Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश

सरसः [ सर्वरसः = सरस.
सर्जरसः = सरस.
धूपः सर्वरसः सर्जरसः । ]
राळेसारख्या कातडीं वगैरेंपासून केलेल्या चिकास हि सादृश्यानें सरस म्हणतात.

सरसकट् [ सर्वसकृत्] (सरसगट् पहा )

सरसगट् [ सर्वसकृत् = सारँसकट् = सरसकट् = सरसकट्, सरसगट् ] सरसगट् म्हणजे सर्व एकाच वेळीं. सरसगट [ सर्वसकृत् = सरसगट ]

सरसर, सरसरां [ सरसरं = सरसर, सरसरा, सरासरा, सरसरां, सरांसारां ]

सरसा [सरसः = सरसा ] सरसा म्हणजे ताजा. दिवा सरसा करणें म्हणजे काजळी झाडून ताजा करणें.

सराई १ [श्रयी: सरई = सराई. श्री १ सेवायाम् ]
धर्मशाला, उतरण्याची जागा.

-२ [ श्राया = सराय, सराई ] श्रायः shelter पाणिनिः ३-३-२४.

सराटा १ [ श्रृंगाट: = सराटा ]

-२ [श्वदंष्टा = सराटा ]

सराय [ श्राया ] ( सराई २ पहा )

सराव १ [ स्त्रावः flowiug forth = सराव ]

-२ [ स्रु १ गतौ ] ( धातुकोश-सराव २ पहा)

सरांसरां [ सरसरम् ] ( सरसर पहा)

सरासरी [ सर्व + असर्व = सर्वासर्व, सर्वासर्वस्यभावः = सार्वोसार्वं. सार्वासार्विका = सरासरी ]

सर्जा [ सर्वजित् = सरजिअ = सरज्या, सर्जा ] सरज्या हा शब्द पोवाड्यांत शिवाजीला लावलेला असतो.

सर्जू [ सर्ज् प्रापणे ] व्यापारी. (धातुकोश-साट ३ पहा)

सर्दी [ छर्दिः ( आजार ) = सर्दी ] फारसी सर्दी पासून हि हा शब्द व्युत्पादितात. (भा. इ. १८३३ )

सर्पण १ [ चृप् १० संदीपने to kindle चर्पणं = सर्पण that which kindles.

-२ [ छृप् १० संदीपने. छर्पणं = सर्पण ] जळण.

-३ [ श्रपण ( शिजवणें ) = सरपण. श्रा २ पाके ] शिजविण्याला लागणारें लाकुडफाटें म्हणजे सरपण. सरपणाला म्हणजे शिजविण्याला लाकुडफाटें पाहिजे. असा प्रयोग होतो. त्यावरून लांकुडफाट्याला च सरपण म्हणूं लागले. (भा. इ. १८३३ )