Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
लेखांक १९०. १७१५ चैत्र वद्य ३०.
पुा राजश्री व्यंकटपा नाईक बळवंत बहिरीबाहादूर गो यास-
आसीर्वाद विनंति उपरि नवाबाकडील कारभाराचा फडच्या च्यार दिवस लांबविल्यास चिंता नाही ऐसें पुण्याहून सरकारचें आश्वासन आलें असल्यास चिंता नाही जर ही गोष्ट तिकडून नसल्यास इकडील जाबसाल लांबणीवर टाकणे सलाह नाही येविषई गोविंदआपास लिहून उत्तर आणवावें आलस्य न करावा रा छ २८ साबान हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
सुरापुरकर व्यंकटपा नाईक यांचे लेखांक १८९. १७१५ चैत्र वद्य ३०.
पत्राचें उत्तर छ २८ साबान.
राजश्री राजे व्यंकटपा नाईक बळवंत बहिरीबाहादुर गोसावि यास- सकलगुणालंकरण अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य श्नो गोविंदराव कृष्ण आसीर्वाद विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीय लिा असावें विशेष पत्र पाठविलें तें पावलें पुण्याहून गोविंदआपाकडील पत्रें आली त्यांत नवाबाचे सरकाराचा ऐवज ती सालावर द्यावा ह्मणोन जाबसाल उरकला पैकी कांही चिटी आणऊन द्यावी बाकी गोविंदआपा आल्यावर पर्याय करून पाठवावें ऐसे ठरलें ह्मणोन व बंदगानअलीची स्वारी निघणार तालुक्यास उपसर्ग असो नये इत्यादिक ता लिहिलें त्यास यांचे सरकारचा जाबसाल बोलण्यात आल्यास किती दिवस जाले आपल्याकडून कांही एक ठराव होऊन न आला होली मोहगम लिहिणे लिहिलें त्यास मंत्रीसी बोलावयाजोगे जाबसालाचा निश्चय ठराऊन ऐवजसहित पत्रें पेशजी ठरल्याबमोजीब यावी ह्मणजे यांसी बोलण्यास नीट सांप्रत बंदगानअली छ २७ साबानी डेरेदाखल जाले दरमजल बेदरास येतात तालुक्यास उपद्रव न होण्याचा मार मंत्रीसी बोलण्यात येईल परंतु पेशजी जाबसालच अद्याप निर्गमात न आला त्यापक्षी कसें पडेल पाहावें तुह्माकडून जाबसालाचा निश्चय समजण्यात कांहीच येत नाही तेव्हां यांची समजूत तरी कोणे प्रकारें काढावी या गोष्टीची व पुढील आंदेशाची काळजी तुमचे चित्तात नाही असें दिसतें ही गोष्ट चांगली नाही ज्यांत तुमचे दौलतीची बेहबूदी ती गोष्ट अमलात यावी रा छ २८ साबान बहुत काय लिहिणे लोभ कीजे हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
राजश्री अमृतराव लक्ष्मण टकले लेखांक १८८. १७१५ चैत्र वद्य १३.
याचे पत्राचे उत्तर व माहादजी
बाबजी यांचे नांवे पत्र दिल्हे रा
छ २६ साबीन सन १२०२.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री अमृतराव स्वामीचे सेवेसी-
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीये लिहिणे विशेष तुह्मी पत्र पा ते पाऊन मार समजला व कितेक मार राजश्री आपाजीपंत यांचे जबानीवरून कळला ऐसियास तुह्मी सर्वप्रकारे पदरचे हे खरेच यांत गुंता नाही प्रसंगोचित साहित्यास अंतर होणार नाही याचा मार पंतमार सांगतील त्याजवरून कळेल रा छ २६ साबान बहुत काय लिहिणे लोभ कीजे हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
लेखांक १८७. १७१५ चैत्र वद्य १३.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री माहादाजीपंत स्वामीचे सेवेसी-
सेवक गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिहिणे विशेष राजश्री अमृतराव लक्ष्मण टकले औरंगाबादकर याणी वर्तमान सांगितले कीं पूर्वीपासोन मौजे गणोरी पा सुलतानपूर पैकी सालाबाद आंबे मुरंब्यास दाणे शुमार ५० पनास आह्मास पावत असतात व एक कबाड गवताचे मोहदरीचे कुरणापैकी पावत असते ते हाली पावत नाही आपले पत्राचा आक्षेप करितात त्याजवरून हे पत्र लिहिलें असे की मारनिलेस पन्नास आंबे मुरब्याचे दाणे शुमार ५० व एक कबाडाची परवानगी मोहदरीचे कुरणात देऊन चालवावे पहिले पावत असेल त्याप्रा द्यावें रा छ २५ साबान सलास तिसईन मया व अलफ हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
लेखांक १८६. १७१५ चैत्र वद्य ५.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री बळवंतराव स्वामीचे सेवेसी -
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिहीत असावें विशेष रा राजे धरमवंतबाहादूर मुतसदी नवाब बंदगानअली याणी वर्तमान सांगितले की मौजे तुळजापुर ऊर्फ चव्हानवाडी पा हाटे सरकार नांदेड हा गांव महमद दौलतखानबाहादूर याणी आह्यास तवजा केला आहे तेथील चौथ बाबती सरदेशमुखी व साहोत्र्याची मामलत खानमार पामजकूरचे मामलतीत फडच्या करून देतात त्यास येविसीं आपण बळवंतराव सुभेदार यास पत्र द्यावें त्याजवरून हे पत्र लिा असे की मौजेमारचे स्वराज्याचे मामलतीचा फडच्या पामारचे अमलात सुदामतप्रो खानमार याजकडोन करून घ्यावा मौजेमारास मुजाहीम न व्हावें कदाचित् खानमार न करून देतील तरी लिहून पाठवावें रा छ १९ साबान बहुत काय लिा लोभ कीजे हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
लेखांक १८५. १७१५ चैत्र वद्य ५.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री गोपाळराव स्वामीचे सेवेसी-
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिहिणे विशेष राजश्री राजे धरमवंतबाहादूर याणी वर्तमान सांगितले की मौजे वाघी तर्फ सुगांव पा नांदेड हा गांव आमचे पुत्र राये केवलकिषन यांस जागीर आहे तेथील चौथ बाबती व सरदेशमुखी व सावोत्रा यांचा फडच्या मामुलाप्रो सन १२०२ सालचा करून देऊन रसीदा घेतल्या त्या बजीनस हाजर आहेत असें असतां हरघडी गांवास स्वार प्यादे नसतां बाहाना व सबब लाऊन पाठऊन गांवखर्चाखालीं आणितात त्यास येविसीं आपण पत्र ल्याहावें त्याजवरून हे पत्र लिहिलें असें की सन १२०२ सालचा फडच्या मामुला प्रों करून दिल्हा असतां मग गांवास स्वार प्यादे उगाच बाहाना करून पाठऊन गांवखर्चाखाली आणे हे ठीक नाही हे नवाब बंदगानअली याचे सरकारचे मुतसदी रात्रंदिवस नालषी करितात व रसीदा दाखवितात याचा परिहार कोठवर करावा त्यास याउपरि मौजे मारास उपद्रव न करितां हरएकविसी यांचे अमीलाचे साहित्य करीत जाणे ह्मणोन तीन पत्रे छ १९ साबान बहुत काय लिहिणे लोभ कीजे हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
सदरहू मजकुराचे दुसरे पत्र. लेखांक १८४. १७१५ चैत्र वद्य ५.
राजश्री राघोपंत फाटक कमाविसदार
निा सरकार रा छ १९ साबान.
राजश्री राजे धरमवंत भवानीदास याणी राये केवलकिषन आपले पुत्र याचे जागिरीचे गांवाविसीं पत्रें मागितली येणेप्रमाणे पत्रें छ १९ रोजीं माहे साबानी दील्ही तपसील.
एका माराची पत्रे ३
१ बळवंतराव सेळूकर १ मौजे तुळजापूर पा हाटे
१ गोपाळराव नलेगावकर बा बनाम बळवंतराव
१ पांडुरंगपंत सरदेशमुख लक्ष्मण सेलूकर
--- ---
३ ४
यो पत्रें च्यार पैकी खतावणीस दोन असेत.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
सदासीव नाईक खासबरदाराचे लेखांक १८३. १७१५ चैत्र वद्य ५.
याचे मागितल्यावरून पत्रें दोन
गवळ्याकरितां दिल्ही रा छ १९
साबान सन १२०२.
खांसाहेब मेहरबान दोस्तान सिदीइमामखानबाहादूर दाममोहबतहू गोविंदराव कृष्ण सलाम आं की एथील खैर सला जाणून साहेबी आपली खयेरीत हमेषा कलमी करीत असिलें पाहिजे दिगर मजमून की को चिटगोपें एथे माहादजी गौळी सर्वत्र गौळी यांचा गुरु होता तो लावलद लेकीन हिलेहायात असतां मुतबना पुत्र सर्व गोत व कसबेकर जमीदार व मोकदम यांचे साक्षीने घेतला त्यास बाळू गौळी याचे ह्मणे की मजला आधी घेतले ह्मणोन दोघांचा वाद पडला आहे याजकरितां आपणास हे पत्र लिहिलें आहे की याची माहीतगारी तेथील गौळी व जमीदार व मोकदम व पटवारी वगैरेस असेल ते दर्याफ्त करून मुफसल लेहून पाठवावें रा छ १९ साबान ज्यादा काय लिहिणे.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
पत्र राजाराम यांस गोविंद बलाळ लेखांक १८२. १७१५ चैत्र वद्य ५.
याणी मागितले त्यावरून दिल्हे
छ १९ साबान.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री राजारामपंत स्वामीचे सेवेसी-
सेवक गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिहीत जावें विशेष राजश्री दौलतराव निंबाळकर ब्रह्मगांवकर याजकडून राजश्री गोविंदराव बलाळ यांचे पनास रुो येणे ते वसुलांत येत नाहीत ह्मणोन कळले त्याजवरून तुह्मास लिहिले आहे तर सदरहू पनास रुा मारनिलेकडील ऐवजी उगऊन घेऊन गोविंद बलाळ याजकडे द्यावे रा छ १९ साबान बहुत काय लिहिणे लोभ कीजे हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
बाळंभट खरे यांस पत्र लेखांक १८१. १७१५ चैत्र वद्य ५.
धारासींवकर यांचे जासुदासमागमे
पाठविले छ १९ साबान.
वो राजश्री बाळंभट खरे स्वामीचे सेवेसी-
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिहित जावें विशेष तुह्मी पत्र पा ते पावलें चिरंजीवाचे लग्न दुसरें जाले त्याचे ब्रह्मस्व जाले ह्मणोन विस्तारे मार लिा तो कळला त्यास सर्व ध्यानात आहे प्रसंगोपात घडेल ते खरें विस्मरण नाही रा छ १९ साबान बहुत काय लिो लोभ कीजे हे विनंति.