आधि च हो ति नग्न ।। मनि शंकलि दारुण ।।
हृदइं स्मरिला पंचवदन ॥ तो ततक्षाण पावला ।। ६३ ।।
वस्त्र लेवविलें अनुपम्य ।। सन्मुख राहिला त्रिलोचन ।।
पुसे क्षेत्रिया लागुन ।। तुं कवण होसी ॥ ६४ ॥
येरु बोलला मी भृगुनंदन ॥ नावं माझें विचित्रविर्य जाण ।।
सूर्यवंशि नृपति पूर्ण ।। जाणे सत्ये ।। ६५ ।।
ऐकोनि तयाचें उत्तर ।। बोलता जाला कर्पूरगौर ।।
निर्लज्य होउनि नागर ।। धरिली तुवां ।। ६६ ।।
तुं नव्हसि सूर्यवंशिचा क्षेत्री ।। महा-अपवित्र दुराचारी ।।
निरापराधें धरिली नागरी ।। का रे पतिता ।। ६७ ॥
निष्ठुर शब्द ऐकुनी ।। वीचित्रवीर्य खोंचला मनी ।।
जैसा घृतें सिंपिला अग्नी ।। तैसा कोपला ॥ ६८ ।।
म्हणे तुं कवण होसी ।। मज पुढा पैजा बोलसी ।।
युद्धी सन्मुख जरि राहासी ।। तरि चे सत्य ।। ६९ ॥
जाईं येषुनि त्वरिता ।। नाहिं तरि मुकसि प्राणासि आंता ।।
म्हणोन वोढिता जाला त्वरिता ॥ तया नागरिसी ।। ७० ॥
शंभु कोपला दारुण ॥ त्रिशुळि हाणितला वीचित्रविर्य जाण ।।
हृदइं रुतला त्रिशुळ खडतरोन ॥ तेणे गेला चाचरी ॥ ७१ ॥
क्षणेक मूर्छना आली । अष्ट दिशा झांकोळली ।।
सुर्यासि चिंता वर्तली ।। मग उतरला आकाशिहुन ।। ७२ ॥
अमृतदृष्टि विलोकिला ।। वीचित्रवीर्य सावध जाला ।।
धनुष्या हात घातला ।। साहे म्हणोनियां ।। ७३ ॥
वीचित्रवीर्य क्षेत्रि दारुण ।। संग्रामि प्रवर्तला पंचानन ।।
शर वर्षला अमित्य संधान ।। महादेवा वरी ।। ७४ ।।
त्रैलोक्यनायक निवारी ॥ वीचित्रवीर्य अचुक संधान करी ।।
जैसा स्वापदा वरि केसरी ।। तैसा प्रवर्तला ।। ७५ ।।
युद्ध जालें घोरांदर ।। पिनाक जिंकिला सत्वर ।।
प्रसन्न म्हणोनियां कर्पूरगौर ।। बोलला वचनी ।। ७६ ॥
Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Published in
महिकावती (माहिम)ची बखर