Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

-२ [ आभरः = आभ्रा (आ + भृ ३ धारणे) ] (धातुकोश-आभर पहा)

आमणें [अम् १ रोगे, गतौ. अमनं = आमणें, आंबणें ] ( धा. सा. श. )

आमिकलेलें [ आमिक्षित ] ( आविकलेलें पहा)

आयजी बायजी [ अतिजातिः = अइजाइ - आयजी ( स्थानांगसूत्र ). व्यतिजातिः = बइजाइ = बायजी ]
पितुः संपदं अतिलंघ्य जातः अतिजातः समृद्धतरः । पितुःईषद्धीनगुणः व्यतिजातः । श्रीमंत बापाच्या जोरावर गुणहीन मुलगा उदार. आयजीच्या जीवावर बायजी उदार.

आयत ( ता-ती-तें ) [ संस्कृत आयत् वर्तमानकालवाचक धातुसाधित. त्यापासून मराठी आयत. आयत् = आयत ( ता-ती-तें ) ] आयत म्ह० चालून येणारें. आयतें अन्न म्ह० श्रम न करतां चालून येणारें अन्न. आयती सोय म्ह० श्रम न करतां होणारी सोय. आयतखाऊ म्ह० श्रम न करतां चालून येणारें अन्न खाऊं पहाणारा. (भा. इ. १८३३)

आयतें [ आयत ( आकस्मिक) = आयतें ] तन्नायतं बोधयेदित्याहुः (बृहदारण्यकोपनिषद्, तृतीय ब्राम्हण, १४)

आया [ आत्प्री ] ( आई पहा )

आयास प्रयास { आयस्  प्रयस् } to exert to excess यासयति जाचणें. 

आरण [ आरण्यक = आरण ] आरण्यक म्हणून जो वेदाचा भाग आहे त्याला भिक्षुक आरण म्हणतात. (भा. इ. १८३४)

आरत  [ आर्ति = आरत ] पुरासंवत्सरादार्तिमाकृष्यसि । गोपथब्राह्मण, प्रथम प्रपाठक ॥ ३१ ॥ (भा. इ. १८३४)

आरपार [ अवारपारं (अलीकडून पलीकडे) = आरपार. अवार this side = आर; पार that side of river = पार ] आरपार from this side to that side.

आरवट (माणूस) [ आरभट (हिय्येबाज) = (लक्षणेनें) आरबट ( आरंभशूर ) ] (भा. इ. १८३४)

आरसा [ आदर्श = आदरस = आयरिस = आरस = आरसा. हा शब्द फारसी नाहीं ] (स. मं.)

आरसेंपारसें [ रस् १० आस्वादने. अरसंप्रारसं = आरसें पारसें. अरस म्ह० रसहीन, चवहीन; प्रारस म्ह० अतिशय बेचव ] ( धा. सा. श. )

आराणुक [ आ + राध् ५ संसिद्धौ. आराधनिका ] (धातुकोश-आराअ पहा)

आराधी [ आराधिन् (देवपूजकः ) = आराधी ]

क्षण येक सावध होउनी ।। राव उतरला अश्वावरोनी ।।
सन्मुख उभा राहोनी ।। विनवों लागला ।। १०५ ।।
कवण होसि तूं नागरी ।। सांगे मजसिं झडकरी ।।
कवण तुझा साहाकारी ।। हे स्थळी ।। १०६ ॥
तुं कवणाचि सुंदरा ॥ कीं यद्यपिं कुमारा ।।
हा निर्धार सत्वरा ।। सांगिजे मज ।। १०७ ।।
येरी होति ध्यानस्त । मैान्य प्रकार दृढवंत ॥
सुशिळ आचार्यवंत ।। जपमाळिका ।। १०८ ॥
राजा विचारि आपुले मनी ।।प्रतिउत्तर न बोले कामिनी ।।
राजा विव्हळ कामबाणी ।। ह्मणे कैसें करावें ।। १०९ ।।
की हे आदिशक्तिमहंमाया ।। कि अपसरा देवलोकिचिया ।।
हे बैसलि असे या ठाया ।। काये ह्मणेानी ।। ११० ।।
ऐसा विचार करितां राजयासी । दीन गला अस्तमानासीं ।।
तेथे झाली निसी ।। गुंफेमाजी ॥ १११ ।।
तंव तिये ध्यान विसर्जिलें ॥ दृष्टि राजयातें देखिलें ।।
मग पुसों आदरिलें ।। तयाप्रती ।। ११२ ।।
तुं कवणाचा कवण होसी ।। कवण देशिं नांदसी ।।
या गुंफे केवि आलासि ।। कवणे परी ।। ११३ ।।
येरु ह्मणे मी राजा शोमवंशी ।। हस्तनापुरि नांदतो परियेसी ।।
वह्याळि खेळतां गुंफेसी । आलों येथें ।। ११४ ।।
तुझें लावण्य देखोनी ॥ भुललो असे मी कामबाणी ।।
आतां विनति आईंकानी ।। अनुसर देई ।। ११५ ।।
येरि ह्मणे मी उपवरी ।। भद्राक्ष ऋषिची कंन्या अवधारी ।।
तपस्वि ब्रह्मचारी ॥ असे येथे ।। ११६ ।।
तुं क्षेत्रि मी ब्राह्मणी ।। हा अधर्म केवि तुझे मनी ।।
जें ब्रह्मादिका अमान्य पुराणीं ।। तें केवि घडे ॥ ११७ ॥
रुद्राक्ष ऋषि माझा पिता ।। जो तपस्वि सूर्य जैसा तत्वता ।।
त्याचि मी दुहिता ॥ येथे असे ॥ ११८ ॥

आपैतें [ आत्मायत्तं = आपैतें dependent on oneself, controlled by one's self.

आपैसा [अल्पायासः ] (ज्ञा. अ. ९ पृ. ३४)

आपकारा [ अप् + करक: ] (अपकारा पहा )

आव १ [ आवः ( अव् स्वाम्यर्थे ) = आब ] आब राखणें to keep one's position of superiority.

-२ [ आभा appearance = आब ] appearence. आब राखणें to keep up appearances

आंबट [ अंबष्ठ = आंबट ( ब्राह्मणात् वैश्यायां जातः ) ] कनिष्ठ जातींत आंबट, गोड, कडू असे भेद सध्यां हि आहेत. (भा. इ. १८३२)

आंबटवेल [ अंबष्टवल्ली = आंबटवेल ] (भा. इ. १८३४)

आंबट्या [ दह्या पहा ]

आबण बाबण [आत्मन् = आप्पण = आपण = आबण.
पाप्मन् = पापण = वावण = बाबण (विशेषनाम ) ]

आंबणें [अमनं ] (आमणें पहा)

आवद [ आपद्, आपदा = आबद, आब्दा, अब्दा ]

आंबवणी [आम्लपानीयं = आंबवणी ] (भा. इ. १८३२)

आवळ १ [ अबल्यं ( weakness) =आबळ (बृहदारण्यकोपनिषद्)]

-२ [ बाध् १ लोडने- आबाधा ] (वाभाडा पहा)

आबाळ [ बाध् १ लोडने-आबाधा ] ,,

आंबिल [ आम्ल = आंबिल पाली ] (भा. इ. १८३२)

आबू [ आवुक = आबुअ = आबू-अबू ] बापाचें किंवा वडील पुल्लिंगी माणसाचें नांव. संस्कृत नाटकांत हा संस्कृत शब्द बोलण्याच्या भाषेंत येतो. तसा मराठींत हि तो बोलण्याच्या भाषेंत येतो. (भा. इ. १८३३)

आबोली [म्लै १ हर्षक्षये. अम्लाना=आमोली=आबोली ] एक फुलझाड आहे. ( धा. सा. श. )

आंबोळी [ आम्लवोलिका = आमबोळी = आंबोळी ] (भा. इ. १८३६)

आब्दा  [ आपद्, आपदा ] (आबद पहा)

आभाव [आभास Semblance = आभाह = आभाव ] semblance, appearance. केवळ आभाव आहे its mere appearance

आभ्रा १ [ अंबरकः ] (अभ्रा पहा)

हे राजे दक्षण दिशे राहिले याचि गोत्रें ही गोत्रें शोमवंशास ।। छ.
ऐसि गोत्रें सांगितली ॥ शोमवंश वंशावळी ।।
भविष्योत्तर बोलिली ॥ शैयाद्रिखंडि निवाडा आहे ।। ९३ ॥
दुसरा निवाडा ब्रह्मोत्तरखंडी ॥ तेथें बोलि असे उघडी ॥
जे भविष्योत्तरि कथा बरवी ।। व्यासें बोलिली असे ॥ ९४ ।।
रुषिवाक्यं संपुर्ण ।। जेऐकतां निवति श्रवण ।।
ब्रह्मोत्तरंखडिचें निरोपण ॥ कथा अनुपम्य साजिरी ।। ९५ ॥
जैसें व्यासवाक्य उत्तभ ॥ ऐकतां हरति दोष दारुण
भविष्योत्तरिचें निरोपण ॥ जन्मेजयकृत्य ।। ९६ ॥
जैसे परीक्षितिसीं श्रवण जालें ॥ त्याचें दोष गेले ॥
शोमवंशिउद्धरिले ।। पूर्वज तेण्हे ॥ ९७ ॥
ते हे कथा पवित्र ॥ कलयुगि राहिला साक्षात्कार ।।
शोमवंश महासमुद्र ।। वरदिजे हे ॥९८ ॥
असंख्य संवत्सर लोटले ॥ युगप्रमाण चाललें ।।
हस्तनापुरि वर्तलें ।। अपुर्व येक ॥ ९९ ॥
हस्तनापुरि राजा शामकर्ण ।। शोमवंशि क्षेत्रि दारुण ।।
वह्याळि खेळतसे आपण ।। कोटिपर्वति तोगेला ॥ १०० ॥
तों ते पर्वति महास्थान ।। लिंगाकृति आहे जाण ।।
कोटि तिर्थाचे महिमान ।। शोभा दारुण शोभते ।। १०१ ।।
नाना वृक्ष मंडित ।। पुष्पें सर्वदा घवघवित ।।
तेथें गुंफा शोभांकित ।। देखिलां रायें ।। १ ०२ ।।
ते गुंफेमाझारी ।। आसनि बैसलीसे सुंदरी ।।
लावण्यरुप चराचरी ॥ जे अनुपम्य ।। १०३ ।।
ते रायें दृष्टि देखिली ।। जैसि विद्युल्लता भासली ॥
रांया मुर्छना आली ।। विरहता बाणलि आंगी ।।१०४ ।।

आधव्याचा [ आदिद्यवीयः = आधव्याचा ] आधव्याचा माणूस म्ह० कालचा माणूस, आदल्या दिवसाचा माणूस.

आंधळी कोशिंबीर - ” अंधा कौशांबी ” नांवाचा खेळ कौशांबी नामक शहरांत खेळत. कौशांबी शब्दाला र जोडला आहे. असा र लंडनांतील कनिष्ट लोक शब्दाच्या शेवटीं जोडतात. कोशिंबीर हा वनस्पतीचा वाचक शब्द हि सुचला.
१ इटीदांडू, २ लगोर्‍या, ३ मलखांब, ४ जोडी, ५ चाक, ६ गदगाफरी, ७ दंड, ८ नमस्कार, ९ उठाबशा, १० घोडी, ११ पाळणा, १२ झोंबी, १३ जेठी, १४ कुरघोडी, १५ आट्यापाट्या, १६ आंधळी कोशिंबीर, १७ हुतूतू, १८ हमामा, १९ झिम्मा, २० फुगडी, २१ कोंबडा, २२ गोट्या, २३ गल, २४ सागरगोटे, २५ टिपरी, २६ फांसा, २७ सोकटी किंवा सोंगटी, २८ चिंचोके, २९ खडे, ३० कानीं खडा, ३१ वाघमेंढ्या, ३२ टाळी, ३३ लोण वगैरे शेंकडों शब्द प्राकृतांतून मराठींत आले आहेत. (भा. इ. १८३२)

आंधळी कोशिंबीर (खेळ) [ आंधिका (खेळ) + (स्वार्थे ल) = आंधळी कोशिंबीर] (भा. इ. १८३६)

आधीं [ आदिची सप्तमी आदिँ, आदीँ; (याचा कठोर उच्चार आधीं. आदीँ शब्द ज्ञानेश्वरींत येती. ] (स. मं.)

आनाठाईं [ अन्यस्मिन् स्थास्नि = आना (सप्तमी ) ठाई ( सप्तमी ) (भा. इ. १८३६)

आपटणें [ आपट् - फोडणें (चुरादि) आपटनं = आपटणें, हापटणें. ] (भा. इ. १८३३) आपटशील - बिपटशील [ आपतविपत् = आपटबिपट] (भा. इ. १८३४)

आपरूप [ आपर्तुक (अप + ऋतु = अपर्तु) = आपरुक = आपरूप. क-स्थाने अज्ञानेन प: ] आपरूप म्हणजे विलक्षण. हें फळ या दिवसांत आपरूप आहे म्ह० आपर्तुक आहे. (भा. इ. १८३४)

आपलपोट्या [पुप् ४ पुष्टौ. आत्मपुष्ट = आपलपोट्या ] ( धा. सा. श. )

आपसुक-का [ अम् शुकं (अम् शैघर्‍ये , शुकं शैघर्‍ये)= आमसुक = आपसुक ( शीघ्र निपात ) ] आपसुक म्हणजे अति शीघ्र. आपसुक या सर्वनामाहून निराळा. (भा. इ. १८३४)

आपसुक, आपसुका [ आत्मसुखेन = आपसुक. आत्मसुखात् = आपसुका ]

आपा [ आत्मा = अप्पा = आपा (मुख्य जीव ) ] ( स. मं.)

-२ [अद्धा evidently = आता ]

आतां [ आतः इतोपीत्यर्थे ( तत्त्वबोधिनी ) ] आतां काय म्हणतोस = इतोपि किं भणसि, आतः किं भणसि. आतः=आता, आतां. अनुनासिक वैकल्पिक. (भा.इ. १८३४)

आताँ - धर्मपालकृत पाइअलच्छी नांवाच्या प्राकृत कोशांत खालील शब्द आतां ह्या अर्थी आहेत:-
इहइँ संपइ इण्हिं इत्ताहे संपयं दाणिं ॥ ६७ ॥ पैकीं इत्ताहे हें आतां ह्या अर्वाचीन शब्दाचें प्राकृत रूप होय. इत्ताहे = इत्ता = आत्ता = आतां. रोजच्या बोलण्यांत लोक आत्ता असा उच्चार करतात. आतां ह्या अर्थी दाणिँ शब्द ज्ञानेश्वरकालीन मराठींत येतो, त्याचें मूळ इदानीम्. (स. मं.)

आंता ! [हन्त (come ! ) = आंता ! ] आंता कसें करूं = हन्त किं करवाणि.

आतां काँ [ अथ कीं = आतां काँ ( How else ? ) ] (भा. इ. १८३३)

आते [ आप्तका ] ( आत्या पहा)

आतें [ असत् = आत (ता-ती-तें) असणारें. असचें वर्तमान धातुसाधित असत् = (अलोप) सत्. मराठींत अ राहिला आहे.]

आंतौरिया [ अंत:पुरिका ] अंत:पुरांतील स्त्री. (ज्ञा. अ. ९ पृ. १२८ )

आत्या १ [आप्तका = अत्तिका = अत्तिआ = अत्या = आत्या, आत, आते ] बापाची वडील किंवा धाकटी बहीण. ( स. मं.)

-२ [ आप् व्याप्तौ. आप्तिका ( आप्तचें स्त्रीलिंग) = आत्तिका = आत्या ] आत्या म्ह० आप्त स्त्री, बापाची बहीण, वडील बहीण इ. इ. ( धा. सा. श. )

आथिला [ आप्रथित + ल ] ( धातुकोश-आथ १ पहा)

आदळणें [ आ + दल् (हापटणें) = आदळ ] (भा. इ. १८३४)

आदा [ आदा ( स्री ) = आदा (घेणें ) ]
आंदू-हात्तीच्या पायांत तो स्थिर उभा राहावा म्हणून आंदू घालतात-अदि बंधने । अदित आंद: बंधनकर्ता. तीर्थेभ्य अन्दं. ( मां. वा. सं. ३०-१६ ) ( भा. इ. १८३३)

आदोगर [ आदावग्रे = आदोगर ] आदौ म्ह० अग्रे, पहिल्याप्रथम. आदावग्रे हे शब्द संस्कृतांत जोड योजतात. ( भा. इ. १८३६)

आधमणी [ अर्धमानिका = आधमणी ( स्त्री ) ] माप, वजन. ( भा. इ. १८३४)

वेंकट ५ त्रीप्रवर ३ दुर्गा  भद्राक्ष ५ त्रीप्रवर ३ वज्राये
शुक ६ त्रीप्रवर ३ चंडिका  क्षवण ६ पंचप्रवर ५ पद्मावती
कण्व ७ श्रीप्रवर ३ काळिका  पारस्वत ७ त्रीप्रवर ३ हरबाये 
कपिल ८ त्रीप्रवर ३ रेणुका वैरक्ष ८ पंचप्रवर ५ चांपादेव  
शौनक ९ त्रीप्रवर ३ वज्राय  गौतम ९ पंचप्रवर ५ येकवीरा 
वल्क्य १० पंचप्रवर ५ माहालाये   श्रीपत १० त्रिप्रवर ३ चंडिका 
मुद्गल ११ पंचप्रवर ५ माहालाये   वशिष्ट ११ त्रिप्रवर ३ हरडाये 
लोमस १२ पंचप्रवर ५ कुमारी   नागेश्वर १२ प्रंवर त्रि ९ महाबाये 
देवदत्त १३ त्रीप्रवर ३ काळी  वछ १३ त्रीप्रवर ३ नारायणी 
शांतन १४ त्रीप्रबर ३ त्वरिता   हरिद्र १४ पंचप्रवर ५ महालाये 
विरुपाक्ष १५ त्रीप्रवर ३ बगला  त्रैंबक १५ पंचप्रवर ५ हरडाये  
त्रिपुर १६ पंचप्रवर ५ दीपिका   विश्वामित्र १६ प्रवर ७ ललिता 
येकश्रृंग १७ त्रीप्रवर ३ क्षेत्रि   अंगिरा १७ त्रिवर ३ माहेश्वरी 
तांतोऋषि १८ त्रीवर ३ लक्ष्मी   श्रीचंद्र १८ त्रिप्रवर ३ चंदनदेवी 
गंभिर १९ त्रीवर ३ पार्वती   जनार्दन १९ त्रिप्रवर ३ माहेश्वरी 
वसुदेव २० त्रीवर ३ दुर्गा   भारद्वाज २० त्रीवर ३ रक्तदंति 
कर्पुर २१ पंचप्रवर ५ वज्राय   भृगु २१ पंचप्रवर त्वरिता 
भृगु २२ त्रीप्रवर ३ वेणु  मित्राक्ष २२ प्रवर ५ चंद्रायणी  
द्रौपद २३ त्रीप्रवर ३ पार्वती   कश्यप २३ पंचप्रवर ५ रुद्रायेणी 
शुक्षमण २४ पंचप्रवर५ द्रोपदी ललिता   अंबऋषि २४ पंचप्रवर ५ सिंव्हाये

 

-२ [ अन्यत् ] ( न पहा )

-३ [अणि boundary, limit= आणि = (limit) लयनि resting place = लाणि = (resting place) ]

उ०- ह्मणोनि समर्थु जो एथें । आणि लाणि सर्वज्ञते । तेणें सविशेष कर्मातें । त्यजावें ना ॥ ज्ञा. ३-१६६.

-४ [ अन् ]

-५ [अन्या = आणिआ = आणि ] ( ज्ञा. अ. ९ )

आणिक [ अन्यकत्] ( ज्ञा. अ. ९ पृ. ३७)

आणीक १ सेतुबंध काव्याच्या नवव्या आश्वासकाच्या ८६ व्या पद्याच्या टिकेंत रामसेतुप्रदीपकार येणेंप्रमाणें लिहितो:-
” आणिक्क तिर्यगर्थे देशी ”

मराठींत हि आणीक ह्या शब्दाचा प्रयोग तिरकें, वाकडें, कांहींच्या बाहीं, ह्या अर्थी करतात; उदाहरणार्थ,
त्याचें तर पहाणें आणिकच आह.

[ आणिक्क = आणीक, आणिक ] (भा. इ. १८३२)

-२ [ अन्यत् + एक = आण+एक = आणेक= आणीक= आणिकु = आणीकु (ज्ञानेश्वरी) = आणखी ] (ग्रंथमाला)

आणीकु [ अन्यत् + एक ] (आणीक २ पहा)

आणीबाणी [ आ + अन् : नाम आनिः breathing in व्या + अन् = नाम वाणिः breathing out आणिबाणिः = आणीबाणी in - breath and out-breath ] सर्वव्यापी प्रसंग.

आण्णाव [अंतर्नाम ] (आडनांव पहा)

आत [ आप्तका ] (आत्या पहा)

आंतकुडा [अंत:कुटिल = आंतकुडा] (भा. इ. १८३६)

आंतडे [अंत्र (सं.) = आंतडें ] (स. मं.)

आतबट्टा [ आत्तवट: = आतबट्टा stripped of, destitute of बट्टा the price of exchange. आत्त stripped off, destitute. आत्तलक्ष्मीः stripped of wealth. आंत in ह्या क्रियाविशेषणाशीं संबंध नाहीं. ]

आंतबट्टा [ भ्रश् ४ अधःपतने. अंतर्भ्रंशः ( अंतर्भ्रष्टः ) = आंतबट्टा ] आंतून नाश. ( धा. सा. श. )

आता ? १. [ तो आला नाहीं, आता ? आदह (अव्यय-प्रकरणम्, कुत्सने ) ] (भा. इ. १८३४)

आडमार्ग १ [मृग् १० अन्वेषणे. अर्धमार्गः= आडमार्ग ] ( धा. सा. श. )

-२ [अंतर्मार्ग = आडमार्ग ] (भा. इ. १८३३)

आडमुठ [ अर्धमुष्टि = आडमुठ, आडमुठ्या (मुष्टिक) ] (भा. इ. १८३३)

आडमूठ १ [ मुह् ४ वैचित्ये. अर्धमूढः = अडमूढ = आडमूठ ] ( धा. सा. श.)

-२ [अनेडमूक = अडमूठ (क स्थाने ड) ] मूळ अनेडमूक म्ह० बहिरा असून मुका तो. नंतर अडाणी असा अर्थ पडला. (भा. इ. १८३६)

आडरात [ अर्धरात्र = आडरात ] (भा. इ. १८३३)

आडवंगी [अन्तरंगता interiorness, private intertainment = आडवंगी] गुप्त स्वीकार.
उ० वांचौनि आपुलेया काजा लागि । प्राणिजाताचां हित भागीं । संकल्पाची ही आडवंगी । न करणें जें । ज्ञा. १६-२०१

आडवस्त्र [ अर्धवस्त्र किंवा अंतर्वत्र = आडवस्त्र ] (भा. इ. १८३३)

आडवा [ अर्वांच्= आडवा-वी-वें ] hitherwards.

आडवाट [अंतर्वांट: = आँडवाट = आडवाट] (भा. इ. १८३३)

आंडिल ( बैल ) [ अंडीर = आंडील, आंडिल ] (भा. इ. १८३६)

आंडील (बैल) [आंडीर = आंडील ]

आडुळसा ( वनस्पति) [आटरूषक = आडळूसअ = अडुळसा ] ( भा. इ. १८३४)

आढी [ धि ६ धारणे. आधि ( ठेव ) = आढी (आंब्याची ) ] ( धा. सा. श. )

आणखी [ अन्यत् + एक ] (आणीक २ पहा)

आण ने [ आनयनं नयनं = आणने ]

आणा १ [ (कार्ष ) आपणक = आअणअ = आणा ] (भा. इ. १८३२ )

-२ [ अंकनक = अँअणअ = आणा ] (भा. इ. १८३२)

आणि - आणू - आन् - न - नि १
मराठींत कित्येक वक्ते असे प्रयोग करितात:-
(१) अश्या प्रकारची व्यवस्था आणि सरकारनें केली.
(२) तो आणि तसा वागेल, हें संभवत नाहीं.
(३) ब्राह्मण नि दारू पिईल, हें होणार नाहीं.

ह्या स्थलीं आणि, नि हे शब्द हन्त, हान या शब्दांचे अपभ्रंश आहेत.

(सं.) हन्त = (ज्ञानेश्वर) हान = हानि = आणि = णि = आन् = न = नि. हान शब्द ज्ञानेश्वर असाच येोजतोः-
उ०- म्हणौनि उदकीं हान रसु । कां पवनीं जो स्पर्श ॥

शशिसूर्यां जो प्रकाशु । तो मी चि जाण ॥ ज्ञा. अ. ७-३२ (भा. इ. १८३२)

क्षेत्रिपंचानन ॥ जे ना गवसति कवणा लागुन ।।
ज्यांची कीर्ति त्रिभुवन ।। फाकलि असे ।। ८४ ।।
ज्यांहि सोमयाग केला ।। जिहि अश्वयाग संपादिला ।।
ज्याहि नरयाग सांगितला ॥ शास्त्रयुक्त ॥ ८५ ॥
ज्याहिं पृथ्वि जिंकिली ।। दैत्यकुळें निर्दाळिलीं ।।
जयजयकारें गर्जली ।। मही जयांसी ॥ ८६ ।।
ज्याहि धर्म रक्षिला ।। देवांचा बंद सोडिला ।।
आपला धर्म चालता केला ।। गौब्राह्मण रक्षिलें ।। ८७ ॥
ज्या वंशि अवतार जाले ।। साक्षांत विष्णु अवतरले ।।
रामकृष्ण प्रवर्तले ।। जया वंशि ।। ८८ ॥
उत्तम क्षेत्रि दोनी वंश जाण ।। आणि तीसरा शेषवंश सुजाण ।।
शेष पाताळे नांदतो आपण ।। ज्याणे पृथ्वि धरियेली ॥८९॥
तो शेष सर्वा माजि उत्तम ।। जयाचा विलासि नारायण ।।
ब्रह्मक्षेत्रि महानिपुण ।। राजाधिराज ॥ ९० ।।
ज्याणे अवतार धरिले ।। विष्णुसवें बिजें केलें ।।
महिमंडळि राज्य भोगिलें ॥ ते कथा पुढें सांगेन ।। ९१ ।।
आतां शोमवंशिचे नृपवर ॥ जे दक्षणे आले धनुर्धर ।।
त्याचि गोत्रें प्रवर ।। सांगेन ति आइका आता ।। ९२ ।।

प्रहृद १  त्रीप्रवर ३  योगेश्वरी बकदालभ्य १  पंचप्रवर ५  प्रभावती
जमदाग्नि २  पंचप्रवर ५  येकविरा कौंडण्य २  त्रीप्रवर ३  कुमारिका
अत्रि ३ त्रीप्रवर ३ माहेश्वरी पद्माक्ष ३ प्रवरसप्त ७ जोगेश्वरी
नारद ४  पंचप्रवर ५  त्वरिता सास्वन ४ त्रिप्रवर ३ महालक्ष्मी