Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
अजाण, अजाणता [ अजानत् = अजाणताः; अज्ञान = अजाण ]
अजी [ अजे पहा ]
अजून १ [ अद्य + पुनः = अज्ज + उण = अजून ( नी, नियां ) ] (भा. इ. १८३३)
- २ [ अद्य = आज; अद्यतनं = अजून; अद्यापि = अझूनि, अजुनि, अझूइँ ]
अजे [ आर्य्ये = अज्जे = अजे = अजी ]
मराठींत म्हातार्या स्त्रीस संबोधतांना विशेष सलगी असल्यास अजे अशी हाका मारतात, व बहुमानानें अजी अशी हाका मारतात. ही हाक मराठीनें सहजच संस्कृतांतून वंशपरंपरेनें घेतली आहे. बाण हर्षचरितांत अष्टमोवछासांत स्त्रियांना संबोधण्याचे दहापांच प्रकार अर्थासुद्धां देतो. त्यांत खालील वाक्य आहे :-
कथं इव महानुभावानां एनां आमंत्रये । वत्से इति अतिप्रणयः । इ. इ. इ. । आर्ये जरारोपणम् ।
जरारोपण असतां बाणाच्या कालीं वृद्ध स्त्रियांस आर्ये अशी हाक मारीत. आर्य्येचा अपभ्रंश अज्जे. अज्जेचा मराठी अपभ्रंश अजे. कुणबी व शूद्र घरांतल्या म्हातारीला अद्याप अजे अशी हाक मारितात. शिष्ट ब्राह्मण अजी अशी हाक मारितात. अजेचें अजी रूप शिष्टांनीं कसें साधलें तें उमगत नाहीं.
वत्से = बच्चे
पुत्रि = पोरी
मूलिके = मुली
भवति = बाई
मातर् = माई
भगिनि = बहिणि, बहिण्ये, बहिनी.
बाले = बाळे
वगैरे हाका मराठीनें आपली अजी जी संस्कृत तिजपासून घेतल्या आहेत. ह्याला बाण साक्ष आहे (निर्णयसागर प्रत, पृष्ठ २४४). ( भा. वा. इ. १८३५)
अटकळ १ [अंतर्कप् लृ - अंतर्कल्पः = अटकळ. अंतर्कल्पना = अटकळि = अटकळ] अटकळीनें समजणें = अंतर्कल्पेन सम्बोधनं.
- २ [ क्लप् १० व्यक्तायांवाचि. अंतर्कल्प = अटकळ ( धा. सा. श.)
- ३ [ क्लप् १० व्यक्तायां वाचि. कल्प = कप्पा, काप. अन्तल्पप्ति = अटकळ ]. ( धा. सा. श.)
- ४ [ अन्तर् + क्लृप् तर्क करणें =अटकळणें (तर्क करणें) ]