Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश

पाठराखी, पाठराखणी [प्रतीहार रक्षी ( a female doorkeeper) = पाठराखी. प्रतीहाररक्षण = पाठराखण ]

पाठलाग [ लग् १ सङ्गे, गतौ. पृष्टलागः = पाठलाग ] ( धा. सा. श. )

पाठवणें [ पाथयति (पच्याणिच्) = पाठवणें (धाडणें); (भा. इ. १८३६)

पाठस (सा-सी-सें) [ पृष्टशय = पाठस (सा-सी-सें ) ] (भा. इ. १८३४)

पाठाड-ण [ पृष्ट + अस्थि = पाठ + हाड = पाठाड = पाठाण ] (स. मं. )

पाठार [ पठार ३ पहा]

पाठि [ प्रस्थिति march = पाठि ] march, progress.
उ० - म्हणौनि यया वाखाणा । पाठि सेइली चौगुणा ।
ना म्हणों न येंसि देखणा । होंसि ज्ञानी ॥ ज्ञा. १३-६४४

पाठिंबा [ पृष्ठिस्तंभः = पाठिंबा ] पृष्टिस्तंभ म्हणजे पाठी-मागचा खांब.

पाड १ [ पार: ability = पाड ] सामर्थ्य.
त्याचा पाड किती ? what is his powers ?

-२ [ प्र + अट्ट आतिक्रमणे to exceed. प्राट्ट: = पाड ] excelling, overriding. तूझेनि पाडें overbearing thee disparating thee.

-३ [ प्र + अड्ड् to meditate. प्राढ्डः thought meditation = पाड ] thought. द्रोणाचा पाडु न करी Don’t think of द्रोण.

पाडणें [ पट् १० ग्रंथे. पाटनं = पाडणें ] काकडीच्या फाकी पाडणें, लाकडाच्या फळ्या पाडणें म्हणजे कापणें.
पत् पासून निघालेल्या पड धातूचें प्रयोजक रूप पाडणें होतें तें निराळें. ( धा. सा. श. )

पाडा १ [ पद्रक = पड्डअ = पाडा ( लहान गांव) ]
गुजराथेंत व कोंकणांत क्षुद्र गांवांना पाडा म्हणतात. जांबुळपाडा वगैरे. ( भा. इ. १८३३)

-२ [ पाटक = पाडअ = पाडा ] पाटक म्हणजे गांवाचा एक लहान भाग.
कोणत्या हि गांवा खालचा किंचित् दूर असलेला जो लहानगा पांचदहा घरांचा समूह त्याला पाडा म्हणतात. (भा. इ. १८३५).

-३ [ पटकः half a village = पाडा ] a hanlet.

पाडा-डे [ पाटी, पाट: ( अंकगणित). पाट: = पाडा-डे ( अंकगणित) ] ( भा. इ. १८३२ )