मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)

तेथे शाहाजीराजाची भेटी घेतली त्यास कर्‍हाडीचे देसमुखीची हकीकती सागितली ते वख्तीं यादव व शाहाजीराजे यानी विचार करून दगा देऊन आपला अजा नरसोजी जगदळा मारिला आपला बाप व आपला चुलता होता त्याउपरि शाहाजीराजानी पिसळे ह्मणून एक महराटे चाकरीस ठेविले होते त्यास लावून देऊन मसुरीचे मोकदमीवरी दावा करविला आणि मसूर परगणा शाहाजीराजाने जाहागीर घेतली आणि मसुरीच्या कोटामधे आपले ठाणे ठेविले ते वख्ती पिसळ्यास लावून देऊन मसुरीची पटेलगी व देसमुखी अमानत केली आणि दादाजी कोडदेऊ शाहाजीराजाकडील सुभेदार त्यास सागोन पिसळ्यास व आह्मास गोत लावून दिल्हे जे परगणे पाटणीचे स्थळी खाने अजम लाडीखान हवालदार कर्‍हाडीचा व पाटणीचा एक च होता त्याने मसूरपरगणाचे पाटील व हक्कजवारीचे गोत व कसबे मसूरीचे बैते बलूते ऐसे मेळवून पिसळे व आपला चुलता व आपला बाप यापासी जमान घेऊन गोताने निवाडा केला की जगदळेयाची मसूरपरगणाची देसमुखी व कसबाची पटेलगी खरी असे ह्मणोन गोही दिल्ही व कदीम भोगवट्याचे कागदपत्र फर्मान होते ते मनास आणून पिसळे खोटे केले तेव्हा पिसळे बोलिले की, आह्मास भोसल्यानी व घोरपड्यानी स्थळी उभे केले, आपण भोसल्याचे चाकर असो, आपल्यास मोकदमीसी काही समध नाही ऐसे यजितपत्र लेहून दिल्हे तेणेप्रमाणे लाडीखान हवालदाराने हक्कजवारीचे साक्षीनसी माहजर करून दिल्हे ते वख्ती देसमुखी व पटेलगी पनाळा अमानत होती मग आपला चुलता तानाजी हा सुलतान महमूद पादशाहा यासी जाऊन दुमाला फर्मान करून घेतले पनाळाच्या किल्लेदारास ताकीद घेतली त्याउपरि भोसल्यानी ठाणातील लोक काढून पिसळ्याचे नाव सारून आपला चुलता तानाजी जगदळा जिवे मारिला आणि मागती देसमुखी शाहाजीराजानी आपल्याकडे घेतली आपला बाप पटेलगी करून होता आपला जीव वाचवून देसमुखीचे ना काढिले नाही त्याउपरि भोसल्याची जबरदस्ती देखोन आपला जीव वाचवून होते त्याउपरि शाहाजीराजाचा लेक शिवाजीराजा जाहाला त्याने पुडावा करून पादशाहासी बिघाड केला ते वख्ती आपला बाप पादशाही फौजास मिळोन देसमुखीचा मजकूर करून देसमुखीचा हक्क घेऊ लागला अबदुलखान हा जाउलीत बुडविला, तेथे भोसल्याच्या सरदारानी पाळत करून वसतगडीहून स्वारी जाऊन, ते ठाणे घेरुन, आपला बाप दस्त करून, वसतगडास आणिला, आणि त्याची गर्दन मारिली ते समयी आपले नेणतपण होते आपण धाकुट होतो