालाडतपा मरोळतपा पाडलेकर यांचा खंड घेतला ।। आणि अधकारी नेला ॥ चौघे मिळोन नवसारि खाली विलाथ जे माहिम यावत् ठाणेकोकण चवदा माहालें माहिमा खालीं त्याचा सिधावो घेतला ॥ त्या माग राज्य लाहुरस्यासिं जालें ॥ राजा माहिमासि आला ।। लाहुरस्यें (राज्य) केलें वरषें ९ ॥ मग तें राज्य आलि नाखवासि दिधलें ॥ आलि नाखवा चापाणिर सांवत-राज्य माहिमचें करो लागला ।। तेणे कोट बांधिला ॥ त्या कोटा बदल वृति वाडिया ५ बकसिस दीधल्या ॥ त्या वाडियांचि नावें ॥ तबसी १ देवळाची २ खोंपेश्वराची ३ घोडभाट ४ सीरसाळी ५ ह्माता-यासिं बकसिस दीधल्या ।। छ ।। छ।।