मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)

मसूर-जगदळे

लेखांक १

5 माहादजी जगदळे देसमुख पा।। मसूर सा।। रायबाग सुभे विजापूर. आपली कदीम देसमुखी कराराबादेची होती. ते देसमुखी अमानत होऊन खालसा विजापुरचे वख्ती सेभरी वरसे खाली साहोती विजापुरी याणी शाहाजी भोसला यास तनखा दिल्ही. शाहाजी भोसलियाने माझा चुलता जिवे मारुन पा। मसूरची देसमुखी घेतली. माझा बाप पातशाहीमधे जाऊन देसमुखीची रदबदली करू लागला. म्हणौन शिवाजीने भोसल्याने धरुन बाप हि जिवे मारिला. मग आपण लहाण होतो. का। पटेलगी करुन होतो. शिवाजीने पातशाही मुलुक घेतला. पुंडावे करु लागला. मग आपण त्यापासी जाऊन रदबदल करुन की, आपला बाप मारिला व आपला चुलता मारिला आणि आपले वतन घेतले. ऐसी रदबदली करुन. त्तेव्हा भोसलियाणी पा। मसूरची देसमुखी आपली दुमाले केली. कराराबादेची देसमुखी दिल्ही नाही. कराराबदेची देसमुखी धना जाधव नासरदार यासी देसमुखी रामा मजकुरांनी दिल्ही. त्याने आपपले तरवारेने पदाजी यादव व पिराजी यादव याच्या हवाला देसमुखी करुन याच्या हाते देसमुखीचा कारभार करीत आहेती. पातशाही फौजेमधे फौजा येताती. धनाजीचे नाव कळो न देतां, आपली देसमुखी म्हणौन भेटताती. कराडाबादेचा देसपांडा याचा एक भाऊ रुद्राजी चंदो हा धनाजीस मिळोन पदाजी यादवास व पदमोजी यादवास घेऊन, लस्करात एऊन फिरादी करवितो. तरी ऐन जिन्नस पदाजी यादवाचे दोघे बेटे एकोजी व कसाजी गणिमाकडे आहेती. पाच पाच से स्वार बाळिगीता आहेती. आणि मुलुक लुटिताती. ते लुटीचे पैके आणून, पदाजी यादव व पदमोजी यादव हे लस्करामधे खर्च करुन मजसी वाद सांगताती. म्या तो पातशाही खजाना पेशकसी भरुन सनदी देविली ते सनद न देणे म्हणौन फिरादी होताती, आणि गोतांत पाठऊन निवाडा करावा म्हणताती. तरी त्याचा भाऊ गिरजोजी यादव हा राणियापासी आहे. हा व धनाजी जाधव याने मुलुकामधे आपले स्वार व प्यादे पाठविले होती की, कोण्ही जमीदार माहादजी देसमुख मसूरकर याची शाहादी द्याल म्हणजे मारिले जाल. म्हणौन धनाजीचा भाऊ रयतास धरुन नेऊन मुचलके घेताती. ऐसे मजवरी जुलूम करुन, माझे कराडीचे वतन घेतले व मसूरचे घेऊ ह्मणोन कराडीच्या देसपांडेयाचा भाऊ रुद्राजी चंदो यास धनाजीने बा। देऊन प्रत्यक्ष गणीम मजवरी उभा केला आहे. हे गोष्ट लटकी जाली तरी पातशा मज सजा पोहचविते माझ्या वतनाची हकीकती तो रुद्रो चिमणाजी कानगो हे विजापूर व महमद एक अमीन सरकार रायबाग वाई व हक्कसिक्काकेनीस व फौजदार ऐसी हकीकती कचेरीस मोहरनसी लेहून दिल्ही असता, धनाजीच्या बळे पैके खर्च करुन मजवरी जोरावारी होते. मी नातवाण. कोठोन खर्च करावा ? हे तहकीक केले पाहिजे माझी सनद मज देविली पाहिजे. जरी कदीम देसमुख पदाजी, पिराजी, धनाजी व गिरजोजा यासी देसमुखी कदीम ह्मणताती, काही कदीम सनद असल ते हुजूर आणून दाखवावी. त्यावरून तहकीक होईल. गनीम ऐसा कुल हालीमवालियाचे गुजारतीने खरा करून देईन.