६ वी नोंद
हरीचंद्र. पी. लश्मन. आ. नाना. दीनाचा पुत्र परश्राम.
भा. मदन. सा. चु. धर्मा नथु. मा. सानुकुबाई. सा.
मागेले ताडेले. कुं. ताबाळी-गा. धीवली. ता. माहींम.
४ थी नोंद
लक्षुमण पी बिलु आ. झानु पत्रु सुकल्या भा.
गोपाळ या आंगुचे राम व. सोमवार व पांडु माता
पुरुबाई* सा. स्त्री जानकीबाई सा. जात मांगेले तांडेले
आ. पाकधर गांव घविली ता. माहीम जि. ठाणा. प्र.
चींचणी तारापूर
११ वी नोंद
कबरीबाई ध. आत्माराम स. का-या आ. धर्मा पुत्र काळु
समागमे देर चंदु व सेउली चु. सा. वठल व सुख-या
चा सेपरु चा नामजी वीठलचे बली व चंद्रकोर सासु
सीमाबाईं समागमे मागेले कुळी तांबोळी गांव घविंली.
११ व्या नोंदी नंतर खालील दस्तूर खुद्द आहे:-
हे नावे ११ अकरा याला गवीदार सखाराम अनंत
शुक्ल व आन्नाजी नानाजी चंद्रात्रे हे दोघे बराबर
असे ह॥ अक्षर गोविंद माहादेव शुक्ल द॥ खु॥
ह्या चार नोंदींत तीन प्रकारचीं नांवें आलीं आहेत. कृष्णा, रामचंद्र, बाबू इत्यादि नांवांचा पहिला प्रकार. शिनिवार, सोमवार, बुधी ऊर्फ बुधवारी ह्या वारप्रत्ययान्त नांवांचा दुसरा प्रकार. आणि सेऊली, सेपरु, बिलु, ह्या नांवांचा सरा प्रकार. पहिल्या प्रकारचीं नांवें नित्याच्या परिचयांतील पौराणिक ऊर्फ आधुनिक आहेत. दुसच्या प्रकारची नांवें आंध्र व तेलगू लोकांतील कांहीं जातींत प्रचलित आहेत आणि तिस-या प्रकारचीं नांवें पाणिनीयकालचीं आहेत. शेवलसुपरिविशालवरुणार्यमादीनां तृतीयात् (५-३-८४) या सूत्रांत जो शेवल शब्द येतो त्याचा अपभ्रंश सेउली हा शब्द आहे. इल या शब्दाचा इलु, विलु बिलु, हा अपभ्रंश आहे. आणि सुपरि किंवा शुन:- शेफ ह्या दोन्ही शब्दांचे अनुकंपादर्शक व -हस्वत्वदर्शक अपभ्रंश सुपरु व सेपरु हे आहेत. शेवल, सुपरि, शुनःशेफ, इल, हीं वैदिक नांवें ज्या कालीं प्रचारांत होतीं त्या कालीं हे मांगेले-तांडेले लोक विद्यमान होते असा अर्थ ह्या शब्दांच्या योजनेचा होतो. तसेंच ज्या तेलगू किंवा आंध्र जातींत शिनिवार, आइतवार, सोमवार, बुधवार ही वारप्रत्ययान्त नामें आढळतात त्या जातींशी ह्या मांगेले- तांडेले जातीचा कांहीं तरी संबंध असावा असा तर्क दुस-या प्रकारच्या नांवांच्या योजने वरून करावा लागतो. कोंकणांतील व देशावरील कोणत्या हि इतर हिंदू जातींत बुधवा-या आइतवा-या इत्यादि नांवें नाहींत, तेव्हां हे मांगेले लोक इतर हिंदू जातीं बरोबर कोंकणांत वसाहत करण्यास आले नाहींत हें उघड होतें.