Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
पादरपुचका [ पर्दपृश्निक: = पादरपुचका ] पर्द: म्हणजे पादरा, पादणारा; आणि पृश्निकः म्हणजे दुर्बल. पादरपुचका म्हणजे पादरा आणि दुर्बळ.
पादरफुसका [ पर्द्, स्फुर्ज् १ कुत्सिते शब्दे. पर्दस्फुर्जकः= पादरफुसका ] स्फुर्जक म्हणजे मेघनाद करणारा. पादरफुसका म्हणजे पादून मोठा आवाज करणारा. [धा. सा. श. ]
पादेंलोण [ पर्दक (पर्द पादणें) + लवण = पद्दअलोण = पादलोण = पादेंलोण ] पादाच्या रूपानें नळांतील वात काढून लावणारें जें लवण तें पादेंलोण० ( भा. इ. १८३३ )
पाद्रा १ [ पर्दक: (पादणारा) = पाद्रा]
-२ (प्रा + द्रु to fly away from : प्राद्रावक = पाद्रा ] पळकुटा.
-३ [ पद्रक = पद्रा = पाद्रा ] ( स्थलनामकोश-भडोच पहा)
पान १ [ उपाभरणं = उपाहरणँ = उपारणँ = उपरणें = पर्णे = पर्ण = पान ] सरदारांना पानें व लुगडीं दिलीं म्हणजे सरदारांना उपरणीं व वस्त्रें दिलीं. (भा. इ. १८३३)
-२ [ साप चावला म्हणजे पान लागलें असा प्रयोग महाराष्ट्रांत करितात. येथें पान म्हणजे साप असा अर्थ आहे, झाडाचें पत्र असा अर्थ नाहीं. साप हा अर्थ कसा आला तर असा:- (सं. ) पन्नग = ( महा. ) पण्णअ = (जु म.) पाण = (न. म.) पान. (१) पुष्कळ शब्दांचीं लिंगें मराठींत बदलतात म्हणून व (२) पान (पत्र) ह्या मराठी शब्दाच्या लिंगाचें अनुकरण करून, पान (सर्प ) हा शब्द मराठींत नपुंसकलिंगी बनला आहे. पान लागलें = साप (पायाला वगैरे) लागला ! (भा. इ. १८३२)
पानवेल [ पन्नगवल्ली [ (नागवल्ली) = पानवेल ]
पान्हा [ प्रस्नावः ] ( धातुकोश-पान्ह पहा)
पापणी १ [ पक्ष्मणी (द्विवचन ) = पक्कणी = पाकणी = पापणी ( डोळ्याची ) ] मराठींत पापणी एकवचनी आहे. अनेकवचन पापण्या. पक्ष्मणी क्ष्म = प = पापणी आत्मन् त्म = प = आपण आत्म्यं त्म्य = प आपें (ग्रंथमाला)
-२ [ पक्ष्मिणी (द्विवचन ) = पापणी ] (स. मं.)
पापरा [ पर्परिक = पापरिअ = पापर्या, पापरा. येन पीठेन पंगवः चरंति स पर्पः । पर्पेण चरति पर्षिकः । ] गाडींत बसून जो पांगळा भिक्षा मागतो तो. गाडींत बसून भिक्षा मागणार्यांची ही परंपरा पाणिनीच्या वेळेपासूनची आहे ! (भा. इ. १८३४) म. धा. १६