Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
५०. यूरोपांत ऐतिहासिक तत्त्वज्ञानाच्या ज्या अनुनायक व निर्णायक नांवाच्या दोन शाखा’ आहेत, त्यांपैकीं अनुनायक पद्धतीचा उदय भारतवर्षात व महाराष्ट्रांत अद्याप झाला नाहीं. निर्णायक अथवा A priori अथवा deductive अथवा पूर्वग्रहात्मक पद्धतीचेंच राज्य या देशांत आज दोन हजार वर्षे चालू आहे. भारतवर्षांतील ऐतिहासिक निर्णायक पद्धतीच्या दोन शाखा आहेत. सर्व चराचर सृष्टीशीं समबुद्धि ठेवून चालणारी एक शाखा आहे. ह्या शाखेंत लोष्ठ, अश्म, कांचन, पशु, पक्षीं, मनुष्य, गंधर्व, यक्ष, ईश्वर व ब्रह्म ह्यांचें तादात्म्य कल्पून व्यक्तिमात्राचें आचरण चालावें असा उपदेश केलेला असतो. प्रपंचात जन्मावें लागतें, त्याला उपायच नाहीं. परंतु, जन्म हें एक महददु:ख कल्पून व प्रपंचाचा म्हणजे समाजाचा स्पर्श अपरिहार्य मानून, देहाचा त्याग करून ब्रह्मांत विलीन होण्यांत पुरुषार्थ आहे, अशी ह्या शाखेची समजूत आहे. म्हणजे प्रपंच, संसार, समाज, समाजाची धडपड, राष्ट्र, राज्ययंत्र, धर्मयंत्र, युद्धयंत्र, व्यक्तिस्वातंत्र्य, समाजस्वातंत्र्य वगैरे सर्व संस्थांचा व व्यवहारांचा पूर्ण तिटकारा ह्या शाखेच्या मनांत भरलेला असतो. ह्या शाखेचे पक्के, अर्धे, चौथाईचे, असे अनेक भेद आहेत. ब्रह्मांत विरून जाण्याला सर्व चराचर सृष्टीशीं समबुद्धि ठेवणें म्हणजे व्यक्तित्वाचा अत्यंत लोप करणें आहे. व्यक्तित्वाचा अत्यंत लोप म्हणजे समाजत्वाचाहि अत्यंत लोपच होय. कारण, समाज म्हणजे व्यक्तिंचा समुदाय होय. ह्या शाखेला ममत्वबुद्धि आत्म्याच्याहि ठायीं राहिलेलीं नसते. ज्ञान व अज्ञान ह्या दोन्ही गोष्टी सारख्याच सिद्ध व असिद्ध हे लोक मानतात. फार कांय सांगावें, सिद्धि व असिद्धि ह्या परस्परविरोधी वस्तु हे लोक एकच समजतात. ह्या मताचा कट्टा पुरस्कर्ता महाराष्ट्रांत ज्ञानेश्वर झाला. ह्याच्या अमृतानुभवांत अज्ञानखंडनाप्रमाणेंच ज्ञानाचेंहि खंडन केलेलें आहे. शिष्य म्हणजे गुरु व गुरु म्हणजे शिष्य, बायको म्हणजे आई व आई म्हणजे बायको, पुरुष म्हणजे प्रकृति व प्रकृति म्हणजे पुरुष, आपण म्हणजे ईश्वर व ईश्वर म्हणजे आपण, इतकी व्यष्टि व समष्टि ह्यांची जेथें तादात्म्यस्थिति झाली, तेथें प्रपंच कसला आणि इतिहास कसला ! हें तत्त्वज्ञान किंवा ह्याचा अल्पहि अंश ज्यांच्या डोक्यांत भरला, त्यांना समाजहि नाहीं व राष्ट्रहि नाहीं. पूर्णत्वाची, शून्यत्वाची, समत्वाची, अमृतत्वाची, कल्पना ज्या विचारांत परिपूर्ण भरली तो विचार विचाराभावाच्या रूपाला पोचला. त्याला विचार, आचार, उच्चार करण्याची जरूरच राहिली नाहीं. अखंडैकरसांत, आत्मस्वरूपांत, स्वसंवेद्यत्वांत, अनाद्यनन्तांत निमग्र झाल्यावर आणखी निमग्र तें कशांत व्हावयाचें? वस्तीचें गांव गांठल्यावर प्रवास कोठें करावयाचा? असली ही विलक्षण शाखा आहे. चिरंजीव, जीवन्मुक्त, संन्यस्त, व उदासीन असल्या लोकांना समाज व संसार व प्रपंच व इतिहास व तत्त्वज्ञान, हीं काय करावयाची? ह्या लोकांचें व्यक्तिस्वातंत्र्य अथवा ममत्व इतक्या प्रकर्षाला पोचलें कीं, समाजापासून पूर्णपणें विलग होण्यापर्यंत त्याची मजल गेली. अथवा ज्यांना समाज नाहीं-- सारखा मानण्यांत पुरुषार्थ वाटला त्यांना ममत्व तरीं कोठं राहिलें? ममत्व ही वस्तु समाजत्वाच्या तुलनेनेंच भासमान होणारी आहे.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
४९. शास्त्र व तत्त्वज्ञान, यांचे प्रांत भिन्न केले, म्हणजे यूरोपीयन व भारतीय "Philosophy of History” चा परिचय करून घेण्याचा मार्ग खुला होतो. युरोपांतील ऐतिहासिक तत्त्वज्ञांच्या दोन शाखा आहेत. एक शाखा विवेचकपद्धतीनें हजारों ऐतिहासिक प्रसंगांची छान करून अनुनयनपद्धतीनें सदर प्रसंगांची कार्यकारणपरंपरा शोधीत सामान्य कारणांपर्यंत येऊन ठेपते, एवढ्यानें आपलें कार्य संपलें असें समजते. मानव समाजाच्या चरित्राच्या आद्यन्तांचा शोध लावण्याचा किंवा लागल्याचा बाणा ही शाखा धरीत नाहीं. ह्या शाखेला A posteriori व inductuctive असें नामाभिधान दिलें असतां शोभण्यासारखें आहें. दुसरी शाखा तत्त्वज्ञांनीं स्वतंत्र रीतीनें कल्पिलेल्या सर्वसामान्य आदिकारणाचा स्वीकार करून त्याचा परिष्कार मानवसमाजाच्या चरित्रांतील प्रसंगसमूहावर व प्रत्येक प्रसंगावर कसा झाला आहे तें निर्णयपद्धतीनें करून दाखविण्याची ईर्षा बाळगते. मानवसमाजाचा आद्यन्त तर्कदृष्ट्या व तत्त्वदृष्ट्या आपल्याला माहीत आहे व अखिल मानवसमाजाच्याच नव्हे तर अखिल सृष्टीच्या आदिकारणांशी आपला परिचय आहे, असा अभिमान ह्या शाखेला आहे. ह्या शाखेला A priori व deductive ही संज्ञा मतैक्यानें लाविली जाते. स्पेन्सर, हक्स्ले, कोंटे वगैरे भौतिकशास्त्रज्ञ अनुनयपध्दतीचे कैवारी आहेत; आणि प्लेटो, क्यांट, हेगेल, वगैरे बडीं बडीं धेंडें निर्णयनपद्धतीचे वाली आहेत. ह्या निर्णायक तत्त्वज्ञांच्या विचारांचाच पगडा समाजाच्या चरित्रावर फार झालेला आहे. भौतिकशास्रांची जी अनुनयनपद्धती--जिची उत्पति व वृद्धि अलीकडील तीनशें वर्षांतली आहे--तिच्याविरुद्ध यद्यपि ही तात्विक व निर्णायकपद्धति आहे, तत्रापि प्रपंचाचा सामग्रयानें अर्थ कळण्याचा मार्ग ह्या पद्धतीनें सुकर होऊन, मनाला शांति व समाधान प्राप्त होतें. हेंच या पद्धतीच्या साम्राज्याचें बीज आहे प्रपंचाच्या दाहानें संतप्त व उद्विग्न व्यक्तींच्या समाजाला शांत व समाधायक आश्रय मिळवून देण्याचें आश्वासन निर्णायक तत्त्वज्ञांनीं घेतल्यामुळें त्यांचें वजन मानवसमाजावर पडावें, हें रास्तच आहे. परंतु, विवेचक व अनुनायक दृष्टीनें पाहिलें तर, निश्चयानें अमुक गोष्ट साधार व अमुक निराधार आहे, ही फोड अनुनायक शास्त्रज्ञांच्या द्वारांच होण्यासारखी आहे. निर्णायकपद्धती समाजाच्या स्थैर्याला पोषक आहे व अनुनायकपद्धती समाजाच्या गतीला अनुमोदक आहे, कोणत्याहि जीवंत समाजांत ह्या दोन्ही पद्धतींचा कमीजास्त मानानें अंश सांपडतो. सारांश, जोंपर्यंत अज्ञेय सृष्टि अस्तित्वांत आहे व तिला ज्ञेय रूप देण्याचा प्रयत्न चालू राहील, तोंपर्यंत ह्या दोन्ही पद्धतींचा अवलंब समाजांत जारीनें चालू राहील. इतकें मात्र ध्यानांत ठेविलें पाहिजे कीं, अनुनायक पद्धतीचा अवलंब करणारें समाजशास्त्रज्ञ होत व निर्णायक पद्धतीचा अवलंब करणारे केवळ काल्पनिक तत्त्वज्ञ होत. पहिले पायाकडून अज्ञेय शिखराकडे जात आहेत व दुसरे काल्पनिक शिखराकडून पायाकडे येत आहेत. व्यावहारिक सत्य पहिल्यांच्या बाजूला आहे व तात्विक सत्य दुस-यांच्या पक्षाला आहे. दोघांचाहि हेतु सत्याचा पाठलाग करण्याचा आहे. बहुश: सत्याची पारध या अधऊर्ध्व गतींतील भेटींत संपण्याचा संभव आहे.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
श्री. १२ मार्च १७२७.
स्वस्तिश्री राज्याभिषेक शके ५३ प्लवंग नाम संवत्सरे चैत्र शुद्ध प्रतिपदा रविवासरे क्षत्रियकुलावतंस श्रीराजा शाहू छत्रपति स्वामी याणीं राजश्री अंबाजी त्र्यंबक यांसी आज्ञा केली ऐसी जेः- मनसुब्याचा अर्थ सविस्तर राजश्री बाजीराव पंडित प्रधान यांस लिहिला आहे त्यावरून कळेल. तरी तुम्हीं पंडित मशारनिल्हेस चार गोष्टी विचाराच्या सांगोन अमित्राचे पिछावरी * * * कृयत फितूर तुटे तो अर्थ करणें. तुम्हीं स्वामीजवळ बोलोन गेला काय, करता काय, हा विचार कळत नाहीं. राजश्री प्रधानाचें व राजश्री सेनापतीचें चित्तीं विचार काय आहे हा त-ही शोध लेहून पाठवणें. त्यावरून स्वामी निश्चिती मानतील. गुज काढावयाचा विचार चित्तांत येत नसेल तरी इलाज काय? वारंवार लिहावयाची सीमा झाली! परंतु कार्यभागाचा विचार दिसत नाहीं. याउपरि तरी गुज काढावें. फितूर तुटावा ऐसें चित्तांत असलें तरी पत्रदर्शनीं फौजेनिशी अमित्राचे पिछावर येऊन त्याची वाताहात करणें. बहुत काय लिहीन.
हें काव्येतिहाससंग्रहान्तर्गत पत्रेंयादी वगैरेंतील १६७ वें पत्र आहे. ह्या पत्रांत १ शाहू, २ मनसुबा, ३ बाजीराव, ४ फितूर, ५ इलाज, ६ मशारनिल्हे, ७ फौज आणि ८ व, एवढे ८ च शब्द काय ते एकंदर १२७ शब्दांतून फारशी आहेत. म्हणजे,
इ. स. | फारशी | मराठी | एकंदर | शेंकडा मराठी शब्द |
१६२८ | २०२ | ३४ | २३६ | १४’४ |
१७२८ | ८ | ११९ | १२७ | ९३’७ |
ह्या दोहोंशीं प्रस्तुत खंडांतील वर उल्लेख केलेल्या शिवाजीच्या ३६ व्या लेखांतील शब्दांची तुलना केली असतां पुढील फळ येतें:-
१६७७ | ५१ | ८४ | १३५ | ६२’२ |
ह्याचा अर्थ असा झाला कीं, दरबारी लिहिण्यांत, मुसुलमानांचें राज्य चालू असतां इ. स. १६२८ त शंभर शब्दांतून सरासरीच्या मानानें १४ शब्द मराठी येत; शिवाजीचें स्वराज्य चालू असतां इ. स. १६७७ त शेकडा ६२ शब्द मराठी येत, आणि शाहू राज्यावर असतां इ. स. १७२८ त शेंकडा ९३ शब्द मराठी येऊं लागले. परपराज्याचा भाषेवरती केवढा परिणाम होतो त्याचा हा रोखठोक ताळा आहे!
इ. स. १६२८ पासून १७२८ पर्यंत मराठींतील दरबारी पत्रांत फारशीचा भरणा कोणत्या प्रमाणानें होत होता त्याचा हा तपशील आहे. १६२८ च्या पूर्वी इ. स. १४१६ पर्यंतचे मजजवळ फारशीमराठी लेख आहेत; त्यांतहि १६२८ ल्या लेखांतल्याप्रमाणेंच फारशी शब्दांचा भरणा अतोनात आहे. मुसुलमानांच्या राज्यांत दरबारी म्हणून जेवढे लिहिणें होतें त्या सगळ्यात फारशी शब्दांचें व प्रयोगाचें प्राधान्य उत्कट असे. ह्या दरबारी लेखांपेक्षा तत्कालीन मराठी कवींच्या लेखांत फारशीचा भरणा अतिच कमी आहे. परंतु त्यांच्या देखील लेखांत फारशी शब्द अधूनमधून घुसल्यावाचून राहिले नाहींत. उदाहरणार्थ, इ.स. १५४८ पासून १६०९ पर्यंत असणा-या एकनाथस्वामींच्या ग्रंथांतील एक उतारा देतों.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्रीवरद.
लेखांक ७.
१७०२ भाद्रपद वद्य १४.
पौ।. छ २३ सवाल इहिदे
समानीन, ब।। अजूरदार.
श्रीमंत राजश्री पंत प्रधान स्वामीचे शेवेसी :-
विनंति सेवक पुरुषोत्तम महादेव कृतानेक सां। नमस्कार विज्ञापना येथील कुशल ता। छ २७ माहे रमजान मुक्काम दिल्ली स्वामीचे कृपावलोकनेकरून यथास्थित असे. विशेष. सरकारचे आज्ञापत्र छ १ जमादिलावलचे आलें तें छ १ रजबी पावलें. पत्रीं आज्ञा की इंग्रज फार वदमामली आहेत. प्रथम गरिबीने गोड बोलून आपला कबजा करावा हे चाल त्यांची आहे. मागें चिनापट्टण व चंदनदावर वगैरे मुलूक त्यांणी हस्तगत केला. बंगाल पातशाही मुलूक घेऊन असफद्दौला यांसी कोणे प्रकारें सलूख राहिला, हे सर्व पातशहाचे ध्यानांत असेलच. या गोष्टी सर्व मनन करून, दक्षणचे सर्व रसासतदार एकविच्यारे होऊन, जागोजागा टोपीकरांसी ताण वाढविल्या. शिक्षा चांगलीच होईल. यांणी तुह्मी मिर्जा नजबखानबहादुर यांसी बोलून पातशहास विनंति करून टोपीकरांचे पारपत्याचा निश्चय करावा. पातशहानीं खेमेदाखल व्हावें. व नजरबखानानीं शीख वगैरे सर्व जमाव करून इंग्रजास तंबी करावी. समय हाच आहे. असफद्दौलाची दौलत हस्तगत जालियास नफे फार आहेत. सरकारतर्फेने गोहदप्रांती इंग्रजाचे तंबीस पंचवीस हजार फौज आहे व आणखी मातबर सरदार फौजसुद्धा रवाना करायाची तरतुदीत आहे. जलदीनेंच येऊन पावतील. व नजबखानासारिखे दूर-अंदेश हजूरमुखत्यार व नबाब निजामअल्ली सारिखे व आह्मांसारिखे फिरदवी एकनिष्ठ हुजूरचे एकविच्यारें असल्यास फिरंगी यांनी काय कर्णे आहे? राजेरजवाडे व निजामअल्लीखान व भोसलें यांस फरमान पाठवावा. व उभयतां सरदार गुजराथ प्रांती पन्नास साठ हजार फौजेनिसी व तोफखाना जंगी सरंजामसुद्धा इंग्रजांचे पारपत्यास जाऊन, त्यांची रसद बंद करावी. त्यांचे लष्करात दोन सेर धान्य आहे. इंग्रज मोठे संकटात येऊन पडले आहेत. ज्या दिवसीं सरदार निकड करतील त्या दिवशी इंग्रज जीवें वांचून जाणें कठीण पडेलसें आहे. व नबाब-नि-जामअल्लीखान-बहादूर याणीं सिकाकोळ बंदराकडे आपला पुत्र फौजसुद्धां रवाना केला आहे. व रा। रघोजी भोसले साहेब सुभा याणीं आपले बंधु रा। रघोजी भोसले सेनासुभा यांस बंगालियांत रवाना केलें. व हैदरखान चेनापट्टणाकडे जाणियास डेरेदाखल जाले. फौज रवाना केली. याप्रों। चहूंकडून ताण बसून पेंचांत येते, या गोष्टीने बहुत नफे आहेत, ह्मणून पातशहांस व नजबखानास समजाऊन अमलात येते कर्णे. ह्मणून विस्तारे पत्री आज्ञा. विस्तारवत आज्ञेप्रों। व यथामतीनें सर्पक सुचले ते पातशहास व नजबखानास श्रुत केले. बहुत संतोषी होऊन बोलिले कीं, आमचे मनोदयानुरूपच श्रींचाही इरादा आहे. परंतु तूर्त तथातथकरून इंग्रज सुरतेस गेले व सरदार उजरास इंदुरास आले. व गोहदेकडील सरदार आपलाले ठिकाणी गेले. आह्मी आपली फौज पाठवावी तर वर्षाकाळ, नदीनाले बहुडले आहेत. या दिवसांत फौज व तोफखाना कैसा जातो ? यास्तव वर्षाकाळानंतर श्रीमंतांचे सरकारची फौज आल्यास आह्मी फौज रवाना करतो.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
त्याप्रमाणेंच, समाजाच्या आद्यन्तांची माहिती सांगून व्यक्तमध्य प्रपंचाची संगती लावून दिल्याचा भास उत्पन्न करणारें तत्त्वज्ञान केवळ एक प्रचंड Psychologicalfiction आहे; त्याला व्यावहारिक सत्यत्व नाहीं. शास्त्राचा, तर मुख्य बाणा व्यावहारिक सत्यत्वावर आहे. तत्त्वज्ञानाच्या राज्यांतील एक एक वस्तु शास्त्र दिवसेंदिवस हस्तगत करीत व त्याला व्यावहारिक सत्यत्चाचें रूप आणीत चाललें आहे आणि असा एक समय हजारों वर्षांनी येईल कीं, जेव्हां तत्त्वज्ञानाचा सर्व प्रांत शास्र आक्रमून टाकील, तोंपर्यंत शास्त्र व तत्वज्ञान ह्यांचे प्रांत नीट आखून भिन्न केले पाहिजेत हें उघड आहे ! नाहीं तर पारमार्थिक व काल्पनिक विधानांना व्यावहारिक सत्यत्व दिलें जाईल आणि व्यवहारांत पदोपदी पराभव होत जाईल. उदाहरणार्थ, ख्रिस्ती तत्त्वज्ञान घ्या. ख्रिस्ती तत्त्वज्ञानाचें व पुराण इतिहासाचें मुख्य पुस्तक जें बायबल त्यांत, (१) मनुष्यसमाज ईश्वरानें आठ हजार वर्षांपूर्वीआदम नांवाचा मनुष्य उत्पन्न करून चालू केला, (२) एन्जल नांवाचे देवदूत मनुष्याचें रक्षण करीत असतात, (३) सैतान नांवाचा एन्जल मनुष्याला भ्रष्ट करतो, (४) ख्रिस्तानें सर्व भूत,भविष्य व वर्तमान ख्रिस्ती मानवप्राण्यांचें पाप स्वत: प्रक्षाळून टाकलें आहे, (१) ईश्वर स्वर्गात रहातो, (६) मृत मनुष्यें पुढें एकदां एकदम सदेह पुनरुज्जीवित होणार आहेत व त्यावेळीं पापपुण्यांचा झाडा होणार आहे, वगैरे शेकडों कल्पित, खुळीं व रानटी विधानें केलेलीं आहेत. तीं जर यूरोपीयन ख्रिस्तीसमाज खरी धरून चालेल, तर ज्याला सध्यां इतिहास, मानवशास्त्र, तर्कशास्त्र, भूस्तरशास्त्र वगैरे म्हणतात त्यांचे प्रणयन अशक्य होईल. वस्तुस्थिति अशी आहे कीं बायबलांतील हीं निराधार व काल्पनिक विधानें तिरस्कारानें एकीकडे ठेवून, यूरोपांत इतिहास व शास्त्र यांची निर्मिती चालली आहे. वर्तमान यूरोपांतील सर्व व्यवहार बायबलांतील काल्पनिक व निराधार विधानांच्या विरुद्ध चालला आहे. अनेक भ्रामक विधानांचे भांडारगृह जें बायबल तें समुद्रांतील दीपगृहाप्रमाणें धर्मपुस्तक करून, त्याच्या आसपास बिलकुल विश्वास ठेवावयाचा नाहीं, व अन्वयव्यतिरेकादि तर्कपद्धतीच्या जोरावर जें खरें असेल तें शास्त्र व तेवढें प्रमाण मानावयाचें, असा प्रकार यूरोपांत प्रस्तुतकालीं चालला आहे. आणि तो सर्वथा स्तुत्य व उपयोंगी आहे. बायबलांतील तत्त्वज्ञानानें मानवसमाजाच्या आद्यन्तांचा छडा लागल्याची समजूत वाटेल त्यानें खुशाल करून घ्यावी, परंतु व्यवहारांत त्याची मातबरी व सत्यता काडीमात्र नाहीं हें उघड आहे. हीच विचारसरणी इस्लामी, बौद्ध व मूर्तिपूजक वगैरे सर्व तत्त्वज्ञानांना लाविली पाहिजे. तात्पर्य, Philosophy व Science ह्यांचे प्रांत भिन्न आहेत, हें पक्कें ध्यानांत ठेऊन चाललें पाहिजे. मग, तें तत्त्वज्ञान धार्मिक ग्रंथांतून प्रतिपादिलेलें असो किंवा दर्शनांच्या रूपाने आविर्भूत होवो. कोणत्याहि रूपानें तें जन्मास येवो, त्याला शास्त्राप्रमाणें व्यावहारिक सत्यत्व नाहीं.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक ६.
१७०२ ज्येष्ठ वद्य ३.
पौ। छ २५ रमजान
पु॥ श्रीमंत राजश्री पंतप्रधान स्वामीचे सेवेसी :-
विज्ञापना ऐसीजे :- पत्रीं आज्ञा कीं : इंग्रजांचे तंबीस सरकारांतून सिंदे-होळकर फौजेसह गुजराथेंत करनेल गाडर याजवर गेले. तोफखाना तीन कोसांचा आहे. दररोज लढाई सुरू आहे, दोन च्यार लढाया जाहल्या. त्यांत बहुत नरम इंग्रज केले. मैदानांत येऊ शकत नाहींत. अडचणीची जागा धरून आहेत. नित्यानीं घरोघर येऊन कही वगैरे लुटून आणतात. बहुत तंग केले आहेत. मैदानांत यावें ही इच्छा. ईश्वरइच्छेने थोडेच दिवसांत फैसल होईल. भोंसले फौजेसहित बंगाल्यात रवाना जाले. कटकचे मैदानात गेलें. हे वृत्त तेथेंही आले असेल. हैदर नाईक याणी चेनापट्टणाकडे जाण्यास डेरे दाखल जाले. चेनापट्टणानजीक गेले असतली. नबाब निज्यामअल्लीखानही सिकाकोलाकडे सत्वरच जातील. चहूंकडून ताण बसला. त्यांत बंगाला ऐन पैकेयाची इंग्रजाची नड मोडते. ऐशांत पादशहा यांनी बाहीर निघोन, नबाब नजबखानबहादूर, सीख वगैरे यांस कळेल तसे समेटून घेऊन, इंग्रजास सजा करून, असफुद्दौला यांचे दौलतीचा बंदोबस्त केल्यास नफे बहुत होऊन खिसारा बारेल. टोपीवाल्यांनी बेअदब केली ते हालखुद्द राहून, सवदागिरीचे मार्गे वर्तणूक करितील. समेट हाच आहे. सविस्तर नबाब नजबखानबहादर यांचे पत्रीं तपशिले लिहिले आहे. मसवद्यावरून कळेल त्याअन्वये बोलून, लिहिल्याप्रो। अमलांत यावे. सरकारकाम करून दाखवावयाचा समय आहे. तुह्मी कराल, हे खातरजमा, तथापि सूचना लिहिली आहे. इंग्रजांचे पारपत्य होऊन, नक्षा मोठा व्हावा, ऐसा समय आहे. असें पुढे करूं गेलियास होणार नाही. ईश्वरें ज्यांस मोठेपण दिल्हें त्यांणी मोठे कार्य केलियास नक्षा व कितेक दिवस कीर्ति रहावी, ऐसेंच करावें हे उत्तम. या गोष्टीस गई गुजरल्यास टोपीवालें काही दिवसांत पातशहात घेतील. मग पश्चात्ताप होऊन फळ नाही. असे आहे म्हणून पत्रीं आज्ञा. त्याजवरून आज्ञेप्रों। पातशहास व नबाब नजबखानास सविस्तर अक्षरशाह मा। एक दोनदा समजाऊन, यथामतीनें दूरअंदेसीचे प्रकार खचित करून इंग्रजाचे रुपयावर नजर न देतां त्यासी बिघाड करावा हे गोष्ट शपतपूर्वक ठराऊन, डेरेबाहीर करावें हा निश्चय केला आहे. फरासखाना व तोफखाना वगैरे स्वारींच्या तयारीस पातशहानी आज्ञा केली. डेरेदाखल होतील तेसमई सेवेसी लिहू. कृपा केली पाहिजे. हे विज्ञप्ति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
४८ मानवसमाजाच्या चरित्रावर तत्त्वज्ञानाचा परिणाम काय होतो आणि तत्त्वज्ञानाचा व मानवसमाजचरित्राचा बिंबप्रतिबिंबरूप संबंध कसा आहे, तें येथपर्यंत संक्षेपानें सांगितलें, समाजशास्र, ज्याला कित्येक यूरोपीयन लोक Science of History अशी भ्रामक संज्ञा देतात, तें जोंपर्यंत निर्माण झालें नव्हतें, तोपर्यंत तत्त्वज्ञानाचा पगडा समजाच्या चरित्रावर अप्रतिबद्ध चालत होता. परंतु ही स्थिति ह्यापुढें अशीच टिकणें अशक्य आहे. नियमांनीं बद्ध अशा शास्राचा जसजसा उदय होत जाईल, तसतसा स्वैर संचार करणा-या अनियमित तत्त्वज्ञानाचा अस्त कालान्तरानें झालाच पाहिजे, हा सिद्धान्त जसा स्पष्ट मनांत उतरावा तसा कित्येक यूरोपीयन ग्रंथकारांच्या मतांत न उतरल्यामुळें, ते Philosophy of History व Science of History ह्या दोन वस्तू एकच समजतात. Philosophy of History व Science of History ह्या दोन शब्दसमूहांत समाज शब्दाच्या ऐवजीं इतिहास ह्या शब्दाचा चुकीनें उपयोग हे लोक करतात, एवढेंच नव्हे; तर Science व Philosophy ह्याही शब्दाचा घोटाळा ह्यांच्या ग्रंथांत पदोपदी होतो. इसवी सन १८७४ त राबर्ट फ्लिंट नामक गृहस्थानें Philosophy of History in Europe हा ग्रंथ लिहिला. ह्याचें प्रारंभीचें वाक्य असें:---One result of this inquiry should be to afford a clear view of what the Philosophy or Science of History is. हा गृहस्थ उत्कटत्चानें ख्रिस्ताभिमानी असून, प्रत्येक तत्त्वज्ञाचे दोष काढण्यांत ह्याचा हातखंडा आहे. परंतु, Philosophy व Science ह्या दोन वस्तू हा टीकाकार एक मानतो, हा ह्याचा मुख्य दोष आहे. अन्वयव्यतिरेकादि नियमांना धरून चालणारें जें तें शास्त्र व अन्वयव्यतिरेकाच्या साहाय्यानें शास्त्राची जेथें गति चालत नाहीं त्या प्रांतांत स्वैर वावरणारें जें तें तत्त्वज्ञान, हा भेद हा दोषैकदृष्टि टीकाकार अजिबात विसरतो. व्यक्तमध्य समाजाच्या चरित्रांतील ज्या गोष्टींची संगति लागाची अशी उत्कट इच्छा असते, ती संगति तत्त्वज्ञानानें लागली, असा भास होतो खरा, व ह्या भासाचा परिणाम समाजाच्या चरित्रावर अनिवार होतो, हेंहि खरें; परंतु, एवढ्यानें तत्त्वज्ञान शास्राप्रमाणें नियमबद्ध आहे, असें मात्र बिलकुल म्हणतां येत नाहीं. लहान पोर अंधारांत भुताला भितें, हेंहि खरें, व पोराच्या चरित्रावर भुताच्या भासाचा परिणाम होतो, हेंहि खरें, परंतु एवढ्यानें भुताचें अस्तित्व सिद्ध होतें, असें म्हणणें मात्र बिलकुल टिकणारें नाहीं. भूत ही गोष्ट मानसिक कल्पना किंवा Psychologicalfiction आहे; तिला व्यावहारिक सत्यत्व नाहीं.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
परंतु सामाजिक सुधारणेवरील त्यांच्या इंग्रजी व्याख्यानांत व निबंधांत Organisation discipline, वगैरे जे शब्द येतात, त्यावरून गीतेचें व दासबोधाचें वारें त्यांना कळत किंवा नकळत लागलेलें आहे, असें दिसतें. असो. (८) ह्या दोघांच्या तत्त्वज्ञानाला विरोधी असा एक पंथ सध्यां आर्यावर्तात कांहीं पाश्चात्य मंडळींनीं काढला आहे. त्या पंथाचा गूढ प्रवर्तक कोणी असो, परंतु त्याच्या हेतूची परीक्षा तत्पंथीयांच्या सामान्यत: भाषणांवरून व विशेषतः कृतीवरून यथास्थित करतां येतें मनुष्याच्या ठायी कांहीं अदृश्य शक्त्या आहेत व त्यांच्या जोरावर तो अद्भुत चमत्कार करूं शकतो, हें ह्या पंथाचें मुख्य तत्त्व आहे. हें अजब तत्त्व पुरातन आर्य लोकांचें असून, वर्तमान आर्यांच्या पुनरुज्जीवनार्थ तें आपण हिंदुस्थानांत पुन: जाहीर करीत आहों, असें ह्या पाश्चात्य लोकांचें म्हणणें आहे. ह्या अद्भुत शक्त्यांच्या जोरावर हिंदुस्थान पुन: उदयास येईल असेंहि हे लोक प्रतिपादितात. हवेंतून उडणें, पाण्यावरून चालणें, हजारों कोसांवरून पहाणें, वगैरे अमानुष सामर्थ्य पुरातन ऋषींच्या ठायीं जें होतें अशी कल्पना आहे, तें वर्तमान हिंदूंना अभ्यासानें येणें शक्य आहे; वगैरे थापा, हे लोक गंभीपणानें मारीत असतात व इकडील कित्येक मंदबुद्धि व आळशी “सुशिक्षित” लोक परम भक्तीनें त्या ऐकत असतात. या अद्भुत लोकांना “थिआसोफिस्ट” ही संज्ञा आहे. ह्यांचें तत्त्वज्ञान जर आधुनिक हिंदुसमाजांत प्रचलित झालें, तर अद्भुत शक्त्यांनीं व हटयोगानें पाश्चात्य प्रतिस्पर्ध्यांचा पाडाव आपल्याला सहज करतां येईल, अशी भावना हिंदुसमाजांत उत्पन्न होईल आणि उद्योग व भौतिक शास्त्रें यांकडे दुर्लक्ष होऊन, आलस्य व मांद्य यांचें साम्राज्य वाढेल. यूरोपीयन यंत्रशास्राचा पाडाव थियासोफिस्टांच्या मंत्रशास्रानें होईल, अशी कल्पना खोटी आहे. पाश्चात्य लोकांना मंत्रशास्त्रानें हाणून पाडण्याचा खुळा उद्योग, दुसरा बाजीराव, महादजी शिंदे, दौलतराव शिंदे, टिपू सुलतान वगैरे लोकांनीं केला होता. अद्याप ग्वालेर, इंदोर, नागपूर, बडोदें वगैरे स्थलीं जी द्राविड मंत्रशास्त्र्यांची घरें आहेत, तीं मंत्रशास्त्रानें यजमानाचा उत्कर्ष व शत्रूचा अपकर्ष होत नाहीं, असें स्पष्ट सांगत आहेत. थियासोफिस्टांच्या मंत्रशास्रांच्या सोडतींत उद्योगाचें मातेरें खात्रीनें होईल, असें पूर्वानुभव सांगत आहे. (९) थियासोफिस्टांच्या तत्त्वज्ञानाखेरीज, ख्रिस्ती तत्त्वज्ञान, सरकारी तत्त्वज्ञान वगैरे आणीक दहापांच तत्वज्ञानें सध्यां हिंदुस्थानांत प्रचलित आहेत. त्यांची परीक्षा करण्याचें काम विस्तरभयास्तव वाचकांकडेसच सोंपवितों.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
पाणी, माती वगैरे अचेतन भूतांप्रमाणें ब-यावाईटाचें ग्रहण सचेतन मनुष्यप्राण्यांनीं सुखदु:खाकडे लक्ष न देतां उदासीनबुद्धीनें करावें, असें तत्त्वज्ञान ज्या देशांत नांदू लागलें, आणि,
मीं हें भाष नेणें । माझें कांहींचि न म्हणे ।
सुख दु:ख जाणणें । नाहीं जेथें ॥३॥
अशी भगवद्भक्तांची ममत्वरहित अचेतन वृत्ति झाली, तेथें मुसलमानांसारख्या रानटी परंतु वुभुक्षु लोकांनीं राज्य करावें व सर्वस्वापहार करावा, ह्यांत कांहीं नवल नाहीं. ह्यालाच वारक-यांचा एकदेशीं भागवतधर्म ऊर्फ संताळे म्हणतात. गीतेंतील “मा स्मक्लैव्यं गम: पार्थ.” ह्या वचनांत सांगितलेल्या सचेतन भागवतधर्माहून हा अचेतन भागवतधर्म भिन्न आहे. “योग: कर्मंसु कौशले,” हें गीतातत्त्व जर संतमंडळी. नीट ध्यानांत ठेवती, तर भगवंतांचा उपदेश ते यथास्थित समजते. हा एकदेशी अतएव पंगू भागवतधर्म एकनाथांपर्यंत चालून, कांहीं कालानें (५) रामदासस्वामी अवतीर्ण झाले. त्यांनीं दासांच्या म्हणजे महाराष्ट्रांतील गुलाम बनलेल्या लोकांच्या बोधार्थ दासबोधात्मक इतिहास तत्त्वनिरूपक ग्रंथाची रचना केली. त्यांतील तत्त्वज्ञान गीतेंतील तत्त्वज्ञानासारखें सर्वदेशीं व व्यापक आहे.
मराठा तेवढा मेळवावा । आपुला महाराष्ट्रधर्म वाढवावा ।
मारतां मारतां मरावें । मारूनि आपण उरावें ।
वगैरे स्पष्टोक्तया समर्थांच्या प्रसिद्ध आहेत. व्हानसंगानें वर्णिलेला चालुक्यांच्या वेळचा महाराष्ट्रधर्म रामदासांनीं पुन: उज्जीवित केला. त्याचा प्रभाव महाराष्ट्रसमाजांत कोणत्या प्रकारें झाला तें सर्वश्रुत आहे. (६) पुनरुज्जीवित महाराष्ट्रधर्म सुमारें शतक दीड शतक चालून, अचेतन भागवतधर्माची लाट कांहीं काल दबली होती ती महाराष्ट्रावर पुनः उसळली. ब्रहोंद्रस्वामी, रामजोशी सोलापूरकर, भाऊ महाराज, वगैरे एकदेशी लोक ह्या लाटेचे द्योतक होत. अचेतन भागवतधर्माच्या ह्या शैथिल्योत्पादक लाटेनें समाजांत औदासिन्य उत्पन्न होऊन, भोगलोलुप व बुभुक्षु पाश्चात्यांचें राज्य ह्या देशांत झालें. (७) तें चालूं असतां महाराष्ट्रांत विष्णू कृष्ण चिपळोणकर व महादेव गोविंद रानडे ह्यांनी अलीकडील चाळीस वर्षांत महाराष्ट्रधर्माच्या प्रस्तावनेची प्रस्तावना किंचित् करण्याचा आरंभ केला आहे. ह्या दोघाचें तत्त्वज्ञान गीता व दासबोध ह्या दोन ग्रंथांतील तत्त्वज्ञानांशीं बरेंच जुळतें आहे. त्यांतल्या त्यांत, रानड्यांना अचेतन व शिथिल अशा भागवतधर्माचे जे कैवारी संत त्यांची परीक्षा यथात्थित करतां आली नाही, असें म्हणणें अपरिहार्य आहे.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
४७. तत्त्वज्ञानाचा अथवा तात्त्विक कल्पनांचा व प्रपंचाच्या अथवा मानवसमाजाच्या चरित्राचा संबंध बिंबप्रतिबिंबरूप आहे. जें तात्त्विक बिंब मनांत उत्पन्न झालें असेल त्याचें प्रतिबिंब समाजांत प्रतिफलित होतें. उदाहरणार्थ भरतखंडातील आर्यसमाज घ्या. (१) ऋक्संहितेंत भोग्य वस्तूंची प्राप्ति करून देणा-या व शत्रूंचा नाश करणा-या देवतांचे म्हणजे कल्पनांचें स्तवन केलेलें आहे. त्यावरून तत्कालीन समाजांत भोगप्राप्ति व शत्रुनाश हीं दोन तत्त्वज्ञानाची अंगे होतीं असें दिसतें; व ती कालांतरानें आर्यसमाजांत प्रतिफलित झालीं, असें इतिहास सांगतो. (२) बुद्धाच्या तत्त्वज्ञानांत भूतदया व निर्वाण हे दोन मुख्य सिद्धान्त आहेत. त्यांचे पर्यवसान संन्यास व दौर्बल्य या दोन रूपांनीं समाजांत प्रतिबिंबित झालें, दुष्टांवरहि दया करण्याचा जेथें निश्चय झाला व मरणोत्तर शून्यप्राप्ति होणार अशी जेथें खात्री झाली, तेथें शकयवनकिरातादि रानटी परंतु वुभुक्षु लोकांनीं ज्ञानसंपन्न संस्कृत लोकांवर राज्य करावें व संस्कृत लोकांनी निरिच्छ भिक्षु व श्रमण बनून समाजाच्या प्रपंचाचा चुथडा करावा, हें ओघासच येतें. (३) भगवद्रीतेंत बुद्धभिक्षुप्रमाणें कर्माचा न्यास करणें म्हणजे संन्यास नव्हे व क्लैव्याचा अवलंब करून रानटी शत्रूंचा पगडा बसवून घेणें म्हणजे भूतदया ऊर्फ शांति नव्हे, असा सिद्धात केलेला आहे. ह्या सिद्धान्ताचें प्रतिबिंब तत्कालीन आर्यसमाजावर पडून, शकयवनादि म्लेंच्छराजांना आर्यांनीं हाकून दिलें व शातवाहनादि हिंदूराज्यांची स्थापना भरतखंडांत झाली. बुशिडो धर्माप्रमाणें सध्याचे जपानी लोक अपमानाचें निर्यातन प्राण देऊन व घेऊन ज्याप्रमाणें करतात, त्याप्रमाणें चालुक्यांच्या वेळचे मराठे अपमानाचें निर्यातन प्राण देऊन व घेऊन करीत असत, असें शातवाहनाच्या सहाव्या शतकांत हिंदुस्थानांत प्रवास करणारा व्हानसंग लिहितो."If any one insult them, they will risk their lives to wipe out that insult,” (Bhandarkar’s Dekkhan). कृष्णानें अर्जुनाला सांगितलेलें तत्त्वज्ञान येथें बरेंच प्रतिबिंबित झालेलें उत्कृष्ट दृष्टीस पंडतें. ह्यालाच महाराष्ट्र धर्म म्हणतात. (४) हा महाराष्ट्रधर्म शातवाहनाच्या बाराव्या शतकाच्या अंतापर्यंत चालून, पुढें ज्ञानेश्वर आले. त्यांनी भावार्थदीपिकेतून इतर अनेक उत्कृष्ट तत्त्वांबरोबर खालील तत्त्व शिकविलें, व त्याचाच पगडा दुर्दैवानें किंवा सुदैवानें महाराष्ट्रांतील समाजावर उत्कटत्वानें बसला:---
उत्तमातें धरिजे । अधम तरि अव्हेरिजे।
हें कांहींच नेणिजे । वसुधा जेवीं।१॥
गाईची तृषा हरूं। कां व्याघ्रा विष होऊनि मारूं।
ऐसें नेणोंचि गा करूं। तोय जैसें।२ll