Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश

वाचून, वांचून १ [वृच्, वृज्, वृंज्] ( धातुकोश-वांच ३ पहा)

-२ [ वर्ज् १० वर्जने. वर्जयित्वा ] (धातुकोश-वांच २ पहा)

वांचून (शिवाय) [ वचणें म्हणजे जाणें. न वचणें म्हणजे न जाणें. वाचणें व नवचणें हे दोन्ही शब्द ज्ञानेश्वरकालीन आहेत. वचणें ह्याचें प्रयोजक रूप वाचणें. वाचणें म्हणजे घालवणें. वाचून = घालवून. तुजवाचून म्हणजे तुला घालवून, सोडून, तुझ्या खेरीज. (ग्रंथमाला)

वाजट [ वादरत disputations = वाजट ] भांडखोर, वादी, विवादांत कुशल.
उ० - हें जाणों मृत्यु रागिठा । सिंहाडेयाचा दरकुटा ।
परि काइ वाजटां । पूरिजतसे ॥ ज्ञा. १३-६०

वाजणें, वाजे [ वाशृ शब्दे । वाश्यते = वास्सए = वासे = वाजे ] तुंडं वाश्यते = तोंड वाजे. (भा. इ. १८३३)

वाजवणें [वी (विणें) वाययति = वाजवतो ] वाजवा जा म्हणजे स्त्रीसंग करा असा प्रयोग मराठींत करतात. येथें वाजवा म्हणजे विण्याची क्रिया होईल असें विधुवनाचें कृत्य करा. ( धा. सा. श. )

वाजवी [ कुत्सितं बहु भाषते सः वाचालः वाचाटः सभ्यग्बहु भाषते सः वाग्मी. वाग्मी (वाज् + मिन् )= वाजवी. वाग्मी = वाचवी = वाजवी. ग = ज ] वाजवी बोलतो म्हणजे वाग्मी भाषते.

वांझ करटोली [ वंध्या कर्कोटक वल्ली = वांझ करटोली ] (भा. इ. १८३७)

वाट १ [ वार्ता = वाट ] पोटापाण्याची व्यवस्था.

-२ [ पथिवस्तुनि वाटः स्यात् ( त्रि. शे. ) ] ( ग्रंथमाला )

वांटा, वांटणें [ वट्, वंट् विभाजने ] (ग्रंथमाला)

वाटाणा [ वटधान्य = वटदाण = वटआण = वटाण = वटाण = वाटाणा. वट = वाटोळी गोळी ] (भा. इ. १८३३)

वाटी १ [ (वैदिक ) अष्ठीवत् = अठ्ठि = आठि = वाटी (घुडघ्याची ) ] (भा. इ. १८३४)

-२ [ वर्तिका = वट्टिआ = वटी, वाटी (चंदनाची ) ] (भा. इ. १८३२)

वाटेचें [ पाथेयं = वाटेचें ] किंचित् पाथेयं अत्तुं दत्त = कांहीं वाटेचें खायला द्या. वाटेचें म्हणजे वाटेंत खाण्याचा पदार्थ.