स्थलनामव्युत्पत्तिकोश

(आ) अट्ट म्हणजे बाजार. तेव्हां अट्टशब्दांत जेवढीं ग्रामनामें तीं सर्व पुरातनकालीं बाजाराचीं गांवें होतीं. अट्ट शब्दाचें हाट हें दुसरें रूप आहे.
(इ) उदक शब्दा पासून उद प्रत्यय निघालेला आहे.
(ई),कुंब शब्द कुंपण या अर्थी यज्ञकर्मात लावत. कोप, कुवें, कुवा, कुई, कोपी, हे प्रत्यय ज्या ग्रामनामांत मराठींत येतात. तेथें कुंब (कुंपण) हा संस्कृत शब्द मूळ आहे असें समजणें प्रशस्त. कूप म्हणजे विहीर हा शब्द मूळ धरणें प्रकरणाला प्रशस्त दिसत नाही. कोप प्रत्यय कानडी ग्रामनामांत फार येतो. (उ) कुहर पासून खोरें शब्द मराठीत आला आहे.
(ऊ) कूटि पासून गुडी. गुड्ड, गुडी हा प्रत्यय कानडी ग्रामनामांत फार येतो.
(ऋ) कूल प्रत्यय पाणिनीनें ग्रामनामवाचक दिला आहे.
(ऋ) कोश शब्द संग्रहार्थक आहे.
(ए) क्षेप म्हणजे पुष्पगुच्छ
(ऐ) क्षोट-खुंटा,खुटा. पशुपालांची जनावरें बांधण्याची जागा.
(ओ) खनि-समूह
(औ) खल-धान्य मळण्याची जागा
(क) खेलि-संग्रहवाचक शब्द
(ख) गवादनी-गव्हाण. गवादनी म्हणजे कुरण. वसाहतवाल्यांना पशूंच्या करतां जीं कुरणें रानांत प्रथम सांपडलीं त्यांना ते गव्हाण ह्मणूं लागले. गव्हाण शब्द प्रत्येक गांवांतील कांहीं शेतांना सध्यां लावलेला आढळतो. ही शेतें पूर्वी कुरणें होती.
( ग ) गुल्म-समूहवाचक शब्द
(घ) चक्र म्हणजे प्रांत, प्रदश
(च) छद-आछादन, मंडप, छत, घर
(छ) ज प्रत्यय ग्रामनामवाचक पाणिनीय आहे
(ज) द्वार म्हणजे डोंगरांतील खिंडीचा रस्ता
(झ) दोला-झोकें घेण्या योग्य झाडांचें जेथें वैपुल्य दिसलें.
( ट) पट्ट, पट्टण, पद्र, पल्ल, पालिका, पत्तन, पाटक, वाटिका, हे सर्व शब्द प्रस्थ या मूळ पाणिनीय शब्दा पासून निघालेले ‍दिसतात.
(ठ) पिंड-समूहवाचक
(ड) पूल-समूहवाचक
(ढ ) बुघ्न-झाडाचें खोड
(ण ) माण-समूहवाचक
(त ) पथिन्-नगरवाचक, प्रांतवाचक
(थ ) वरट-बरडी जमीन
(द) वाहन-रस्त्याचा वाचक
( ध) विवर-कुहर, खोरें
(न) वेल वेर } उपवन
(प) वेष्टक-बेट, झाडांचा समूह (कळकाचें बेट)
(फ) सूद-नगरवाचक पाणिनीय प्रत्यय
(य ) द्रु ( झाड ) - डु
(भ) पुत्रक म्हणजे पोटगांव, लहान गांव. पाटलीपुत्र म्हणजे पाटली नांवाच्या पूर्वीच्या मोठ्या गांवा पासून फुटून झालेलें लहान गांव. पुढें हें लहान गांव च मोटें अवाढव्य राजधानीचें शहर झालें.