Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
वरवर १ [ परिपरि = वरवर. परेर्वर्जने । ] देशांत वरवर पाऊस पडला म्हणजे देश वर्जून पाऊस पडला, देशांत तुरळक पाऊस पडला.
-२ [ परि परि कृ, रट्, हस् etc = वर वर करणें, रडणें, हसणें ] to do, cry, laugh superficially.
वर वर [ परे र्वर्जने (८-१-५ पाणिनि ) ] परि परि त्रिगर्तेभ्यः वृष्टो देवः म्हणजे त्रिगर्ताला सोडून वर वर पाऊस पडला. वर वर बोलणें म्हणजे मुख्य मुद्द्याला सोडून वर्जून बोलणें. येथें वर वर याचा अर्थ वर्जून असा आहे.
वरात १ [ व्रात, व्रातिः = वरात ] व्रात, व्रातिः म्हणजे जनसमूह.
-२ [ पर्याप्ति end, completion = वराती = वरात ] लग्नाची वरात completion ceremony of marriage. हुंडीची वरात honouring a हुंडी.
वरिचिल [ उपरि + चि = वरिचिल, वरचील ] sitting above.
वरिचील [ उपरि + ची ]
वरि वरि [ उपर्यध्यधसः सामीप्ये ( ८-१-७ पाणिनि ) उपरि = वरि] उपरि उपरि ग्रामं = गांवा जवळ जवळ.
वरि वरि म्हणजे अति जवळ.
वरि वरि हा शब्द तुकाराम योजतो.
वरील [ अपरस्थ = अवरिल (जुन्नर शिलालेख ) = वरील = वरलें, ला, ली ] (ग्रंथमाला)
वर्चष्मा [ वर्चस्मन्] (वर्चस्मा पहा )
वर्चस्मा [ वर्चस्मन् = वर्चष्मा, वर्चस्मा ] वरचढपणा.
वर्चस्व [ हा शब्द संस्कृत वर्चस्व या शब्दापासून निघाला आहे. वर्चस्त्व = वर्चस्व ] (भा. इ. १८३३)
वर्म १ [ मर्मन् = वर्म ]
स मे मर्म क्राथयति = तो माझें वर्म काढतो. क्राथू= काढ म्हणजे हणणें. स मे मर्माण कर्षति = तो माझीं वर्मे काढतो. कृष् = काढ म्हणजे फरफटून ओढणें. (भा. इ. १८३६ )
-२ [ मर्मन् = वर्म, वरम ] वर्मी जखम = मर्मणि यक्ष्मा.
वर्या [ वरका = वरआ = वार्या (हेमचंद्र) ] (ग्रंथमाला)
वर्षअखेर [ वर्षाक्षरी ] ( अखेर पहा)
वर्हाड - नवर्या मुलाबरोबर लगिनघरीं जी मंडळी जाते तिला वर्हाड म्हणतात. वर + हाट = वरहाट = वरहाड = वर्हाड (नवर्या मुलाचा बाजार) (ग्रंथमाला)