मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)

ह्मणऊन बोलिला मग तेव्हा माहादजी पाटील चरेगाऊकर कोकणात पळोन गेला आणि कुमाजीराऊ चिगलीस पळोन गेला मग तेव्हा इसाबखान मसुरास येऊन पैके उचलू लागला मग किलबर्ग्यावरी व मुजूमबादेस पादछाव आले तेथे त्यानी तीन गुमट बाधिले मग विजापुरास आले तेथे हि कोट बाधू लागले तेव्हा देसमुखासी व देसपाड्यासी व पाटीलकुळकर्णीयासी तलब केल्या की खोरी दुदळी घेऊन हुजून विजापुरचा कोट बाधावयासी येणे ह्मणऊन तलब केल्या त्यास मग तेथे हुजूर गेले मग तेथून मेरवानगी केली पादछानी देसमुखी व पटेलकीस हक्क चढविले मग तेथून कुमाजीराऊ आले ते बहुत अशक्त जाहाले त्याचा लेक नरसोजीराऊ दहा बारा वरसाचा होता तो विजापुरास गेला तेथे बापाचा मावळा हुजूर पादछायापासी चाकरीस होता त्याने यासी हि चाकरीस प्याद्याच्या नाइकीत ठेविला तीन वरसे होता चौथे वरसी बिबीस कळले तिने विचारिले की, कोण्ड जमीनघराचा आहेस ? मग नरसोजीराऊ बोलिला की, कुमाजीराऊ पटेल व देसमुख मसूरचे याचा पुत्र आहे ह्मणऊन सागितले त्यास ते बोलिले की, तू आण का परागदा जाहाला आहेस ह्मणऊन विचारिले मग नरसोजीराऊ बोलिला की, तुरक दाप करून पटेलगी खातात मग बिबीने त्याचे मस्तकी हात ठेविला की तू काही परागदा होऊ नको मग दुसरे दिवसी माहालामधे पादछायापासी नेऊन भेटविला ते वेळेस पादछाव बोलिले की, तुझे बरे करितो मग ते च वेळेस त्यामागते माहालदार देऊन त्यास बोलिला की, तुझी देसमुखी व पटेलकी खरी असली तरी गोताचा व देसमुखदेसपाडे व प्रगण्याचा माहजर करून घेऊन येणे ह्मणऊन सागाते एक चितळकर व आपले माहालदार ऐसे देऊन रवाना केले तेव्हा पाटणास आले पाटणकर बाबाजीराऊ यानी माहाजर करून दिल्हा की कराहाडची देसमुखी आणि मसूरची देसमुखी व पटेलकी नरसोजीराऊ जगदळे याची खरी मग तेथून चरेगावास आले चरेगावकर माहादजी पाटील याने माहजर करून दिल्हा की, पटेलकी चेपरीकडे च देसमुखी आहे तेथून कराहाडास गेले कराहाडकरानी हि माहजर करून दिल्हा की जगदळ्याची च येथील देसमुखी खरी तेथून मसुरास आले नरसोजीराऊ बाहेर च राहिले आणि पादछाई माहालदार गावात गेले त्यानी बारा बलुते मिळवून माहजर केला की येथील जगदळ्याची देसमुखी व पटेलकी खरी मग नरसोजीराव व माहालदार ऐसे माहाजर घेऊन विजापुरास गेले माहाजर पादछायापासी देऊन दिल्हा मग त्यानी माहाजर पाहिल्यावरी बिबीस मसूर मोकासा करून दिल्हा मग गावाची खडणी आधी दिडासे व्होनाची केली होती मोकासा जाहाल्यावरी दिडा हाजारास गाव खडला त्याच्या रस्ता भरू लागल्या मग तुरकानी कोळविलातील भुते च्यार आणिली, एक रगतचदन, एक चदनाचे, आणि एक