क्षेत्रिपंचानन ॥ जे ना गवसति कवणा लागुन ।।
ज्यांची कीर्ति त्रिभुवन ।। फाकलि असे ।। ८४ ।।
ज्यांहि सोमयाग केला ।। जिहि अश्वयाग संपादिला ।।
ज्याहि नरयाग सांगितला ॥ शास्त्रयुक्त ॥ ८५ ॥
ज्याहिं पृथ्वि जिंकिली ।। दैत्यकुळें निर्दाळिलीं ।।
जयजयकारें गर्जली ।। मही जयांसी ॥ ८६ ।।
ज्याहि धर्म रक्षिला ।। देवांचा बंद सोडिला ।।
आपला धर्म चालता केला ।। गौब्राह्मण रक्षिलें ।। ८७ ॥
ज्या वंशि अवतार जाले ।। साक्षांत विष्णु अवतरले ।।
रामकृष्ण प्रवर्तले ।। जया वंशि ।। ८८ ॥
उत्तम क्षेत्रि दोनी वंश जाण ।। आणि तीसरा शेषवंश सुजाण ।।
शेष पाताळे नांदतो आपण ।। ज्याणे पृथ्वि धरियेली ॥८९॥
तो शेष सर्वा माजि उत्तम ।। जयाचा विलासि नारायण ।।
ब्रह्मक्षेत्रि महानिपुण ।। राजाधिराज ॥ ९० ।।
ज्याणे अवतार धरिले ।। विष्णुसवें बिजें केलें ।।
महिमंडळि राज्य भोगिलें ॥ ते कथा पुढें सांगेन ।। ९१ ।।
आतां शोमवंशिचे नृपवर ॥ जे दक्षणे आले धनुर्धर ।।
त्याचि गोत्रें प्रवर ।। सांगेन ति आइका आता ।। ९२ ।।
प्रहृद १ त्रीप्रवर ३ योगेश्वरी | बकदालभ्य १ पंचप्रवर ५ प्रभावती |
जमदाग्नि २ पंचप्रवर ५ येकविरा | कौंडण्य २ त्रीप्रवर ३ कुमारिका |
अत्रि ३ त्रीप्रवर ३ माहेश्वरी | पद्माक्ष ३ प्रवरसप्त ७ जोगेश्वरी |
नारद ४ पंचप्रवर ५ त्वरिता | सास्वन ४ त्रिप्रवर ३ महालक्ष्मी |