खालि च्यार लक्ष हिरण्य ॥ रायें ठेविलें आपण ॥
प्रधानास आज्ञा करोन ॥ ठेविलें असें ।। ७ ।।
विश्वनाथ नाईक यजु:शाखि ।। त्यास राज्यान केलें सबनिस ।।
त्यास माहित सर्व स्थानें किं ॥ त्या प्रमाणें लिहिलें असे ।। ८ ।।
आणिक सांगतो येक ।। आगाशिचे पश्चमे कडे तटाक ।।
वासुंदरें नाम देख ।। त्यांत पात्रक असे ॥ ९ ॥
दक्षण पाळिस जाण ॥ चिरे मृत्तिका हे कठिन ।।
नाहि ठेविलें कारण ।। पुन्हा हां न्यावयाचि ॥ १० ॥
वांदरें वरि विस्तीर्ण ॥ तेथें डोंगरि येक जाण ।।
तिचें नांव सेलिन ।। तिचे मस्तकिं ॥ ११ ॥
आहे येक XXX लोखंडी जाण ।। त्यांत दोन कोटि मोहोरा भरोन ।।
ठेविला रखवालिस जाण ।। जनार्दन भास्कर ॥ १२ ॥
ऐसिं धनें गुप्त फार ।। जागो जागां ठेविलि फार ।।
त्याचें करोन टिपण पत्र ।। आपले ताईतेंत ठेविलें असे ॥ १३ ।।
म्हणे लक्षुमण ॥ उघडें करावें हें न कारण ॥ याज करितां दुसरिं स्थानें ।। गुप्त ठेविली ।। १४ ।।
मोरोसि पर्वत थोर ।। तेथें खडक असे किर ।। त्यास छिद्र वर्तुळ ।। अपूर्व किं ।। १५ ।।
त्याज वर खुण ।। पाउले चर्मपूर्ण ।।
लहान थोर जाण ।। लिखितार्थ येक असे ॥ १६ ॥
त्या खडकाचे दक्षण भागें ॥ कढई येक निके ।।
तये मध्यें मोहोरा सिके ।। चार लक्ष भार असे ॥ १७ ॥
दुसरि पूर्वे कडिल खुण ॥ साडे तिन वाळे जाण ॥
ते वाचितां परिपूर्ण ॥ नीधान असे ॥ १८ ॥
खडखास भयंकर फार थोर ॥ मिरें सेजारि डोंगरि ॥
तेथे डोंगरि वरि ॥ रायें ठेविलें पांच कुंड ॥ १९ ॥
कासिया मागें पूर्वदिसेस जाणा ।। येक कुंड बांधिले जाणा ॥
उदक सुंदर पूर्ण ।। तये कुंडि ॥ २० ॥
तेथे द्रव्य सांठविलें जाण ॥ रायें आपुलें अनुसंधान ॥
करोन ठेविलें जाण ॥ प्रताप दावावयासिं ॥ २१ ॥
वरसावें बोरभाट जाण ॥ तेथें खजीन्याचें केलें स्थान ॥
तेथें द्रव्य असंख्य सुवर्ण ॥ रायें ठेविलें ॥ २२ ॥
तेथें यक पाटांगण ।। सिळा आहे जाण ॥
तये वरि लिखित जाण ।। करोनि ठेविलें उफराटें ।। २३ ।।
अक्षरें उफराटिं लिहिलिं जाण ॥ त्या वरिं चंद्रसूर्यांचे स्थान ।।
येक गर्धव जाण ।। स्त्रिये वरि ॥ २४ ॥
Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Published in
महिकावती (माहिम)ची बखर