Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

श्री.

दुस-या बाजीच्या राजवटीच्या आरंभाचीं कांहीं विश्वसनीय टिपणें.

शके १७१८ नलनाम संवत्सरे सुरुसन सबातैन मया, व आलफ, सैन १२०६, संवत १८५३, राजशक १२३, इसवी १७९६ व १७९७.

१ बाळोबा पागनीस निसबत शिंदे यांणीं विच्यार केला कीं नाना निघोन गेले. बाजीरावसाहेब यांचा इतदार नाहीं व हे राज्याचे उपयोगही नाहीं व नान बाहेर असतां आपण बंदोबस्त करूं ह्मटलें तरी आपले विचारांत भोसले, होळकर वगैरे सरदार व मुत्सदी येणार नाहीं. हे प्रकर्ण सारें असेंच ठेऊन हिंदुस्थानांत जावें तरी नाना सरदारी बुडवीतील; तेव्हां कोणीतरी श्रीमंतांचे दवलतींतील पुढें करून त्याचे माथा कारभार ठेऊन आपण कांहीं जाहागीर व खर्चास घेऊन येश मिळवावें अशी तजवीज करूं लागले, तेव्हां बहिरोपंत मेहंदळे व राघोपंत थत्ते यांचे मार्फतीनें परशुरामभाऊ यांशीं बोलणें लाविलें. तेव्हां परशरामभाऊ यांनी सांगितलें कीं बाजीरावसाहेब कोणाचे विचारांत चालतील न चालतील ही तुमची खातरजमा झालीच आहे. याजकरितां आःह्मी या कामांत येत नाहीं व आह्मीं सरदार; कारभार आमच्यानें होणार नाहीं. नाना बाहेर आहेत त्यांस तुमचा भरवसा नाहीं, व सर्वांचें लक्ष माधवरावसाहेब यांचे वंशाकडे व नानाकडे आहे. तेव्हां कोणी अनुकूल होणार नाहीं. याजकारतां बाजीरावसाहेब यांस अटकाव करून चिमणाजी आप्पास, माधवरावसाहेब यांस दत्तक दिल्हे तरी सर्वांचें एक लक्ष होईल असें परशराभाऊ यांचे बोलणें नानाचे रुकारानें पडलें. त्यावरून बाळोबा पागनीस यांणीं विच्यार केला कीं उभयतांस त्याचे हवालीं केलें तरी आपले हातीं कांहीं राहात नाहीं;