Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
महिकावती (माहीम)ची बखर
कां जे समई शंकराचार्य उत्पन्न जाले श्रीजगद्गुरु धर्म माराष्ट्राचे षोडशकर्माधिकारी ।। महादेवाचा अवतार ॥ कलयुगांत प्रगटला ।। कारण जन्मेजय-राज्य प्रमादलें ।। विक्रमशकाधिकारि-समयिं यवनिधर्म मुळ पश्चमि रमिदेशि उत्पन्न जाला नुतन ।। अक्षरें भाषा पैराब सर्वभक्षक हा शोध राज्या विक्रमास वेताळें सांगितला ॥ हें आईकोन सभा–मजकुर येक दृढाव केला ।। जर यां वर चाल करुन नी:पा- तावें ॥ हा निश्चये संपुर्ण करुन सैनिक नायक यांस राजआज्ञेन सैन्य मुस्तेद करउन मुहुर्त उत्तम जोतिषी गुरुदिनि चाल करावी हा निश्चये केला ।। यैसें असतां राजा निजधामी सुखशयनि नीद्रिस्त असतां स्वप्न जालें ।। जर तुज तया म्लेंछासि जैत नाहिं ।। व तुह्मी ईछा धरिलि असे तर आक्तं शकाधिकारि याचा येईल तो तुज जिंतिल ॥ हें स्वप्न होतां राजा जागृत जाल्या वर चिंतातुर फार जाला ।। जर हें स्वप्न काये विपरित ।। शीव शीव नामस्मरणि जागृत राहिला ।। पुरोहितास बोलाउं पाठविलें ।। सेवकिं पुरोहितास निरोप दिधला ।। जर राजाज्ञा तुह्मास बोलाविलें असे ।। हें श्रुत होतां स्नान देवपूजा संपादुन नित्यकर्महि सत्वर पुरोहित राजालयिं आला ॥ राजयानं देखतां साष्टांग प्रणिपात करोन आसनि बैसविला ॥ अर्घ्य पाद्यपूजा संपादुन संनिध जाला ।। ते समइं प्रोहितें आसनि राजयास बैस म्हणितलें ।। आशिर्वचन सुक्त उच्चारोन आशिर्वाद दिधला ।। पानपट्या विडे पुरोहितास दिधले ॥ ते समईं पुरोहितें पुसिलें जर किंनीमित्य राउळिं सत्वर बोलाविलें ॥ हें वचनि राजयान पूर्ववर्तमानकथा व रात्रिस्वप्न तें मुखवचनि साकल्य पुरोहिता प्रति सांगितलें ।। हें पुरोहित आईकोन मनी आणोन ज्ञानि पाहोन भविष्य बोळखोन राजेंद्रा प्रति म्हणितलें ।। जर शास्त्रसंमति कलयुगिं सा शकाधिकारि भविष्योतरपुराणिचें ऋषिवाक्य आहे ॥ यास अन्यथा कोण करिल ॥ तर तुह्मा मागें शकाधिकारि शाळिवाहन जाणुन मज दिसोन येतें।। जर निर्माण जाला तर शोधिस वेताळास आज्ञा दिजे ॥ हा शब्द आईकतां च चित्ती राजयान वेताळ स्मरतां च वेताळ प्रगट जाला ॥ राउळिं प्रणिपत्य करोन बध्वांजुळि काये आज्ञा ।। हे विनंति राये आईकोन वेताळास आज्ञा दीधलि कीं ॥ पृथ्वी शोध करावा ।। कोठे शाळिवाहन उत्पन ॥ हेर घेऊन येणे ॥ आज्ञेप्रमाणे तो हेरिस गेला । मागे म्लेंछा वर स्वारिचें पुरोहितें सांगितलें ॥ जर ते पश्चमादसे बहुत राजे आहेत ॥ तेथे फार तयांचि युद्धे परस्परि होतिल ॥ सांप्रत या देशिं न येतिल ॥ सर्वास निर्वाह इश्वरि इछा ॥ ऐसें ह्मणत आहेत तवं वेताळ हेर पैठणा होउन आणिली ॥ शाळिवाहन सेने सहित मुस्तेद तुह्मा वर चाल केलि ।। हें आईकोन दळ मुस्तेद केलें होतें तें ॥ स्वारि ईकडे जाली ।। दोघांचा आदळ जाला ।। श्रीविक्रमादित्य शाळिवाहन हस्तें मृत्य पावला ।। कांहि मध्यें काळ क्रमल्या उपर देविशापें शाळिवाहन अश्वारुढ समुद्रि प्रवेशले ॥ छत्रपतिपद वरुणावति राज्याधिकारि जैदेवराणा यास पद असे ॥ देशोदेशिं राजे आपले राज्य धरोन आहेत ।। यैसें असतां मध्यें लोहोळें श्रावक जती नानकपंथ साबरिपंथ रुमिपंथ तुरकी महमदी ईभ्रमी ईसाइ सिस्त्रछेदक केशछेदक सर्वभक्ष तांत्रिक पध्यत ऐसि मेदिनि याहि वरुषेंशता १२ मध्यें व्याप केला ।। फार अनाचार प्रवर्तला ॥ विप्रांस देवांस विरोधी ।। बहुत जन भ्रष्टविले ॥ ऐसें असतां श्रीमहादेव धर्मरक्षणिक रंडाकोल्हापुरी अवतार घेतला ।। वादि लोहोके श्रावके जती जिंतिले ।। अकर्मि त्यास जिंतिलें ॥ पण केला होता जर जो हारेल तयास तैलाचे कढयेत टाकावें ॥ सोम आपा राजयाचे मदसित घटांत सर्प कोण्हा न कळतां घालुन आछादिला होता ।। राजा लोहोक्या याहि वस्य केला होता ॥ येक राणि द्वीजा कडे व काहि प्रजा ।। सेवट वृति द्विजांचि बुडावी ॥ ऐसा पण जाला ।। राज्यान ह्मणितलें जर जो तुह्मा उभयां मधुन या घटा मध्ये जे वस्तु आहे ते प्रसिद्ध नावं सांगेल व काढुन या प्रजेस दाखविल तो वृतिचा अधिकारी ॥ व त्याचें रुप ईश्वरि ।। तो आम्हास मान्य ।। हें राजवचन सर्वांस मानलें ॥ वेत्रकरिं विप्रांसिं व लोहिकी यांसि सांगितले।। तर लोहिकीं विप्रांस ह्मणितलें जर तुह्मी भूदेव व वृतिवंत पुरातन विद्येची सत्ता अभिमान वेदशास्त्रपरायण तर हें वृंद आज पावे तवं सांगता त्याचि प्रचित आज खरि करा ॥ हें वचन आईकोन जोतिषी विध लग्न पाहातां अंधयोग जाणुन फार चिंता वर्तलि ॥ आपले मंडळिकी विचार करुन दाहा दिवसाचे अवधिन सांगु हा जाब दिधला ।। तो रायास व सर्वांस मानला ।। विप्रास आज्ञा केली ।। येर समस्त येक नेमे देविद्वारि येउन उपोषणि बैसले ॥ तेथे सदा उपोषणे होतां शंकराचार्य अवतार उत्पन जाला ।। त्याणे सर्व विप्रवर्गास अस्वासन दिधलें ।। दाहावे दिवसी आपण समागमे सर्व ब्राह्मणसमुदायिं वेदध्वनि करित राजसभा प्रवेशले ।। राजे आद्येकरुन समस्ती प्रणाम्य करोन बैसकार विप्रास दीधला।।विप्रि वेदघाष सूक्त आशिर्वचनि संपादिला ।। घट शंकराचार्य नेत्रि अवलोकिला।। वेस्त्रधारिं पुन्हा मजकुर केला ॥ ते समइं शंकराचार्य ह्मणितलें जर लोकि प्रथम या सभेंत जे घटात आहे त्याचें प्रगट उच्चार करावा ।। जर तयाचें वचन प्रचित येईल तर आज पासुन वृति तयांस व आह्मास तैलकढय अवलोकणे ।। जर त्याचे शब्दा मागें आह्मि मुखीं म्हणु तें च घटांतुन दाखउं तर सत्य भूदेव स्थाईत अना दिसीद्ध ब्राह्मणवृतिचे स्वामी राजयाचे व प्रजेच श्रीगुरु ।।
महिकावती (माहीम)ची बखर
माहाजना लागि ।। राउति पुर्वपक्ष केला ।। टिळा साक्षेसिं घेतला ॥ उपर सव्यासिं दीघला ।। साक्षयुक्त ।। या नंतरें घरथ ।। जे टिळयाचे विभागिक ।। उपर कवळि माळि जात ।। आणि पठ्यार भोईर विर रक्ती भठारी महंत जात ।। समुदाय पावति ॥ ऐसा निवाडा जाला ।। सोमवंशि टिळा संपादिला ।। मग शेषवंशि आदरिला ॥ टिळा द्यावया ।। तेधवां सांवखेडकर कुळगुरु तयाचा ।। जे वंशि अधिकारी त्याहिं आपला गुमस्ता पाचारुन टिळा द्यावा ह्मणितलें ।। तेधवां गुमस्ता देव उपाध्या कंचोळे घेवोन संनिध जाला ।। शब्द सिंधे समुदायांस केला ।। टिळा घ्यावा ह्मणितलें ।। प्रथम चोधरि घारोडकरि ।। जे टिळयाचे अधिकारि ।। त्याहि आपले वर्गि ।। टिळा घेतला ।। या नंतर गोपाळराव ।। तयासि केला गौरव ॥ गव्हाणकर दुसरा आपला संप्रदाय ।। टिळा तयासी दिधला ॥ राउतराव पद पाटेल ।। उपनावं थेवखंडकर ।। हे आधिकारि तृतिय मान्य सत्वर ।। आपले समुदायें घेतला ।। या नंतर पांचघरे यांसि ।। चतुर्थ मान्य परियेसि ।। पांचवा मांडवगडकरांसीं ।। ते राउत ।। सावा मान्य वरातदारि ।। घेति साक्षसी झडकरी ।। कडु त्या खालते सातव्या मान्याचे अधिकारी ॥ पद पालवण त्यांचें।। आठव मान्य ठाकुरांसि ।। उपनावं नारतळें यांसि ॥ ते घेति साक्षेसि ।। सभेमाजी ।। त्या नंतर तारे पुरो राणे ।। हे मुख्य अधिकारि त्याचा मान्ये ।। ऐसि शेषवंशि खुमे संपादणि जाली ।। या नंतरे ईतरे जे काहि होते त्यास हि मान्य दिधला ।। समस्तें विनंति करोनी आपलें स्थळातें हंकारिले ।। तेथें खतें मझर लिहिले ।। देशोदेशि दीधले ।। जातिसमुदायें आपुलाले वर्गि घेतले ॥ हा निवाडा माहाळजापुरि जाला ।। तो सर्वांसी मानला । नाईकोरावे आपले मझरी लीहिला ।। हे सहि ॥ छ ।। मझर लेख हस्ताक्षर ॥ केशवाचार्य दप्तरकलमि चतुर ।। या हस्तीचे पट लेहविले ।। यक बाबत श्रीमहिबिंबसूत प्रतिबिंबसंमत्तें पूर्विचि राजसिकेचिं अष्टप्रधानसंमतें श्रीकुळगुरुचें हस्तलेख त्या तालुका प्रमाणे राजपूर्वि वर्णण तैसे च रिती व नुतन अनुसंधान सर्व वरिष्ट वर्गिक अनुमत्त प्रेाहिताचें संमत ।। या प्रमाणें खते मझर नावं प्रसिद्ध हेमांडपतिलिपिचे लेख स्वामि मुलकाधिकारि यांचे आज्ञेन पंडित समुदायि संमत्तें करुन जे जे जयांचे आद्यपुरुष आले तयाचें नामा पासुन ज्या पेढ्या भरल्या या देशिं व जीं घरें जालीं यका पासून येकेक तयांचि नावें आद्य करुन व किति घरें वंशिक कोठे कोठे तयांस ठीकाण वास काय उद्यम पोटभरि करितां घेतला तो ।। कैसा आचार करावा ।। काये व्रत आचरावें ।। कोण वृति वर्तावें ॥ उदरपूर्तिस कोण वेव्हार करावा ।। लग्न विवाह सोहिरिका कोण कोण गोतिं संपादाव्या ।। कोणाचि कोण्हि आणावी ।। कोणास कोण्हि द्यावी ।। जैसे हें देसा मध्यें संपादतें तैसें येथे यथानितिन संपादावें ॥ अपेश उणे वंशास येउं न द्यावें ॥ अकर्म जालें ह्मणजे सत्वर कुळगुरुस सांगावें ॥ तो सर्वां स्वकुळमंडळिक त्यांस श्रृत करिल ।। जर हें यैसे अनृत्य यका पासुन घडलें तर यथाशास्त्र धर्ममार्ग कर्मकांड जो ज्या दुष्कर्मास प्रायेश्चित घटे तें तीर्थविध साधावी ।। प्रायेश्र्चित या रीतिनें द्यावें ॥ येवढा देवदंड ।। येवढा राज्यदंड ॥ येवढा जातिदंड ।। देवदंड किदृष तीर्थविधकर्मयुक्त ब्रह्मभोज्य गोदान गुरुपूजा अळंकार भूषण ।। राज्य दंड कीदबा ॥ जे ग्रामि कर्म वर्तलें तेथे जे ब्राह्मण अतित आभ्यागत आगांतुक त्यांस राजा आपले सत्तेकरून त्याचा विभाग शास्त्रसंमतप्रमाणे तो यांप्रति धर्म करववितो ।। जातिदंड किदबा ।। जातिस विभाग द्रव्य येईल त्या प्रमाणे कोण्हि भुभुक्षित वृद्ध ॥ किंवा मृत्युसुतक ।। विध्वा ।। अबळा अनाश्रय तयेस ।। कीं उपवरि तयेस ।। की ग्रहतटाक ।। कुप व पंचब्राह्मणभोजन ।। या रिति जें द्रव्य येईल त्याचा व्यय अध्यान संपादावा ।। व आध्यानजातिवर्गींचे तयांहि त्या समागमि भोजन संपादावें ॥ यास पांच-ब्राह्मण-भाजन वैश्वदेव साक्षेसि ॥ हा अनुक्रम पुरुष वृद्ध ॥ त्यां पासुन ज्या पेढ्या भरल्या त्या व तयाचें गोत्र ठीकाण वतन येथिचे राजदत्त प्रवर कुळस्वामिण कुळधर्म कुळगुरु यैसि खतें वर्णवर्णि गोत्रगोतिं मझर लेहोन सर्व अनुक्रमे संपुर्ण पंडिती वाचुन सर्वास आयेकउन अधिकनुतन काहि नाहीं पुरातन सत्य प्रामाणिक लेहोन सर्व साशष्ट मझर येकेक कुळाचें करुन अवध्या ही रुजु साक्षे सीके प्रमाणक वाचोन, समस्तां मान्याधिकारि जे ज्या ज्या कुळाचे तयांस दिधलें ।। त्याहि शिरी वंदुन गणपतिपुजन करोन आपलेपासि ठेविलें ।। यैसिं खतें महजर नायकोरायाचे प्रसादें सर्वांस जालीं ।। ते समईं हे वंशपद्वतिलेखा संमत देउन वेदमूर्ति विप्रकुळिं ब्राह्मणसंख्या पांचसें येकवींस मुख्य मुख्य धौंडि नायक व तथा आंब नायेक याहि समस्त विप्रमेळा यांसि स्वमुखें म्हणितलें ॥ जे तुह्मी सर्व वृतिवंत वृति चालविता अष्टाधिकार तुह्मास आहेत ॥ तर नुतन-राज्ये-समागमिचे विप्र ॥ व पुरातन यादेशिचे स्थळ-गुरु यजुर्वेदि गोवर्धन व गंधर्विक ।। तर यांस सत्ता ।। स्थळीं घटिका पाटा अंत्रपट गौदानमोक्ष पुजनमात्र कर्मकर्मादिक याहि संपादाविं ॥ यांस हे सत्ता स्थळगुरुत्वाचि ॥ हे कोणाच्यान अमान्य करवत नाहिं ॥ व जे अमान्य करितील व वृतिलोप करितील तरी कर्ता व करविता उभये येमपुरिस जातिल ॥ जे ज्या स्थळिचे स्थळगुरु त्यांस त्यां स्थळि लोक वसति त्यांहि त्याचे हस्तिं कर्मे संपादावीं ।। निर्विकल्प तर तीं कर्मे उत्तम सांग होति ।। नाही तर अकर्मदोष पदरिं पडे ।।
महिकावती (माहीम)ची बखर
तें प्रगट असे।। ब्रह्ममुखिं वसे ।। राजकुळांस शस्त्रस्वरूपि रक्षित असे ।। जे येकभावे आईकति त्यांचि पापें विलया जाति ।। वंशउत्पति आईकतां पुण्यपावन होति ।। निपुत्रिका संतति ।। नेत्र अंधास येती ।। अज्ञान भ्रांति फिटे ॥ मज अभिमान कुळाचा ।। धर्म रक्षावा साचा ॥ नायकोराव देसला मालाडचा ।। त्याणे मज केशवाचार्यास नेऊन सर्व आसवर्गिक व देसक व मांडळिक यावत् केळवें पासुन मुंबैई परियंत मुख्यमुख्य गावोंगाविचे जातिजातिचे गोत्रिगोत्राचे खलक जमा तीन हजार सासें पंचावन्न गणति येकवीस दिवस परियंत माल्हजापुरि योगेश्वरि स्थानकि मंडप रचोन जमाईत तेथे महाप्रेत्न मनुष्य पाठवोन बोलावणि करोन समुदाये ब्राह्मण खलक संख्या पांचसें येकवीस नायक देसाये प्रोहित कुळगुरु आचारे उपाध्ये जोशि वृतिवंत देशस्त या उपर गोवर्धन गंधर्विक ते हि सर्व मेळविले ॥ नायको-रावें फार सन्मान करुन सर्वांस यथामहत्वें फार, आतिथ्य करोन सर्वांस सुखि केलें ॥ समुहुर्ति दीवस ठराव केला होता त्या दिवसि हा प्रयोग वंशावळिचा केला ॥ जर मुख्य वडिलांच्या किर्ती ।। हा देश यावत् दवण पासोन श्रीमुंबै परियंत काबिज करायास राजा प्रतापबिंब दाहा सहश्र घोड्याचि फौज घेवोन अहिनळवाड्या होउन येउन हा देश काबिज करून राज्यधाम श्रेष्ट माहिम देश घेतल्या वर जागोजागी आपले स्वसमागमिक सेनायिक बैसविले ।। जाहागिरा वतने वृती ईनाम सर्वांस यथामहत्वें दिधल्या ॥ त्या आज पावे तों चालतात व पुढें ईश्वर आपलें वंशिकासिं चालविला।। परंतु येक मनि भाव जाला ।। जर येक दिवस अवघ्यां देशाईक या देशि समुदाई मिळवोन नवसभोजन देईन ।। हे ईच्छा मनी उत्पन्न होतां श्रीकुळस्वामिणीन स्वप्न दिधलें जर मनिचा हेत मी पुरवितों ।। तुं सर्व जे पुर्वि आले व या साशष्टि पासोन दुसरे केळवे परियंत फांकले आहेत त्यांचा समुदाये करुन येक वंशपत्र करणे ॥ हें स्वप्न मज केशवाचार्या मुखि आपण नायकोरावें साष्टांग सभेस घालोन सांगविला।। हे सर्व विप्र व देशिक देखोन व आईकोन जयजयकार उदो बोलिले ॥ समस्त उभे राहिले ।। विप्रवर्गि लक्ष्मीसुक्तीं दुर्गा योगेश्वरि भगवति स्तउन नायकोराव देसला देशकि आळंगुन विप्रि आशिर्वाद दिधला ।। जर तुं मला सोमवंशि धर्मवंत उदार प्रौढिप्रतापसागर, जर तुज देवि प्रसन्न जालि, हें कर्म वंशिक पध्यतिचे, तु जवळ होउन सर्व समुदाय मेळउन, जुने खते आज पावे तवं हिसाब पाहातां बिंब प्रारंभा पासुन वरुषें तीनसे जालिं ।। या मध्यें हे राज्यकुळ खल्लक सैनिक ईनामक सर्व रईत अजम सेक आलावदिनाचि जालि ।। या उपर देसा मध्यें ते हि बहुत यवन जाले ।। राज्य अभिमान सांडला ॥ शस्त्रें सोडली ।। कृषि धरिली ॥ सोमवंशिं कारकोणि गांवखोति ताडमदिरेस उदिम धरिला ।। सिंधि काहिक असति धरोन आपलि वतने ।। काहिक सेवा करुं लागले ।। काहिक नष्टले ॥ बहुत आचारहिन जाले ।। बहुत गोत्र प्रवर कुळस्वामिण कुळगुरु ठिकाणे सांगतां विसरु लागले ॥ जाणोन देविने धर्म माहाराष्ट्र रक्षाया कारणे राजश्री नायकोरायास स्वप्न दिल्हें।। जर हा जाति मेळवा करावा । आम्हास ब्राह्मणास भूदेव प्रसिद्ध जाणोन हीं मेळवावें ।। तर हा आशिर्वाद आमचा ।। श्रीदेवि आद्यशक्ति जगदंबिका ।। माहाराष्ट्रधर्मरक्षिका ॥ तुम्हां सुप्रसंन्न असो ।। श्रीरस्तु ॥ हा आशिर्वाद आयिकोन व केशवचार्याचें वचन ।। स्वधर्म रक्षणार्थ श्रीदेविचें स्वप्न ।। तीन हजार मासें छपन्न सर्व जे राजकुळि सैनिक मिळाले होते त्याहि फार ब्राह्मणासि पहिरावण्या दक्षणा दिधली ।। ते येकयकांचि नावें सांगता ग्रंथ वाढेल ।। परंतु अवघि द्रव्यसंख्या च्याळिस हजार दाहा बोळी धर्म जाला ।। शतचंडि नायकोरावें करायास संकल्प केला व प्रणाम्य करून सर्वांप्रति विनविलें जर कृपा करुन माझें मानसिक पुरें होये हें करा ।। ते समई सर्व देशक म्हणो लागले जर तुं धर्ममूर्ति तुझेनि योगें हें कार्ये पावेल सिद्धी ।। या प्रयोगास विनविजे प्रथम कुळगुरुतें ।। जे वेदमूर्ति ऋषिवर्य आंबनायक कावळे आचार्य जोशिक वृतिवंत तुमचे ।। हा मान्य देसला काननायकरावाचे गुरुस दिधला ।। त्याणे धौंडि नायक सांडोरे कुलगुरु शेषवंशिकाचे वतनदार पसपवलिचे तयां नमस्कारिलें ।। व हे श्रेष्ठ आम्ही विप्रांत म्हणितले ।। जर हे ज्या स्थळि असतिल त्या स्थळिं प्रथम मान्य टीळा सांवखेडकरांस ।। त्या खालते कावळे ।। उपर आचार्य मग ।। ईत्यादि संप्रदाये ।। ऐसा हा निवाडा सांगितला ॥ तो सर्वांसि मानला ।। साक्षेसिं प्रतिपदिला ।। समंतियुक्त ।। यो उपर नाईकोराव देसला ।। आपुल्या समुदायासिं बोलता जाला ।। जर प्रथम मान्य देसल्याचा ठाकुर-वर्गी ।। उपर रुत आधिकारि ।। ते हि तत्समान मान्य आधिकारि ।। टीळा घेतिल निर्धारी ॥ आदरें करोनी ।। या नंतर चोधरि चुरि ॥ ते हि टिळयासिं आधिकारि ।। भागडचु-याचे गोत्रि ।। म्हणोन आधिकारी ॥ मग म्हातारपक्षी टिळा ।। यासि मान्य दिधला ॥ राउत कुळिं लक्षिला द्यावया लागि ।। तेधवां सवे बोलते जाले ।। जर वर्तकिपद आह्मासिं चालोन आलें ।। टिळा आमचा म्हणितलें ।।
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
ए
ए [ आयि = अइ = ए (संभावनायां ) ] ए बाई ! (भा. इ. १८३२)
एः [एः = एः ( आमंत्रणे, गार्हायां इ. इ.) ]
एकक [ एककः = एकक; एकैक = एकेक. एकाकिन् = एकाकी ]
एकजम् [ऐकद्यं = एकजम्, एकदम. एकपदं = एकदम्]
एकजात [ एकजातीयः = एकजात. प्रकारवचने जातीयर् (५-३-६९ ) ] एकजात म्ह० एका च प्रकारचें.
एकजूट [ एकजुष्टं = एकजूट. जुष् ६ सेवने ]
एकटा [ एकस्थः = एकटा. द्विकस्थः = दुकटा ]
एकदम् १ [ एकपदम् = एकदम् ( अकस्मात् ) ( तत्त्वबोधिनी ) ] तो एकदम आला म्ह० अकस्मातू आला. (भा. इ. १८३४)
-२ [ऐकध्यम् (at once) = एकदम्]
-३ [ ऐकद्यं ] (एकजम् पहा )
एकदम [एकपदम् = एकअदम् = एकदम् (at once) (निपात) ] (भा. इ. १८३३)
एकमेक [ एक + म् + एक = एकमेक ] मू अक्षर प्राकृतांत येतें मध्येंच, तें मराठींत उतरलें आहे.
एकल [ एक + ल (स्वार्थक ) ( ला-ली-लें) ] (ज्ञा. अ. ९ पृ. १ )
एकवटूनि [ एकवतित्वा (एकवत् पासून नामधातु) ] ( ज्ञा. अ. ९ )
एकसरा [ एकस्वरा । ( ज्ञा. अ. ९ पृ. ६७ )
एकाकी [ एकाकिन् ] ( एकक पहा )
एकांगणें [ आगि गतौ-एकांगनं = एकांगणें ] एकीकडे गति होणें, कलांडणें. ( धा. सा. श. )
एकांडा [ एककांड: ] (धातुकोश-हेंगाड पहा )
एकी - एकी म्हणती काय जालें ? असा प्रयोग मराठी पद्यांतून येतो. तेथें एके या संस्कृत अनेकवचनाचें एकी, येकी, हें मराठी रूप आहे. (ग्रंथमाला)
एकेक [ एकैक ] (एकक पहा )
एकेरी (नाम) [ऐकागारिका = एकाआरिआ = एकेरी ] एकागारिक चोर - एकेरी म्ह० चोराप्रमाणें अंगवर प्रसंगीं तुटून पडण्याचा स्वभाव.
एकेरी ( विशेषण) [ एकप्रदर = एकेर ( रा-री-रें) ] एकेरी धोतर म्ह० एकपदरी धोतर.
एकोपा १ [ एकात्मता = एकाप्पआ = एकापा = एकोपा ] (भा. इ. १८३४)
-२ [ऐकात्म्य = एकोपा. त्म्य = प ]
एटालें [ इष्टकालयं a brick-house = एटालें ] abrick house (चिति चेत्य)
उ०-ऐसें अभिचारा वेगलें । विपायें जें अवगले ।
ते टाकीति एटालें । पैशून्याचिं ॥ ज्ञा. १६-३९९
एडका [ इडिक्क a wild goat = एडका ]
एणें [ एनेन ( एन ची तृतीया ) = एणें, येणें.
अनेन = आणें = याणें लक्ष्मी + एनया = लक्ष्मीएनें
त् + एनेन = तेणें सीता + एनया = सीतनें
त्य + अनेन = त्याणें, त्येणें सीता + अनया = सीतानें
राम + अनेन = रामानें लक्ष्मी + अनया = लक्ष्मीनें
य + एनेन = जेणें, य + अनेन = जाणें, ज्याणें
क अन्य + अनेन = कोणें. ]
एथ [ अत्र ] ( ज्ञा. अ. ९ पृ. ७ )
ए म्हणे १ [(एहि ) मन्] ए म्हणे.
-२ [ मन् ४ ज्ञाने. एहि मन्ये ( प्रहासे ) = ए म्हणे ] ए म्हणे ! टोणगा व्याला, अश्या हास्यकारक वाक्यांत ए म्हणे चा उपयोग करितात. ( धा. सा. श. ) ना. को. ४
एरणी [ अरणी = एरणी (वनस्पति) ] (भा. इ. १८३७)
एरें [ इतराणि ] (ज्ञा.अ.९ पृ. १०४)
एसण (णा-णी-णें) [ इदृङनिभ = एसणा suchlike ]
महिकावती (माहीम)ची बखर
तेधवां कडु उभे राहिले जर ह्मातारे वृत आह्मि असतां पावतिल कैसी ।। तेधवां ह्मातारे दिवानि मिळेल ।। तेण्हे करोन कडु वांद-यास आले ।। ते वांद-या राहिले ।। यांचे वडिल अधकारि वर्तोन गेले ॥ आणि ये हि अदकारि ।। वानठेकर ह्यात-यापैकिंचे ॥ कडु त्या खालचे ।। यैसा निवाडा पाहातां ।। वृति ह्माता-यास पावतां तया न्याये दोघांचा वेवाद खुंटला ॥ वृति ह्माता-यांस भोगल्या ।। कडुहि ह्माता-यांस वोळगें यावें ॥ आह्मि जेथें नसों तेथे मान्य अदकारांचा कडुवांस ।। या उपर साष्टि मालाड खापणे तेथे देसला सिव ठाकुर त्याचा पुत्र कान्ह ठाकुर ।। देसलिक कान्ह ठाकुरासि पित्यान स्वईछे दिधली ।। तो चालवों लागला ॥ तेधवां होळित सिंधे खेळों निघाले होते ।। छत्र कळसाचें लाविलें होतें ।। तेथे कळ कान्ह ठाकुर देसाय याण्हे पाडिली ॥ ह्मणोन येंरगळकर सिंध्याहि देसल मारिला । त्याचे शुद्धीस उधर राउत गेला होता ॥ तो हि तेथे मारिला ॥ तेधवां पोईसरकर आणि येकसारकर सुड घ्यावया धाविंले ॥ त्यांसि वोलणेकारी वारिलें ।। जर ते सिंधे खांड्याचे पाईक आपण येक विचार करों जर सर्व जमा आजि मेळवों ।। हातेरवट समागमि घेवोन येरगळास जावों ।। आणि कळ पाडों ।। तेथ सुड देसल्याचा घेवों ।। म्हणोन आपले खलकें मुस्तेद जाले ।। छत्रि निशाण सवें घेतलें ।। मालवणिसि गेले ।। तेथे निशाण उभारिलें ।। खबर येरगंळा पावली ।। तेधवां दादाजी राउत व पाटेल सर्व खुमाचा त्याणे आपला जमा सवे मेळवोन निस्याण लाविलें ।। छत्रि मुस्तेद केलि ।। काहाळा वाजविल्या ।। गावोंगाविचे सर्व मिळाले ।। मग मालवणिचे तळ्यावर जमा जाला ॥ तेथे पाईक पाईक जाली ॥ युद्ध तुंबळलें ।। पोईसरकर देसला मारिला ।। मालाडकर मरोळकर हारिस आणिले ।। निशाण आणि छत्रि सिंध्याहि नेलि ।। देसल्याचि मोड जालि ।। तेथोन येकमेकास हट वाढला ॥ त्या उपरांत सिंध्याचि वरात नोवरा नोवरि जुहांस जाता गोरगाविचे पाईकांहि लुट केली ॥ तें पाटलासि श्रृत जालें ।। त्याणे ठाण्यासि श्रृत केलें ॥ तर त्या ठाणकरांहि जाब केला ॥ जर देसलयासि कंबर बांधितात आपल्यासिं अपेश येईल ।। कां जर ते बहुत आपण जवळि असतां वाईट कां करावें ।। ऐसा जाब ठाणकरीं दिधला ॥ त्या जाबास येरगळकर मडकर उत्तनकर अकिसेकर मखेकर गो-हायेकर अणि जुकर हे अवघे येकत्र मिळोन विचार केला ॥ जर आह्मि शस्त्रधारि असतां अपेश शेशवंशास येईल ।। ह्मणोन जमा होवोन दिवानि पाणिसावंता जवंळ आले ॥ त्यासि वृतांत सांगितला ॥ जर आमचा अन्याय असेल तर आमचे पदरि घालणे ।। तेधवा दिवानि देसले अधिकारि नेले ।। त्यासिं दिवान विचारों लागला जर प्रथम कळ कोणि उभारिली ।। तें सत्यवचनि दिवानि सांगणे ।। तेधवां देसले बोलों लागले ॥ वृतांत सांगितला ।। तरि देसला कान्ह ठाकुर मारिला ॥ यांसि आंह्मासीं बिघडाव जाला ।। तो साहेबि निवडितां अनर्थ आहे ।। या बोलास दिवान उठिला ।। दोघांसि भेट केली ।। विडे दिधले ।। गांवोगावि पाठविले ॥ या परि सींधे आणि सोमवंशि यांसि वैर पडलें ॥ मग पाटेल दादराउत गोत्र हरिंद्र कुळस्वामिण हीरबा-देव उपनांव गव्हाणकर आपुले समुदायें वसईस आले ॥ विनायेक-तटाकि घरबंध केला ॥ त्याचे सवें खुमे आलि ।। ते कोण कोण ।। राउत गोत्र हरित कुळस्वामिण हीरबादेव उपनांव सावंखेडकर ।। पाटेल गोत्र रेणुक कुळदेवता योगेश्वरी उपनावं थेवखंडकर ॥ चौधरि गोत्र कपिलमुनि कुळस्वामिण वज्राये उपनावं घारवडिपुरा ॥ या उपरांत पांचघरकर राउत गोत्र आस्तिक कुळस्वामिण येकविरा ॥ हि च्यार खुभे प्रथमआलिं ।। अवघे आपुले समुदायें हाटवणि आले ।। विनायकतटाकिं राहिले॥ तेधवां कजिया येकमेकात पडला ।। जर टिळ्यास अधिकारी सावंखेडकर ।। तेधवां निवाडा जाला ।। जर प्रथम टिळा चोध-यांसि घारवडिपुरकरांसी ।। पहिला मान पानपटी ।। दुसरा रावासी ॥ गव्हाणकर आधिकारि ॥ दुसरा टिळा मान पानपटी ।। तिसरा पाटेल थेवखंडकरांसी टिळा मान पानपटी ।। चवथा पांचघरकरांसिं चवथा टिळा मान पानपटी ।। या उपर सांवंखेडकर पांचवा मान पानपटी ॥ ते ह्मातारे उपनावं ॥ सावा ठाकुरांसि मान टिळा विडा ।। हे ठाकुर वस्ति नारतळें तथोन आले ।। गोत्र कपिलध्वज कुळस्वामिण काळिका ।। उपनावं चांचरे ॥ यांसि मान सावा पानपटी ।। या खालते कुडु उपनावं पालवणकर गोत्र काशेश्वर कुळदेवता काळबादेव यांसि मान सातवा पानपटी ।। ७ ।। राणे आणि पुरो हे दोघे अधिकारि ।। सर्वेपणाचि प्रौढि तयांला ।। टिळ्याचे आधिकारि राणे गोत्र अंबऋषि कुळस्वामिण येकविरा ।। आणि पुरो गोत्र जमदाग्नि कुळस्वामिण त्वरिता ।। या उपर ठाकुर हे नारतळ्यासिं पुर्व ठीकाण गोत्र काशेश्वर कुळस्वामिण काळिका उपनावं नारतळें ।। या उपर राउत मागें आले गोत्र अंबरुषि कुळदेवत हे मांडवगडा पासोनि आले ।। त्यांस नावं मांडवगडकर पद जालें ।। ते हि अधिकारि टिळ्याचे २ ।। त्याहि कांधवळि वसविली ।। ते कांधवळि राहिले ।। या उपरांत ऐसें प्रकारें ही खुमे जागा टाकून आणिक जागा देशोदेश भरले ।। वछापुरि बारा पाखाडियांस वसाईत सोळा गावी वसाईत सोळागावकर प्रथक् प्रथक् राहिले ।। या उपर राज्ये हें तुरकाण फार बळकट जालें ।। म्लेंछ उत्तरपंथ पश्चमपंथ गुजराथ काबिज करित पैठणः चांपानेरः भागानगरः काबिज केलीः।। खंबैत हि घेतली ।। तेथें कीतिक युद्धं जालिं तीं लिहितां पध्येत फार होईल ॥ हें मात्र सकळित सांगतों ।। येथे मज विशेष गर्ज ।। जर पुढें भविष्योत्तर पुराणिचे संमत असे कीं हे वर्ण उत्तम फार पिडतिल ।। वर्णावर्ण वोळख जाईल ।। आपले कुळाची याद विसरतिल ।। तेधवां ब्राह्मण आपला अभिमान धरुन ह्या लेखाचा संग्रह ठेवितील व जे काहि राज्यअभिमानि ते हि फार या कुळावळिस जतन करोन रक्षीतिल ।। सत्यवंत सत्यसरश्वती हिचा शोध करितील ।।
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
ऊ
ऊ [ यूका ] (उवा पहा )
ऊज [ ऊर्ज् ( स्त्रीलिंगी) = ऊज ] ऊज म्ह० तेज, शक्ति.
ऊठि [अवशिष्टि, उच्छिष्टि remuant = ऊठि ] बाकी, अवशेष.
ऊत [अव् to promote, animate = ऊति animation, exhilaration = ऊत ] animation, uncommon exhilaration.
उत् + तप् पासून निघालेला ऊत floodover, overflooding शब्द निराळा.
ऊद [ उद्रः = उद्द = ऊद ]
ऊर १ [ उदर = उयर = ऊर. ऊर म्ह० पोट] देवकीच्या उरीं कृष्ण झाला.
-२ [ उरस्= ऊर; ऊर म्ह० छाती ] ऊर बडविणें. (भा. इ. १८३५)
ऊरचा [ उरस्यः = ऊरचा ] माझा ऊरचा मुलगा = मदीय: उरस्यः पुत्रः
ऊरपूर (जेवतो) [उदरपूरं भुते = ऊरपूर जेवतो.]
ऊर्मट [ ऊर्मिमत् = ऊर्मट ]
ऊसकुट्या [ इक्षुकुट्टकः ऊंसकुट्टा इ.इ. उणादिसूत्र २०० भट्टोजी ] (भा. इ. १८३३)
ऋ
ऋणको [ ऋणकामः ] (धनको पहा )
ऋषि - [ऋष्+इ. ऋष् धातूचा मूळार्थ rush असा आहे. ] दैवी स्फूर्ति झालेली प्रतिभावंत व्यक्ति असा ऋषि शब्दाचा अर्थ दहाव्या मंडळांतील ” यं कामये तभृषिं कृणो मि ” या वाक्यांत आहे. (संशोधक त्रैमासिक वर्ष ५ अं. १ )
महिकावती (माहीम)ची बखर
मग भागडचुरि मारिल्या उपर त्या सीमल ह्यातरेयान त्या तांडलासि घेवोन देसल्या दादरुता जवंळ आले ।। वृतांत ह्मात-यान सांगितला ।। जर हा गोमतांडेल फार उपकारला ॥ यासिं आपण जातिंत घेवों केला ॥ आणि यासिं कन्या कुळिची देवों केली ।। तर तुह्मी देसले ह्मणोन दिधलें वचन पाळावें ॥ जर ज्याणे कांदरडाहि उडि घालोन पालकोईतिसी भागडचुरि आणि त्याचा गुमस्ता हे दोन खुन केलें ।। तें आईकोन देसला खुसि जाला ॥ तांडेल आपले मुखिं वाखाणीला । मग आंब नाईक आणि पोस नाईक बोलावोन आणिले ।। वृतांत सांगितला ॥ त्याही प्रायश्चितें नेमिली ॥ मग ज्ञातिन सरता केला ।। गोत्र दिधलें ।। दरम्याचि कंन्या त्या तांडलास दिधली ।। गंधर्व-विवाह केला ॥ मग त्या तांडलाला नावं गोविंदजी दीधलें ।। गोत्र कश्यप ब्रांह्मणि दिधलें ॥ तेधवां त्या तांडले अर्ज देसल्या प्रत केला ।। जर मला वृत वेगळि देणे ॥ मग देसल्यान वृती बेलवडी १ खारवडी २ केतकवडी ३ ऐशा वृति देवोन तांडेल तेथे स्थापिला ।। आपल्या सरसा केला ।। या उपर पाहाडकरि आंब नाईक व पोस नाईक याहि अर्ज केला जर आह्मि खर्च १६० ळास्या फद्यांचा सोंचि लात ।। तुह्मी देसले असतां ब्राह्मणाचे चंडिस वाळावें ।। तेधवां त्या दादरुतें त्या ब्राह्मणासि सेत नवजाळें उंबरवडि यावत् गळवंड आपखपाणख ये इतकि सेतें दिधली ।। ब्राह्मण सुखिकेले ।। यानंतर पोईसकरांला उचित होणे भाग च्यार ऐसें सर्वांसि सुखि केलें ।। मग पाचंबा देवि होवोन निघाले ।। सर्व समुदाये गाविं आले ॥ तेधवां तुरेल चातुरें वाजवित पुढें आला आणि मालवणिचा माळि फुलें घेवोन पुढें आला ॥ उचित देसल्या साउमा उभा राहिला ॥ त्याचे सवें राम सावात्या माळियाचा सोहिरा तो हि देसायासि भेटला ।। त्या देखोन देसला विचारों लागला जर तूं कोण कोणाचा ।। जाब साव्यान केला शरण रक्षाल तरि सांगेन ।। देशला बोलिला जो कांहि शरण त्यासी निर्भय आहे सांगतां विलंब न करावा ।। तेधवां रामसवा बोलिला जर आह्मि भागडचु-याचे सोहिरे माझि वृत तेथे आहे ह्मणोन येणे जालें ॥ मग त्या देसल्यान त्या माळियासि वृतिचा पैका दिधला ॥ त्यासि आज्ञा केलि जर तुं येथें न राहावें ॥ मग त्या माळियाचि कंन्या देसले सोम ठाकुरासी देवविली ॥ ते चि सोहिरिक जाली ॥ छ ।।
त्या उपरांत सीव ठाकुर व सोई ठाकुर हे दोघे देसले जाले ।। तेधवां पोईसरकरांसि पालवण ॥ येकसारकर कडु ॥ त्यासी कडुपण न चाले ॥ ह्मणोन नातवां भाचयांसि दीधलें ॥ ते वेळि वृत आंकुलवलिची जाली ।। ह्मणोन कडुपण आंकुलवलिसिं आलें ॥ मग नवसारिये दिवान फिरले ॥ तेणे सर्वांचा सिधावो घेतला ॥ खांडियाचें जोर जीकला ।। बळें अधिकार केला ॥ त्याणे सीव ठाकुर व मोई ठाकुर देसले नेले ।। त्या पासोन मालाडतपा मरोळतपा पाडलेकर यांचा खंड घेतला ।। आणि अधकारी नेला ॥ चौघे मिळोन नवसारि खाली विलाथ जे माहिम यावत् ठाणेकोकण चवदा माहालें माहिमा खालीं त्याचा सिधावो घेतला ॥ त्या माग राज्य लाहुरस्यासिं जालें ॥ राजा माहिमासि आला ।। लाहुरस्यें (राज्य) केलें वरषें ९ ॥ मग तें राज्य आलि नाखवासि दिधलें ॥ आलि नाखवा चापाणिर सांवत-राज्य माहिमचें करो लागला ।। तेणे कोट बांधिला ॥ त्या कोटा बदल वृति वाडिया ५ बकसिस दीधल्या ॥ त्या वाडियांचि नावें ॥ तबसी १ देवळाची २ खोंपेश्वराची ३ घोडभाट ४ सीरसाळी ५ ह्माता-यासिं बकसिस दीधल्या ।। छ ।। छ।।
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
उराड [ उरस्तट = उरअड = उराड breck ( slightingly ) ]
उरूस [ उत् + हर्ष = उद्धर्ष. उद्धर्ष = उरूस ] उद्धर्ष म्ह० महोत्सव, धार्मिक उत्सव. ( धा. सा. श. )
उलटसुलट [ उच्छिलष्टं = उलट, सुश्लिष्टं = सुलट ] उलथा [ अस् १ गतौ, ४ क्षेपणे. उदस्तः = उडत्थो = उलथा ] ( धा. सा. श. )
उलिसें [ हा शब्द अल्पीयस् पासून निघाला आहे. आदेश ध्यानांत ठेवण्यासारखे आहेत. अ = उ; ल्प = ल. अल्पीयस्= उलिअस = उलिसें ] अति थोडें. ( भा. इ. १८३२)
उलुली [ हुलहुली a sound made by women when in coes उलुली ]
उल्लस, उल्लास [ उत् + लस् १ क्रीडायाम्] ( धातुकोश-उल्लस पहा)
उल्लू [उलूलु (howling) = उल्लू] उल्लू माणूस म्ह० वृथा आरडाओरडा करणारा माणूस.
उल्हस, उल्हास [ उत्+ लस् १ क्रीडायाम्] ( धातुकोश-उल्लस पहा)
उवळणें [ वल् १ वेष्टने, संवरणे. उद्वलनं = उवळणें ] ( धा. सा. श. )
उवा [ यूका = ऊ = आ = ऊ ] (भा. इ. १८३३)
उवाइला [ उपाहित (संयोजित ) = उवाइअ + ल = उवाइल ( ला-ली-लें ) ] ( भा. इ. १८३५ )
उवावो [उपव्यापः = उवावो ] प्रसार, विस्तार, व्याप.
उशी १ [ उत् + श्रय = उशी ( spring up ) ] चेंडूनें उशी घेतली.
-२ [ उच्छ्री (उत् + श्रि ) = उशी ( उंच फेकणें ) ]
उशीर १ [उत्सूर: (संध्याकाळ) = उशीर. उ = ई ]
-२ [उच्चिरं ( अतिशय कालातिपात ) = उशीर ] ( भा. इ. १८३४ )
उष्टें [ जुष् ६ सेवने. जुष्टं = युष्टं = उष्टें] ( धा. सा. श.)
उसट [ उत्सृष्ट ] ( धातुकोश-उसट २ पहा)
उसण [ ऊष् १ रुजायाम्. ऊषणा = उसण ] एक दुखणें. ( धा. सा. श. )
उसंत १ [ उपशांतिः=उवसंति = ओसंत = उसंत. शम् ४ शमने ]
-२ [उपशान्ति = उसंत cessation] त्याच्या उद्योगाला उसंत नाहीं.
उसन (ना-नी-नें ) [ वस्नं = उस्नें = उसनें ] वस्न म्ह० मूल्य.
उसना-नी-नें [ वस्न hire = उसनें anything taken on hire ]
उसना ( ना-नी-ने ) [ मूल्यं वस्नोऽप्यवक्रयः ( अमरद्वितीयकांड-वैश्यवर्ग-७९ ) वसत्यस्मिन्वस्तुप्राप्तिरिति । स्नतः वस्न = उस्न = उसन ( ना-नी-नें) ] पै उसनी घेणें = पै मूल्य घेणें. दूध उसनें घेणें = दूध मूल्य घेणें. दूध उसनें घेणें म्ह० दूध मूळ परत देण्याच्या इच्छेनें किंवा वायद्यानें आणणें. (भा. इ. १८३३)
उसवणें [उत्सो ] (शिवणें पहा)
उसासणें [उष् दाहे. ओषिष = उसास. ओषिषिषति = उसासणें ] अधणाचें पाणी उसासलें आहे म्ह० अति च अति तापलें आहे. (धा. सा. श. )
उसें [ उच्छीर्षक = ऊससिं = उसँ = उसें ] (ग्रंथमाला)
उस्तें [उषस् = उस्तें ]= Morning dawn.
उंहूं ! [ उहू: ! (दु:खदर्शक अव्यय) = उंहूं ]
महिकावती (माहीम)ची बखर
मग ब्राह्मण धांवले ।। विराणे फोडिले ।। त्या उपर देसला अपुले गाविं आला ।। उपरि वरि बैसला ॥ चहुं गाविंचे मिळोन काहाळा वाजविल्या ।। सोळासें वोडणखांडे मिळाले ॥ देशांत लुट करों लागले ।। तें देखोन पहाडकरि ब्राह्मणि वारिले ।। जर जो खर्च होईल तो आम्हि देवों ।। त्या उपर हेर घातली ॥ तर भागडचुरि हरबादेविचे यात्रेस गेला होता ।। ईतक्यात पाहाडकरि चु-यास निरोप पाठविला ।। दादरुत गावांस आला आहे ॥ जमा लोक मिळाले आहेत ।। म्हणोन तुह्मी दाडिये सुखासनि येतां हुशार होणे ।। या उपर चहु गाविंच मिळोन बाहुटा उभारिला ॥ जर जे भागडचु-या सर्वे असतिल ते गांवा खेरिज ॥ अवघ्या हि देसल्या दादरुता जवंळ यावें ।। न याल तर देसा खेरिज ।। तेघवां मालवणिचे तटाकी वेंटनाईक स्वयंपाकी होत।। बाहुटा आईकोन च-हविया टाकोन लोक सारे दादरुता कडे मिळाले ॥ भागडचु-याचे सवें राहिले नाही ॥ जे स्वांग जिवाचे होते १२० तीतके राहिले ।। मग भागडचुरि पांचंबा देविस आले ।। द्रुष्टाद्रुष्टि जालि ।। सीमल ह्मातरा सन्मुख होवोन भागडचुरि हडकिला ।। तो हि साउमा जाला ।। दोघांचे दळ दोघांचं पाठिस राहिलें ।। पूर्वपश्चमे जालें ।। पट्याचे हात दाखविले ।। भाग डचु-यान वार केला ।। सीमल ह्मातरा उत्पवन होउन घाये चुकविला ।। काळवटा पावला ॥ तैसा च पट्याचा मीरका हाणितला ॥ भागडचुरि घायाळ होतां आदळा-आदळ जाली ।। आरोळि फुटली ॥ त्या च वेगेसा जण अंगलग भागडचु-यास घेवोन निघाले ।। ते सीमल ह्मात-यान देखिले ।। मग पाठि लागले ॥ तवं भागडचु-यासहित काररडाह्या पावले ।। उड्या डाह्यांत घातल्या ।। तवं सीमल ह्मातरा तो हि पावला ॥ तवं हे अंतरले ॥ तेधवां त्या डाह्यात तारु होते ।। त्या तांडलास सीमल म्हात-यान हडकिलें ॥ जर तो निळे पगडिचा भागडचुरी मारिसिल तर जें तुं मागसिल तें देईन ।। आईकोन तांडेल बोलिला जर आपली कंन्या देसिल व जातित घेसिल तर मारिन ।। आईकोन सीमल ह्मातरा बोलिला जर तुला जातित देसल्या जवंळ सरता करिन आणि कन्या हि आपले कुळि देईन ।। सत्य वचन दिधलें ।। मग त्या गोमतांडलें पालकोईति हाणितली ।। ती वर्मि भागडचु-यास लागलि ॥ तेणे गजबजिला ॥ तवं तो गोमतांडले उडि टाकोन चुडावल्याचा मारिला ॥ ऐशा परि भागडचुरि मुक्ति पावला ।। आणिक दाहांतिल येक मारिला ॥ नव जण पार झाले ।। ते वेव्ह्याळि उतरले ।। मुडध्यास जावोन मायेंदरसवां धरुन जुहां उतरले ॥ तेथोंन नागाव्यांस आले ॥ तेथोन वर-दक्षिणीस आले ॥ तेथें माधव माळि त्याणे त्यांचें आथिथ्य विशेष केलें ॥ त्यासिं विचारिलें तुह्मी कोण कोणाचे ।। त्यानीं मुळकथा सांगितली ॥ भागडचुरि मारिला ह्मणोन आह्मास येणे जालें ।। तरि येक विनंति आमचि जे आमचे कबिले राहिले ।। तेधवां त्या माळ्यान आपला पुत्र पाठविला ॥ तो जावोन कबिला आणि कमळचुरि घेवोन रात्रि आ-यास येवोन डोंगरवाटे चेन्यास आले ।। तेथोन मसुफोफळी उतरोन घरि आला।। कबिले भेटविले।। वस्त्रें फिरविली ।। मोति स्त्रियांहि टाकिली ।। पुरुषाहि द्वालि सोडिली ।। माळि वेश धरिला ।। उदिम माळियाचा सिखों लागले ।। माळिवें कमळचुरि आपला कबिला घेवोन पैलाड उतरोन केळव्यास गेला ।। तेथें दामकवळि हाटवट्यान राहिला ।। वाडिया लावल्या ।। त्याचि परंपरा तेथे जालीं ॥ या उपर नाम मावा भागडचुयाचा भाणज ।। तो आगाम राय-भाट तेथे घरताचा आणि ह्माता-याचा संग धरोन राहिला ॥ त्याची परंपरा तेथे जालि ।। या उपर त्या माळियाचा सोहिरा कवळि तो आळवाडिये तेथे निंजंग भागडचु-या जावोन मलिक आलावदिनल भेटोन वाडिया १० खोति आणिल्या ।। वीस हुन दिवानि द्यावे ॥ यावत मुक्तेश्वर खोति आणिली ।। आपण तेथे कुटुंबि दाद राउत माल सावा दाम राउत गोविंद ठाकुर आणि नार घरत अवघे येकत्र राहिले ।। त्यांचि परंपरा मोहोरे सांगेल ।। छ ।। छ।।
महिकावती (माहीम)ची बखर
देश ईनाम पातस्यान केला ॥ मग निका मलिक आणि मलिक आलावदिन दोघे राज्य करों लागले ॥ ईतुक्या उपर कजीया भाईंदरकरा वर घातला ॥ जे हे आपले गावांचा हसिल खात आहेत ।। ते पाटेल धरोन आणिले ।। ते दस्त केले ॥ तें देसल्या सोम ठाकुरास कळले ।। मग जावोन अर्ज केला ॥ जर हे हरामखोर होति ॥ जे जमि दिवानीचि त्याचा मसाला खातिल ॥ तें आईकोन निका मलिक कोपला ।। हिसाब केला ।। जर याहि हिसाबी ३२००० सजगाणि देणे ।। मग ती सोम ठाकुरें देवोन सोडविले ।। तेंधवां भागडचु-यान निका मलिकास उडविलें ॥ जर हा सोमठाकुर कुफराणदार ।। यास शासन कांहि योजावें ॥ आणि मातबर फार जाली आहे ।। पैका फार आहे ।। तें आईकोन त्या सोमठाकुरास बोलावोन त्या वर १६०० हजार दाम काढिले ।। जर तुं आह्मास देणे आहेत ॥ तो ह्मणो लागला तुं दिवान आहेस ॥ आपण कोण्हास कव देणे नाही ॥ मग निका मलिकें त्या देशल्या वर हट धरिला ।। मग जैतचु-याचा पुत्र भागडचुरी बोलावोन देशलिक देशाचि देवों आदरिली ।। ते वेळि भागडचुरि बोलिला जर देसला सोमठाकुर आणि पांपरुत असतां कैसि चालेल ।। हे जर माराल तर केलि जाइल । हे असतां होत नाहीं ॥ मग निका मालिकें विचार केला ।। पात स्यायास कागद लिहिला ॥ जे आपण सायेबि हुकुम ह्मणोन या कोकणि आलों ॥ तेधवां हा भागडचुरि येवोन सर्व देशाचि जमी सांगितली ।। त्यांतिल जमी हे देसाये विकितात ।। लांच हि खातात ।। कांहि ह्मणावे तर देश मोडों पाहतात ।। या करितां हे हरामखोर हिंदु ॥ साहेबि बोलावोन न्यावे ॥ जें शासन घडेल तें करावें ।। पत्र देखतां दिल्लीस देसले नेले ।। त्यां मागे लाच हि पातशायासि पावला ॥ तेणे करोन पातशा हि कोपला ।। देसल्या जवळ पुसता जाला ।। जर जमि आपसंतोषें विकावि ।। गईबत करोन ।। भय नाहि ।। दुसरोन विलाथ मोडु पाहाता ।। जाब कठिण आईकोन सोमठाकुरें कुडु प्रतविला जर कबिला काढावा येथे अनर्थ आहे ॥ या उपर देसला सोम ठाकुर मारिला ॥ पायरुताचि खाल काढिली ॥ सोमठाकुराचें पोट चिरोन आताड्याचि वात करोन रक्ताचें तेल करोन दिवा जाळिला ।। नांदुरखिचे झाड खालिं रक्तें दिवा जाळिला ॥ परि हरामखोर न दिसे ॥ तेधवां पातशा विचारि पडला ।। तर देसलें व्यर्थ मारिलें ॥ हा सोमठाकुर ॥ याचे उदरि जो पुत्र असेल तो सर्वांचा दाप आणि मुगुट ।। ऐसि दुवा बोलिला ॥ मग भाटि तो हि वाखाणिला ।। पत्रें कोकणि पावली ॥ जर देसले मारिले ।। तें ऐकोन निका मलिकें भागडचुरि बोलावोन आणिला ।। देसलिकीचा विडा देवों आदरिला ॥ तेधवां गावोंगाविं मनुष्य धाडान सर्व देश जमा केला ॥ त्या प्रत श्रुत केलें ॥ जर देसले पातस्यायें मारिले ।। तर हा भागडचुरि आज पासोन चवदा प्रमाण्याचा दसला ॥ याचे आज्ञेन सर्वांहि राहावें ।। याचि आज्ञा जो मोडिल शासन त्यास आपण लाविन ॥ ऐसें बोलोन विडा देवों आदरिला ॥ तेधवां चहु गाविंचे उभे राहिले ।। ज्वाब केला ॥ जर आमचा देसाये सोमठाकुर आणि पांपरुत ।। त्या मागे त्याचा वंशिक जो असेल तो ॥ त्या विरहित कोणि सत्ताधारि आह्मास नाहीं ॥ या उपर तुं दिवान अहेस ।। परंतु आमचे ज्ञातिस न्यायास आमचा असेल तो आम्हास ।। या उपर हुकुम दिवान करितिल तर अवघा देस माफिल आहे ॥ ऐसा निकर चहु गाविंचे देसले बोलिले ।। पोईसकर ।। उतनकर ।। येकसारकर ॥ आणि कांधोळकर ।। उठोन चालते जाले ॥ ते निघोन गेले ।। तेधवां निका मलिकें भागडचु-यास जाव केला ।। जर घोणिस पायें ८४।। चहु पायां करितां घोण लंगडि नव्हे ।। तुला अवघा देश माफिल आहे । म्हणोन विडा दिधला ॥ भागडचुरि देसला केला ।। तेधवां भागडचुरि देसला बोलिला ॥ जर माझि दुराये देतां अवघ्याहि वोळगें यावें ।। न याल तर तुमचे पालवणपद काढिन वोलणंकराना देईन ।। तें आईकिलें ॥ येकसारकर बोलिले जर हें आमचें पद काढि ऐसा कोण आहे ॥ मग चहु गाविचे येकत्र मिळोन विचार केला ।। जर हें बरें नव्हे ।। आणि त्या भागडचु-यान दुष्टादुष्ट धरिली ।। भल्या भल्यांच्या स्त्रिया बळत्कारें कर्म आचरिला ॥ ते हि नीका मलिकास कळलें ।। त्याणे हि आज्ञा चहुं गाविं दिधली ।। मग ते चहु गाविंचे येकत्र मिळाले ।। विचार दृढ केला ॥ मग ठाण्यास गेले ।। तेथोन दादरुताला वृत्तांत सांगितला ॥ अवघ्यांचा विचार दृढ जाला ।। मग ठाण्या होवोन सर्व जमा पाहाडिस आले ।। आंबनाईकास भेटले ॥ मग तेथे राहिले ।। ते च दिवसिं भागडचु-याचा बंधु कमळचुरि विराणे वाजवित परताबपुरि जात होता ।। तों वाद्यांचा गजर दादरुते आईकिला ॥ मग पृछा केलि जर हे विराण कोण्हाचें ।। पाहाडकर ब्राम्हण बोलिले जर कमळचुरि भागडचु-याचा बंधु परतापुरि जात आहे ।। आईकोन दादरुत बोलिला जर हे विराण फोडि ऐसा कोण्हि आपल्यामध्यें आहे ॥ तेधवां पहाडकर ब्राह्मण बोलिले जर पोईसरकार आपलि भाख देतिल तर आम्हि भंगु ।। मग पोईसरकरि आपुलि भाख दिल्ली ।।