मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)

ह्मणऊन बोलिला त्यास पादछास बोलिला की, मी मेलो तरी माघारे चालवावे ह्मणऊन माहजर करून देणे की मराठ्याचा वीर आणि मुसलमानाचा पीर आणि उजवे बाजूस मराठ्याची कदुरी आणि डावे बाजूस मुसलमानाची कदुरी आणि त्याचा निमे हक्क व कराहाडबाजेमधे निमे हक्क व बिघ्यास वराई उदबत्यास फकीरफकिराई आणि हक्क मेड्यामधे पाच चावर इनाम व मुजावर सेवेसी ठेवून ह्मणऊन ऐसा माहज करून देणे मग पादछानी माहजर करून माहालदारापासी दिल्हा मग ते वेळेस जानोजी पिसळा स्वार होऊन मेडास आला तेथे येऊन मेडा रोविला मग मेड्यास अकुर फुटले आणि उउचळा जाऊन भाडू लागला तेव्हा शिर्क्याने जमाव केला हपसी आणिले, व श्रुवे आणिले, व फिरगी आणिले, व पायदळ आणिले मग दिवसा च स्वार होऊन, जानोजी पिसळ्यावरी येऊन घातले ते वेळी तेथे बहुतच रणकदन जाहाले आणि तारेवरची जुगली जानोजी पिसळ्या लागली पोटला बाहेर निघाला आणि तैसा च पोटला धरून मेडाच्या तहल्या घेऊन बैसला आणि वरची लस्कर वाईस गेले आणि शिर्के हे फिरोन माघारे गेले मग त्याची बाईल कमळज्या मसुरास बहिणीस भेटावयासी आली होती तिस तेथे स्वप्न पडले आणि राम ठाकूर यासी स्वप्न पडले की तुह्मी गरीतोड भेटीस येणे, नाहीतर बाबाजीराऊ यास व राम ठाकूर हे दोघे जण धाडून घेऊन जाणे ह्मणऊन ऐसे दोघासी हे च स्वप्न पडले मग तेव्हा च बाबाजीराऊ व राम ठाकूर ऐसे दोघे जण दो घोडियावर बैसोन स्वार होऊन सातारावरून गेले दो प्रहरा दिवसा मेड्याच्या रानात गेले तो जानोजी पिसळ्याने हाक मारिली मग ते जवळी आले त्यास बोलिला की माझे शीर कापून नेणे मग त्यास ते बोलिले की आमच्याने शिर कापवत नाही तेव्हा राम ठाकरास बोलिला की, तू तरी माझे शीर कापून नेणे तेव्हा राम ठाकूर बोलिला की, तू आन देणार आणि मी घेणार, हे मज होत नाही ह्मणऊन बोलिला मग ते वेळेस त्यापासी कागद माहजराचा होता तो कागद बाबाजीराऊ यापार दिल्हा मज जानोजी पिसळा बोलिला की, तुमच्या आगावरील शेला खाली पसर ह्मणऊन बोलिला मग शेला खालीं पसरला आणि जानोजी पिसळाने टकरा पस हक घेऊन आपल्या हाते शिर कापून शेल्यावरी ठेविले मग बाबाजीराऊ व रा ठाकूर यानी त्याच्या धडावरील शिळा ररिल्या आणि त्यावरी तुरपती बाधली पूजानमस्कार केला मग तेथून हे दोघे जण निघत होते तो शिर्क्याची धावण आली मग ह्या दोघाची घोडी हिरोन घेतली कोण्हाचे कोण्ह ह्मणऊन विचारिले मग हे बोलिले की त्याचे बाइलेने सोधावयाची पाठविले आहे. ह्मणऊन बोलिले मग शिर्क्यानी आपल्या खवईपासी घेऊन कुडाबादेस नेले तेथे देवदरबार होत तेथे शील होती त्या शिळेवरी नेऊन त्याचे शीर ठेविले मग ते शीर त्याच्या स्वप्नामध्ये गेले की, मी भाडोन जुजाने मेलो आहे आणि ते हि जुजोन भाडो न मिळे, तरी तुह्मी माझ्या शिरास खोळबा करू नका, लाऊन देणे ह्मणऊन स्वप्न पडले मग दुसरे दिवशी त्या शिरास रजा दिल्ही मग तो तेथेच पीर जाहाला मग बाबाजीराऊ व राम ठाकूर यानी खाट्यावरी घेऊन निघाले तो ठाई ठाई पीर च होत आला आणि सातार्‍याच्या खिडीमधे च पीर जाहाला आणि तेथून कोणेगावच्या वाकणामधे आला तेथे हि पीर जाहाला मग त्याची बाईल मसुरी होती तिज कळले मग ती पालखीमधे बैसोन शिरवड्याच्या गाडेउतरापासी आली आणि शीर तेथे च आले मग त्याचे वाइलेने शिर धुतले आणि तेथे च पीर जाहाला मग ते वेळेस त्याची बाईल बोलिली की, मसुरास घेऊन चला, तेथे सुखसोहळे होतील ह्मणऊन बोलिली मग बाबाजीराऊ यानी तिकडून च कराहाडास घेऊन गेले तेथे बहुत जन लोक मिळाले मग त्याची बाईल बोलिली की मी पतिव्रता असले तरी याचा काही चमत्कार दाखविणे ह्मणऊन बोलिली मग तेव्हा त्या शिराने डोळे उघडिले मग बहुत च आनद जाहाला.