Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
अटाट १ [ धातोरेकाचो हलादे: क्रियासमभिहारे यङ् ( ३-१-२२ ). पौनः पुन्यं भृशार्थो वा क्रियासमभिहारः . अट - अटाट्यते (.'. अटाट ] अति हिंडणें, जिवापाड मेहनत करणें. (भा. इ. १८३२ )
-२ [अटाट्या = अटाट (स्त्रीलिंगी) ]
अटी [ अत् १ सातत्यगमने अतिः = अटी ] बाबा अटीस । पेटूं नकोस = मा भवात् अतीत्. अटी म्हणजे अतिमर्यादेला जाणें. ( धा. सा. श.)
अटोका [ आ + तुज्] (आटोका १ पहा)
अट्टल १ [ अट्ट अतिक्रमणे अट्टल exceeding] अटटल सोदा exceedingly mischievious.
-२[अटल (स्थिर, पक्का) = अट्टल ] (भl. इ. १८३६)
अट्टल चोर [ हट्टचौरक = अट्टचोर= (स्वार्थक ल लागून)] अट्टलचोर; हट्टचौरक म्हणजे बाजारांतला देखत चोरी करणारा. (भा. इ. १८३५)
अठरा [ अष्टापरदशन्] ( अकरा २ पहा)
अठरापगड [ अष्टादशप्रकृतय: = अठरापगड. प्रकृति = पगडी ]
अठरापगड (जात) [ (अष्टादश) प्रकृति = पगडी. अष्टादशप्रकृतिः जातिः ]
अठरापगड जात [अष्टादशप्रकृतिका जातिः = अठरापगड जात. प्रकृति म्हणजे प्रजाजन. प्रकृति = पगडी ]
प्रत्येक जातींचें शिरोभूषण लक्षणार्थ निराळें असे. सबब शिरोभूषणालाच पगडी नांव पडलें.
अठळी [ अष्टीला = अठळी ]
अठी-अठळी [ अष्टि = अठ्ठि = अठी. अष्टिलिका = अठ्ठिलिआ = अठळी (गर्याची) ] (भा. इ. १८३४)
अंडगडी [ अंतर्गडी ] (भा. इ. १८३३)
अडघर [ अंतर्गृह = आँडघर = आडघर = अडघर ] (भा. इ. १८३३)
अडणी [ अटनी = अडणी (शंख ठेवावयाची ) ] (भा. इ. १८३६)
अंडपंचा [ अंतःपंचह्= अंडपंचा ] दहा हात लांब व पाउणे तीन हात रुंद जें धोतर तें पायघोळ धोतर, त्याच्या आंत नेसण्याचें जें लहान वस्त्र तें अंडपंचा. ( भा. इ. १८३३)
अडविणें [अंतरायनं = अँडअवणें - अडावणें = अडविणें] अडावणें असा हि उच्चार फार ऐकूं येतो. अंतरि म्हणजे मध्यें येणें, प्रतिबंध करणें. (भा. इ. १८३५)