Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

[ १२२ ]                                            श्री.                                               १७३१.

सरंजाम राजश्री रामचंद्र पंडित अमात्य वारणेचा उत्तरभाग.
(पुढील मजकुर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

श्री.

विनंती विज्ञापना, नवाबास सकाराचें खरीतापत्र प्रविष्ट करून येक कल.

माची फर्द सरकारांतुन ठराऊन आली. ती दाखविल्या नंतर नबाब बोलले कीं “ इंग्रजांनीं सात दफा ठरऊन यादास्त पाठविली असतां, हे एक कलमाची “ मुख्तसर फर्द यांत ते मतलब उगवत नाहींत. मुख्तसर फर्द ठरवावयाची “ सबब काय ?'' ह्मणोन मजला विच्यारिलें. याचें उत्तर मीं केलें कीं “ पेशजी टिपु सुलतान यांचे मसलहत प्रकर्णी तीन सरकारचे तहनामे परस्परें “ जाले त्यांतील आह्मांकडील तेरावे व इकडील दाहावे दफेंत आईदा तजवीज “ठरावी असें आहे. त्या प्रकर्णी हल्लीं इंग्रजांनीं सात दफेची यादास्त पाठविली, “ तो मतलब एक कलमांतच उगवला. त्यापक्षीं सात दफेचें लिहिणें तुल व विशेष “ नाहीं. तेरावे व दहावे दफेंतील जो मजमून याचा मतलब या फर्देत आला, “ तेव्हां लांब लिहिण्याचें प्रयोजन नाहीं, सबब एक फर्दच ठरली यांत कांहीं गेलें “ नाही.'' याजवर मध्यस्त बोलले कीं “ पुढील तहनामा झाल्यानंतर मागील “ तहनामा बरबाद होतो. मागील तहनाम्यांत तेरावे व दाहावे दफेंत आईंदा “ तजवीज ठरावयाचा लेख. त्यासआंईदा “तजवीज ठरण्याचा तरकीब इंग्रजांनीं “ सात दफेची याद पाठविली त्यांत उघडी आहे. या मुख्तसर कलमांत मागील “ तहनाम्यावर हवाला पडला यांत ठराव व्हावा तो कांही जालाच नाहीं “तेव्हां पहिला तहनामा आहे तोच, अधीक काय ठरलें ? आइंदा “ तजविजीची तरकीब काय ठरली? असे इंग्रज ह्मणो लागल्यास याचा जबाब “ काय ?” याचें उत्तर मीं केलें कीं “ इंग्रज वाजवीनें बोलूं लागल्यास याचा “ जबाब हाच कीं तेरावे व दहावे कलमांत टिपूकडून बद आहदी दर येकासी “ जाल्यास, त्याचा ठराव आइंदा तीन शरीकाचे विच्यारें व्हावा “ येसा साबीक तहनाम्यांतील करार, याचा ठराव हलीं जाला कीं बद “आहदीची दर्याफ्त दोघां शरीकांनीं करून तरफसानीकडे नसियतपूर्वक “ सांगोन पाठवावें, इतक्यावर त्यानें न ऐकिल्यास पहिले तहनाम्याप्रा करावें “ असें आहे. त्या अर्थी ठराव उलगडुन जाला; ठराव न होण्यांत बाकी “ काय आहे ?” या प्रा बोलल्यानंतर मध्यस्त मागती बोलले कीं “ ज्यासमई “तरफसानीकडून बद आहदी होईल त्याप्रसंगीं जर इंग्रजास गरज आहे. “तर तुह्मीं ह्मणतां याचा प्रा समजोन कांहीही प्रतींची सबब दरपेष न “आणितां चालतील; हें न होतां त्यांजला गरज नाहीं असें जाल्यास, याचा “उलट अर्थ करतील कीं, साबीक तहनाम्याचे तेरावे व दहावे दफेत आइंदा “ शकल ठरावी असें आहे त्याची शकल तर अलिकडे काहीं मुख्तसर “ फदेंत ठरली नाहीं; मागील तहनाम्याप्रा करावें ऐसा लेख; मागील “ तहनाम्यांत तो ठाराव नाहीं; त्यापक्षी ठराव आतां होणें; तेव्हां त्या वख्तीं “ जसी गरज व मतलब तसें ह्मणों लागतील; त्यास नाहीं होय ह्मणावयाची “ दरज राहत नाहीं. यास्तव प्रसंगोपात त्यांची दरज कांहीं न राहतां हलींचा “ तहनामा उलगडावा. तो या मुख्तसर कलमानें. पुढें इतका विच्यार “ आहे, यास्तव इंग्रजांनीं सात दफे लिहिल्या त्यात खुलासा ठरावाची “ तरकीब आहे त्याप्रा खोलून असावें हें सलाह.” या प्रा मध्यस्त बोलले. त्यास सात दफे न लिहिण्याचीं कारणें सर्व मनांत, परंतु यांसीं त्यांतील कांहीं बोलण्याची आज्ञा नाहीं, आणि हीं मनांतील कारणें; यांचा फायाषही करावयाचा नाहीं; याजकरितां फर्देत जें लिहिलें होतें त्या अन्वयें यांसीं बोलण्यांत आलें. एक गोष्ट मध्यस्त बोलले की “मागील तहनाम्यांत “ आइंदावर हवाला दिल्हा. त्याचा ठराव हलीं होतो यांतही मोहगम आहे. “ तरकीब ठरली नाहीं. हीच दिकत इंग्रज घेतील” याचें उत्तर त्यांस असें दिलें कीं “ आइंदा शकल ठरावांत येईल असें पेशजीचे तहनाम्यांत आहे. ह्मणोन “ हल्लीचे येका कामाचे फर्दांत लिहिलें आहे र्की षकल पेशजीचें तहनाम्याप्रा “तिंही षरीकांनीं करावी. त्यास जसी पूर्वी त-हे मसलहतीची ठरली त्या “ प्राच तरकीब; ऐसा अर्थ यांत निघाला कीं नाही ? तेव्हां हल्लीची “ फर्द मोहगम नाहीं. यांत तरकीब ठरावांत आली. साता कलमांचा तहनामा “ केला; त्यांत तूल फार आहे. एक कलमाची फर्द ठराविली, यांत मुख्तसर “ थोडक्यांत आहे, अर्थ कांहीं गेला नाहीं, असें समजोन ही फर्द ठरून “ आली. त्यास दोंहीं सरकारचें येकवाक्यतेचें उत्तर इंग्रजांसी व्हावें इतकाच प्रकार” याजवर नबाबांसमक्ष मध्यस्त बोलले कीं “ इंग्रजांनीं “ ठराविलें त्यांत षरीकाचे फौजेनें प्रसंग पडतांच जे हजर असेल तित “ क्यानसी सामील व्हावें. नंतर पुढें कसें करावें याची तजवीज तिघांचें “ विच्यारें ठरऊन करावें याप्रा उलगडून लिहिलें, तसें या फर्देंत उलगडलें “ नाहीं, याजकरितां मनांत कल्पना येतात त्या सांगतों. त्याप्रा तुह्मीं “ श्रीमंतांस लिहून पाठवून उत्तर आणवावें नंतर ठरविण्यांत येईल, असें “ नवाबांनीं सांगितलें” त्याप्रा कलमबंदीची पुरवणी आलाहिदा पा त्यावरून ध्यानांत येईल राछ १५ मोहरम हे विज्ञापना.

शके १७१५ श्रा. व. २२ शुक्रवार.

सेवकाचें वर्तमान यथास्थित असे विशेष- छ २० माहे जिल्हेजचें पत्र सरकारांतुन सादर जालें तें छ २७ माहे मारीं पावले. त्यांत “ नबाब टिपु “ सुलतान बाहदुर यांचे मसलहतसमंधी तिहीं सरकारचे करारनामे जाले, “त्यांत सरकारचे तेरावे कलमांत, व नबाबाकडील दहावे कलमांत, “ आइंदा टिपु बाहदुर यांनीं बदआहदी केल्यास तिहीं सरकारांनीं येक होऊन “ त्याची तंबी करावी. याचा ठराव पुढें तीहीं सरकारचे सलाहानें केला “ जाईल ह्मणोन करार आहे. त्यास जनराल लाड बाहदुर यांजकडून मिस्तर “ किनवी यांनीं याद नबाव निज्याम आलि खानबाहादुर यांस दाखविली “त्याची नकल नबाबांनीं तुह्मांपासी दिल्ही, तुह्मी हुजुर पाठविली, व मिस्तर “ मालिट यांनीं सरकारांत याद गुजराणिली; दोहींचा मार येकच. त्यास याचा “ विचार पाहतां करारनामा पहिला जालाच आहे; हासल मुदा टिपुने बदमा “मली केल्यास त्यास तंबी करावयाची. याजकरितां या कलमाचाठराव “ येकाच कलमांत ठराऊन फर्द पाटविली आहे, ते मिस्तर मालिट यास “दाखविली. त्याचे बोलण्यात आलें कीं “लाड बाहदुर यांचे यादी बामोजीब “व्हावें; त्यास तेरावे कलमांतील मसलहतीच्या ठरावाच्या शकला यांत आल्याच “ आहेत. याजकरितां येकच कलम ठराउन पाठविलें यांत जाबसाल उगवेल. “ या माराचें थैली पत्र नबाबास व ठरावाची फर्द पाठविली” असें पत्र देऊन “ फर्द दाखवणें, याचे जाब घेऊन लौकर पाठवणें " ह्मणोन आज्ञा त्यास नबाबाकडे जाऊन मध्यस्त समीप असतां सरकाराचें थैलीपत्र प्रविष्ट केलें, व येक कलमाची फर्द सरकारांतुन आली, तेही दाखविली; याजवर, तीनचार घटिकापंर्यंत बोलणें जालें. याचा ता आलाहिदा पुरवणीपत्री विनंती लि आहे. आवलोकनें सविस्तर मार ध्यानात येईल. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना.

शके १७१५ श्रा: वः २ शुक्रवारः

लेखांक ९१                                                                                                                                      १५७२ मार्गशीर्ष शुध्द ७
                                                                                                               
                         79                                        63

                                                                                      (पांच ओळी फारसी मजकूर)

अज दिवाण पा। वाई ता। मोकदमानी मौजे पसर्णी सा। हवेली पा। मा। सु॥ इहिदे खमसैन अलफ बा। खुर्दखत पा। दर सालगु॥ अज खमसैन अलफ छ १८ माहे जमादिलाखर सादर जाले जे दरीविले नारायणभट बिन गोपिनाथभट चित्राउ सो। का। मा।र मालूम केले जे आपणास इनाम जमीन चावर .. दर सवाद मौजे मा। देखील नखतयात व बाजे उजुहाती वा खरीदीगला व बैलेकटी व मो। खर्च कुलबाब बा। खुर्दखत मुकासाइयानी माजी मुतने रवा अस्त बा। भोगवटा तसरुफाती पाहून दुबाले कीजे दर हर साला खुर्द खताचे उजूर न कीजे तालीक लिहून घेउनु असल परतून दीजे ह्मणौउनु रजा व भोगवटा मिसेली ठाणा दर सालगु॥ छ ३ जिल्हेज जमीन चावर .. दर सबाद मौजे मा। दो। बाबा दाये सदरहू तेणे प्रमाणे जाहात साल मा। दुबाल केले, असे बा। भोगवटा तसरुफाती सालाबाद ता। सालगु॥ चालिले प्रमाणे दुबाले कीजे तालीक लिहून घेउनु असल परतून दीजे

                                                       79

तेरीख ५
जिलकाद

श्री.

महाराष्ट्र इतिहास.

( गोविंदराव काळे यांचें दफ्तर.)

सरकारी-रावसाहेब

श्रीमंत राजश्री माधवराव
नारायेण पंत प्रधान यांस

पत्रे रवाना केलीं.
------
आवो तीसईन.
------
माहे मोहरम उर्फ श्रावण मास चंद्र १५ रोजीं डांकेवर,
शके १७१५ श्रा. व. २ षुक्रवार,

श्री.
श्रीमंत राजश्री --- --- राव —

साहेब स्वामीचे सेवेसीं

विनंती. सेवक गोविंदराव कृष्ण कृतानेक सा नमस्कार विनंती विज्ञापना. ता। छ १५ माहे मोहरम पर्यंत मु बेदर येथें स्वामीचे कृपावलोकनेंकरून

रंकाळें.

कोल्हापुरास एक मोठा तलाव आहे, त्याला रंकाळयाचा तलाव ह्मणून ह्मणतात. त्याचें कारण असें सांगतात की ह्या ठिकाणीं एक अत्यंत दरिद्री माणूस रहात होता. त्यानें कवडी कवडी भिक्षा मागून हें तळें मूळ बांधिलें. ह्या आख्यायिकेवर जर फारशी भिस्त ठेविली नाहीं, तर ह्या शब्दाची व्युत्पत्ती निराळया त-हेनें करतां येण्यासारखी आहे. कोल्हापुरास पुष्कळ तळ्यांना नावें झाडावरून पडलीं आहेत. जसें- पद्माळें वगैरे. त्याप्रमाणेंच रंकाळें शब्द हा एका जुन्या वनस्पतीवाचक शब्दाचा अपभ्रंश आहे लंकालय असा शब्द गाथासप्तशतीच्या चवथ्या शतकाच्या ११ व्या श्लोकांत आला आहे. १६ “लंका रक्षःपुरी शाखा शाकिनी कुलटासुच " लंका ह्मणजे झाडी, कुंज. ज्या तळ्याभोंवती कुंज आहेत ते लंकालय. ह्या लंक लयांत एक जुना संध्यामठ आहे. तो पन्हाळच्या भोजराजाच्या वेळेपासूनचा आहे असें ह्मणतात. व त्या मठाच्या रचनेवरून तो त्या वेळचा असावा ह्यांत संशय नाहीं.
विश्वनाथ काशीनाथ राजवाडे.

सातारा.

हा शब्द सितारा ह्या फारशी शब्दापासून निघाला असावा असें अनेकांचें ह्मणणें आहे. माझ्या मतें, हा शब्द शुद्ध मराठी आहे. सध्याच्या साता-याच्या दक्षिणेस सातें ह्मणून एक गांव आहे, त्याच्या जवळचा जो दरा तो सातदरा. ही सातदा सातारा किल्याच्या दक्षिणेस ऊरमोडीच्या पलीकडे जो डोंगर आहे त्याच्या कुशींत आहे. जुना सातारा ह्मणून ज्याला ह्मणतात तें गांव व तो दरा येथेंच होतें व आहे. पुढें महा द-याच्या जवळ जुन्या साता-यांतील लोकांनीं येऊन वस्ती केली, तेव्हां त्या वस्तीला सातारा हें नाव पडलें. मराठी सातारा व फारशी सितारा हे शब्द एका वेलांटीनेंच तेवढें भिन्न असल्यामुळें व फारशींत सतारा व सितारा हे दोन्हीं शब्द एकाच अक्षरांनीं लिहित असल्यामुळें, सातारा हा शब्द सितारा ह्या फारशी शब्दाचा अपभ्रंश असावा, असा तर्क निघाला. परंतु, मुसुलमानांचें आगमन महाराष्ट्रांत होण्याच्या पूर्वी सातदरा ऊर्फ सातारा अस्तित्वांत असल्यामुळें, हा तर्क निराधार आहे हें उघड आहे.

पेण.

प्रकीर्ण ह्याचें प्राकृत पइण्ण. प्रकीर्णग्राम=पइण्णगाम=पेण्णगांव-पेण जेथील घरें मूळचीं दूर दूर होतीं तें पेण गांव.

वसई
.

सं. वसति=प्रा. वसइ.

पैठण.

फलस्थान=फलठाण=फलटण. मल्लस्थान-मालठाण=मलठण, बिंबस्थान= बिंबटाण=ठाणें. प्रतिस्थान=पइठाण=पैठण. पट्टन ह्या शब्दाशीं पैठणाचा काहीं एक संबंध नाहीं.

लेखांक ९०                                                                                                                                      १५७१ अधिक आषाढ वद्य ७
                                                                                                               
                                                                                            63

                                                                                              (फारसी मजकूर)

अज रखतखाने खोदायवदखाने अलीशान खा। अफजलखान माहमदशाही खुलीदयामदौलतहू बजानेब कारकुनानि हाल व इस्तकबाल वा देसमुखान पा। वाई बिदानंद सु॥सन खमसैन अलफ दरीविले अमणभट बिन दामोदारभट क्षीरसागर सेकिना मौजे एकबे पा। मजकूर हुजरु येउनु मालूम केले जे आपणासी इनाम जमीन चावर नीम दर सवाद मौजे मजकूर बरतरफ बितपसील

तरफ विठोजी पटेल                            तरफ अंबाजी बा। महिसासुर
नजीक गावदरी जमीन                       जमीन चावर रुबे
              ..                                                .. 

देखील माहसूल वा नखतयाती वा लवाजिमाती वा बेलेकटी व मोहीमखर्च वा बाजेबाब वेठ बेगार कुलबाब सालाबाद ता। सालगु॥ बरहुकुम खुर्दखत मोकासाइयानि माजी पा। मजकूर भोगवटा होउन चालत आहे हाली पा मजकूर साहेबासी मोकासा अर्जानी जाहले आहे माहली कारकुनानि ताजा खुर्दखताचे उजूर करीत आहे नजर इनायत फर्माउनु सदरहू इनाम दुबाला फर्माव्या रजा होय म्हणुनु मालूम जाहले मेबायद के सदरहू इनाम बिमोजीब खुर्दखत मोकासाइयानि माजी प्रमाणे भोगवटा व तसरुफाती सालाबाद तागाईत साल गुदस्त कैसे चालिले असेल त्याणेप्रमाणे दुबाला करून चालवीजे बऔलाद वा अहफाद चालवीजे दर हर साला खुर्दखताचे उजूर न कीजे तालीक लेहून घेउनु असल खुर्दखत परतुनु दीजा पा। हुजूर

                                  86


तेरीख २०

जमादिलाखर                                            सुरु सूद

 

धणीचाबाग.

साताराशहरांत पहिल्या शाहु महाराजांच्या वेळेपासून छत्रपतींचे कांहीं बाग आहेत. पैकीं एका बागाला धणीचाबाग ह्मणतात, व एका विहिरीला किंवा चिरेबंदी जल विहाराच्या जागेला धणीची विहीर म्हणतात. धणीची बाग व धणीची विहीर म्हणजे कोणाचा बाग व कोणाची विहीर म्हणून कित्येक लहान मोठ्या माहितगार लोकांस विचारतां समाधानकारक उत्तर मिळत नाहीं. कोण ह्मणत, धणी ह्मणजे धनी अर्थात् छत्रपति. परंतु धनी शब्दांतील नीचीणी कशी झाली तें कोणी सांगेना, कोणी ह्मणत धनीण ह्या शब्दाचा अपभ्रंश धणी असावा. त्यांच्यां मतें धनिणीचा बाग ह्याबद्दल धणीचा बाग असा जलद बोलण्यानें अपभ्रंश झाला असावा. ही व्युत्पत्ति खरी मानण्याला एक अडचण येई. ती अशी कीं ह्या बागेंत शाहूच्या राण्या रहात नसून एक सुस्वरूप नाटकशाळा रहात असे. राण्या रहात असल्या तर धणी म्हणजे धनीण ऊर्फ राणी असा अर्थ करतां आला असता, तेव्हां धणी ह्या शब्दाचा दुसरा कांहीं तरी अंर्थ असला पाहिजे. धणी हें विशेषनामहि नाहीं, अर्थात्, धणी हा शब्द आधुनिक मराठीं भाषेतून बहुतेक लुप्त झालेला असला पाहिजे व त्याचा पत्ता चार पांचशें किंवा नऊ दहाशें वर्षांपाठीमागें काढीत गेलें पाहिजे. निर्णयसागर छापखान्यांत छापलेल्या प्राकृत पिंगलसूत्रांच्या ६४ व्या पृष्टावर खालील श्लोक आहे.

प्राकृत.

रे धणि मत्तमअंगजगामिणि, खंजणलोअणि, चंदमुहि, । चंचल जुव्वण जात ण आणहि; छइल्ल समप्पइ काँइ णहि ? ॥

संस्कृत.

रे प्रिये मत्तमतंगजगामिनि, खंजनलोचने, चंद्रमुखि, । चंचलं यौवनं जातं न जानासि; विदग्धेभ्यः समर्पयसि कुतो नहि ? ।।
त्यांत धणी ह्या शब्दाचा अर्थ वारयोषित् आहे. हाच धणी शब्द साता-यांतील धणीचा बाग व धणीची विहीर ह्यांच्या मालकिणीला लागलेला अद्यापही। ऐकूं येतो.

कान्हेरी, कण्हेरी, कण्हेरखेड कानगाव

कन्हगिरीचा अपभ्रंश कन्हेरी, कान्हेरी, कण्हेरी, कण्हेरी हे गांव वाईच्या उत्तरेस असणा-या मांढरदेवीच्या डोंगराच्या पूर्वेस दोन कोसांवर व शिरवळाच्या दक्षिणेस दोन कोसांवर आहे. येथें डोंगरांत एक विहार आहे. त्याचें तोंड एका प्रचड शिलेनें कोंदलें आहे. आंत खोल्या, तळें वगैरे आहेत ह्मणून वृद्ध सांगतात. कण्हेरी येथील रामदाशी मठाचे मूळ संस्थापक वासुदेवबोवा-रामदासस्वामीचे शिष्य---ह्या गुहेंत तपश्चर्या करीत असत.

खंडाळें, खिंडाकें.

महाराष्ट्रांत खंडाळीं पुष्कळ आहेत. खिंडतल, खंडतल, खंडअळ, खंडाळ, खिंडाळ, अशा परंपरेनें हा शब्द आला आहे. खिंडीच्या तळचें किंवा माथ्यावरचें जे गांव ते खंडाळें.

पंढरी.

गांव व भोंवतालील शिवार ह्यांना पंढरी व काळी अशा संज्ञा महाराष्ट्रांत प्रसिद्ध आहेत. गांवांतील घरठाणाची जेवढी जागा तेवढी पांढरी; व शेतें, कुरण, वगैरे सर्व काळी. पंढरीस मूळची कोट्यांची वस्ती दहापाच घरांची होती. ह्मणून तिला मुळीं पंढरी अथवा पांढरी ह्मणत, जेथें सध्या विठोबाचें देऊळ आहे तेथें पूर्वी शेतें होतीं. ह्या काळींचा जो देव त्याला काळ्या ह्मणत. ह्याच काळ्याला सान्निध्यानें पंढरीचा राणा ह्मणू लागले. ही माहिती एका वारक-यानें दिलेली आहे.