Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश

सोयरा [ स्वयंवरः = सोयरा ]
बायकोचा सोयरा म्हणजे स्वयंवर:, जार.
सोदर पासून निघालेला सोयरा म्हणजे संबंधी.
नवरा छिनाल बायकोवर रागावून सोयरा पहा म्हणून म्हणतो, तेथें सोयरा या शब्दाचा अर्थ स्वयंवरः असा आहे.

सोयरा-री-रें [ सोदरक = सोअरअ = सोयरा-री-रें] (स. मं.)

सोयरीक [ स्वयंवरकता = सोयरीक ] सोयरीक म्हणजे नवरा किंवा नवरी पाहिलेलें स्थळ. ह्या सोयरीक शब्दाचा संबंध सोदर शब्दाशीं बिलकुल नाहीं.

सोयेर १ [ सूतिकागृहं = सोयेर ]

-२ [ सौदर्य = सोएर = सोयेर ] (स. मं. )

सोर, सोरू, सोरूं [ सूकर = सोर (डुकर) सूकरकं = सेरू, सोरूं ( लहान डुकर) ]

सोलणें [ लू ९ छेदने. सुलूः (सुष्ठु लुनाति) (सोलणारा) सुलवनं = सोलणें ] चांगलें कापणें. ( धा. सा. श. )

सोलाणा, सोलाणें [ सुलुधान्यम्] ( धातुकोश-सोल २ पहा)

सोलींव [ शल्किम = सोलींव ]

सोले [ सुलुः = सोले] (डोळ पहा)

सोंवळ [ सुमृदुल = सोंवळ ] tender, soft, delicate.

सोवळें १ [ क्षौम ( silken) + ल ( स्वार्थक) = सोंवळें) सोवळें is a cloth made of silk. सोवळें याचा अर्थ रेशमी वस्त्र. या पलीकडे कांहीं नाहीं.

-२ [ क्षौमदुकूलं = सोंवळे. औमदुकूलं = ओंवळें ] क्षौम (रेशमी) व औम (ताग, सण यांचें).

-३ [ प्राकृत ओलं शब्दाचें मराठी ओलें हें रूप आहे. संस्कृत शुष्क शब्दाचें प्राकृत सुअ होतें. सुअ + ओल्लं = सुओल्लं = सोअल्लं = सोवळें = शुष्कोल्लं. ओल्याचें वाळलेलें तें सोवळे. तसेंच अव + ओल्लं = अवोल्लं = ओवळें, ओलं नाहीं तें ओवळें. कोरडें वस्त्र ओलें करून वाळवलें म्हणजे सोवळे होतें आणि ओलें होण्याच्या अगोदर तें ओवळें असतें. ] ( सरस्वतीमंदिर श्रावण शके १८२६)

सोवेरी [ सुपर्वा (बांवू) ] (ज्ञा. अ. ९ पृ. ८५)

सोशीक १ [ चीक् १ सहने अभ्यास चेचीक ] (धातुकोश-सोस २ पहा)

-२ [ शीक् १ आमर्षणे यड्लुगन्त शिशीक् ] (धातुकोश-सोस ३ पहा)