मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)

लागला गोविंद नायकी विज्यापुरास जाऊन अर्धी बाकी सोडविली प्रभावलीची खोती मीरास फर्मानी व वैझर बुll ताl देवरुख हा गाव इनाम घेतला सिवाजी बधूस बरोबर नेऊन साहा हजार लाहारी खर्चून त्याचे नावे कलेसी व सेवी तर्फेचे फर्मान घेतले खर्च आपण देऊन कलेसी व सेवीची देशमुखी विसाजीस दिला आणि वडीलाचे वतनास सबध नाहीसा केला विसाजी तिकडेस च राहिला अतोवा नायक निरतर प्रभावलीत राहिले गोविंद नायकास पुत्र केशव त्याचा पुत्र नर्सोवा नायक त्याने मावलगेयाचे च्यार विभाग करून एक देवलेकरास एक सैतवडेकरास ऐसे दिले आपण दोन घेतले इतर दायदास कोणास कोड कोणास आगरे सेते इनामती देऊन समजाविले विज्यापुरास जाऊन लवल्याचा कोड इनाम आणिला नरसो नायकास पुत्र च्यार केशव नायक एक १ गणोवा नायक एक १ माहादोवा नायक एक १ नारोवा नायक एक १ १ केशव नायकी फार पराक्रम केला विज्यापुरी साहा वर्षे होते गणोवा नायक प्रभावलीस राहोन सरदेशमुखीचा कारभार करीत असता माहादोवा लवल्याच्या कोडात राहिला त्यास लवलेकर च ह्मणत त्यास पुत्र आपण सोमाजी केशव नायकी अडीच हजार होन दर्बारखर्च करून दाभोलसुभाची सरदेशमुखी व दोन गाव फर्मानी करून घेतले प्रभावली प्राते मुचरी इनाम घेतली हक्क व लाजिमा ज्याजती करून घेतला दिवाणातून प्रभावली प्रात इजारा तिसाल केला टोलक्रात जाहाली सपूर्ण आगरे मोडली त्या मुले दोन वर्षात पचावन हजार लाहारी नुकसान आले दिवाणातून वराता जाहाल्या ऐवज नाही सारी हके इनामती अमानत केल्या बाकी बदल केशव नायकास खीलण्या गडा वर घातले मग गणोवा नायकी विज्यापुरास जाऊन दीड वर्ष राहोन तिजाई बाकी सोडिली हके इनामती सोडविल्या रीण घेऊन निमे बाकी वारिली बाकी राहिली त्यास ऐवज नाही मग सारे गोत्रज मिलोन आठ हजार लाहारी बाकीस दिल्या मग केशव नायक सुटले नारोवा नायक बधु त्याच्या स्वाधीन दोन वर्षें व