प्रकरण ४ थे
अग्नि व यज्ञ
(१) भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास व पारंपरिक तपशील सांगावयाचा म्हटला म्हणजे अग्नि ह्या पदार्थाचा थोडासा सामाजिक इतिहास सांगावा लागतो. अग्नीला साक्ष ठेवून सध्याचे भारतवर्षीय त्रैवर्णिक हिंदू लोक विवाहसंपादन करतात. अग्नीची साक्ष नसेल, तर तो विवाह धर्म्य समजला जात नाही. येथे असा प्रश्न उद्भवतो की, अग्नीचा व विवाहाचा संबंध काय ? विवाहाग्नी, गृह्याग्नी, आवसथ्याग्नी, औपासनाग्नी इत्यादी शब्दांत विवाह व अग्नी, गृह व अग्नी, उपासना व अग्नी ह्या द्वंद्वाचा नित्य संबंध सांगितलेला आढळतो तो काय म्हणून ? अग्नीने रानटी आर्यांचे असे कोणते कार्य केले होते की जेथे तेथे त्यांनी अग्नीचे आवाहन करावे ? इत्यादी प्रश्नांना उत्तर द्यावयाचे म्हणजे रानटी आर्यांची पुरातन काळी सामाजिक व भौम स्थिती काय होती ते पाहावे लागते.
Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Published in
भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास